Sunday, 30 December 2012

वेब जर्नलिझम कोर्स आढावा

हाय,

कृपया खालील प्रतिसाद अर्ज तत्काळ भरून, तो पुन्हा मेल करावा, ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती.
तुमच्या थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या आनंदात व्यत्यय आणत असल्याबद्दल क्षमस्व.

- सुनील घुमे
..................

मुंबई मराठी पत्रकार संघ
वेब जर्नलिझम कोर्स

2012 या वर्षात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच सुरू करण्यात आलेल्या वेब जर्नलिझम कोर्सला आता जवळपास चार महिने पूर्ण झाले आहेत. या चार महिन्यात आपण नेमके काय साध्य केले, कुठून कुठपर्यंत आलो, याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने ही छोटीशी प्रश्नावली तयार केली आहे. या कोर्सबाबतचा आपला अनुभव, आपण सर्वांनी अत्यंत प्रांजळपणे, मनमोकळेपणाने कळवावा आणि काही उणिवा असतील तर त्या निदर्शनास आणाव्यात, या एकमात्र उद्देशाने ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.

आपण बिनधास्त आणि बेधडक मतप्रदर्शन केल्यास ते आपल्या आणि अर्थात कोर्सच्याही हिताचे असेल.

नाव -

ई मेल आयडी -

संपर्क क्रमांक -

ब्लॉग -

स्वतःचा ब्लॉग अपडेट करता येतो का? नसल्यास आणखी किती वेळ लागेल?

मराठीतून युनिकोड फॉन्टमध्ये संगणकावर टायपिंग करता येते का? नसल्यास आणखी
किती वेळ लागेल?

वेब जर्नलिझम कोर्ससाठी प्रवेश घेण्याची ठळक कारणे -

कोर्स शिकत असताना येणा-या अडचणी, समस्या -

या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलेत?

कोर्सशी संबंधित आतापर्यंत झालेल्या लेक्चर्सपैकी आवडलेली लेक्चर्स कोणती आणि का?

कोर्सशी संबंधित आतापर्यंत झालेल्या लेक्चर्सपैकी न आवडलेली लेक्चर्स कोणती आणि का?

लेक्चरर्सनी आपल्या शंकांचे योग्य निरसन केले का?

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे कोर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था समाधानकारक आहे का? नसल्यास आणखी काय करायला हवे?

कोर्सदरम्यान स्वतःच्या प्रगती झाली असे वाटते का? असल्यास काय प्रगती झाली? आणि नसल्यास कारणे काय?

ज्या उद्देशाने आपण कोर्ससाठी प्रवेश घेतला, तो उद्देश साध्य होताना दिसतो आहे का? (नसल्यास थोडक्यात कारणे सांगा.)

या कोर्ससाठी आपण दिलेली फी सत्कारणी लागली असे वाटते का?

याव्यतिरिक्त आणखी काही सूचना, आक्षेप, हरकती, अडचणी -


No comments:

Post a Comment