मुंबई मराठी पत्रकार
संघातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही 27 डिसेंबर 2013 ला दिवंगत आप्पा पेंडसे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त नागरिकांच्या समस्येवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.यंदाचा
हा परिसंवाद “हेरिटेज: काय व कसे?”
यावर आधारित होता.या परिसंवादास मुंबई महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्री.दिनेश अफझलपूरकर,महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास
मटाले व आप्पा पेंडसे यांच्या कन्या वसुंधरा पेंडसे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पूनर्विलोकन समितीचे अध्यक्ष
आणि महाराष्ट्र व मुंबईचा पूर्णतः अभ्यास असणारे श्री.दिनेश अफझलपूरकर यांच्या म्हणण्यानुसार, “पाश्चिमात्य
देशात पुरातन वास्तू जतन करण्यासाठी जी चळवळ होत होती,ताथील विचार आचरणात आणून
महाराष्ट्रात असा कायदा 1991 मध्ये अंमलात आणला गेला(विकास नियंत्रण नियमावली
कायदा क्र.67-हेरिटेज रेग्युलेशन कायदा).”अफझलपूरकरांनी हेरिटेज वास्तूंअंतर्गत येणाऱ्या श्रेणी व त्यांची यादी
प्रस्तुत केली.मुंबईतील काही भागांवर सुनावणी चालू असल्याने फार काही माहिती देणे
त्यांना शक्य झाले नाही.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी CRZ भागातील कोळी लोकांचे प्रश्न,चाळीत राहणाऱ्या लोकांच्या
समस्या असा एकंदरीत वस्तुस्थितीचा चेहरामोहरा समोर आणला. “फूटपाथवर झोपडी बांधून
राहणाऱ्या लोकांना कालांतराने घर मिळते,तर आधीपासून वास्तव्यास असलेल्या लोकांच्या
समस्यांचे काय?”अशा प्रकारच्या तीव्र
भावना त्यांनी व्यक्त केल्या.यावर “या सर्व समस्यांस खूप
गोष्टी कारणीभूत आहेत,त्यातील एक म्हणजे 1945-1947 यादरम्यान आलेला भाडे नियंत्रण
कायदा कारणीभूत