Sunday, 30 December 2012

वेब जर्नलिझम कोर्स आढावा

हाय,

कृपया खालील प्रतिसाद अर्ज तत्काळ भरून, तो पुन्हा मेल करावा, ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती.
तुमच्या थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या आनंदात व्यत्यय आणत असल्याबद्दल क्षमस्व.

- सुनील घुमे
..................

मुंबई मराठी पत्रकार संघ
वेब जर्नलिझम कोर्स

2012 या वर्षात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच सुरू करण्यात आलेल्या वेब जर्नलिझम कोर्सला आता जवळपास चार महिने पूर्ण झाले आहेत. या चार महिन्यात आपण नेमके काय साध्य केले, कुठून कुठपर्यंत आलो, याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने ही छोटीशी प्रश्नावली तयार केली आहे. या कोर्सबाबतचा आपला अनुभव, आपण सर्वांनी अत्यंत प्रांजळपणे, मनमोकळेपणाने कळवावा आणि काही उणिवा असतील तर त्या निदर्शनास आणाव्यात, या एकमात्र उद्देशाने ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.

आपण बिनधास्त आणि बेधडक मतप्रदर्शन केल्यास ते आपल्या आणि अर्थात कोर्सच्याही हिताचे असेल.

नाव -

ई मेल आयडी -

संपर्क क्रमांक -

ब्लॉग -

स्वतःचा ब्लॉग अपडेट करता येतो का? नसल्यास आणखी किती वेळ लागेल?

मराठीतून युनिकोड फॉन्टमध्ये संगणकावर टायपिंग करता येते का? नसल्यास आणखी
किती वेळ लागेल?

वेब जर्नलिझम कोर्ससाठी प्रवेश घेण्याची ठळक कारणे -

कोर्स शिकत असताना येणा-या अडचणी, समस्या -

या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलेत?

कोर्सशी संबंधित आतापर्यंत झालेल्या लेक्चर्सपैकी आवडलेली लेक्चर्स कोणती आणि का?

कोर्सशी संबंधित आतापर्यंत झालेल्या लेक्चर्सपैकी न आवडलेली लेक्चर्स कोणती आणि का?

लेक्चरर्सनी आपल्या शंकांचे योग्य निरसन केले का?

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे कोर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था समाधानकारक आहे का? नसल्यास आणखी काय करायला हवे?

कोर्सदरम्यान स्वतःच्या प्रगती झाली असे वाटते का? असल्यास काय प्रगती झाली? आणि नसल्यास कारणे काय?

ज्या उद्देशाने आपण कोर्ससाठी प्रवेश घेतला, तो उद्देश साध्य होताना दिसतो आहे का? (नसल्यास थोडक्यात कारणे सांगा.)

या कोर्ससाठी आपण दिलेली फी सत्कारणी लागली असे वाटते का?

याव्यतिरिक्त आणखी काही सूचना, आक्षेप, हरकती, अडचणी -


Tuesday, 11 December 2012

वेब जर्नलिस्ट ब्लॉग्ज...

वेब जर्नलिस्ट मित्रांनो,

सर्वांच्या ब्लॉग्जच्या एकत्रित लिंक्स....
बाकीच्यांनी आपल्या लिंक्स याठिकाणीच अपडेट कराव्यात.
...............

नीता मोहिते
http://neetamohite.blogspot.in/

अश्विनी गमरे
http://ashwinigamare.blogspot.in/

प्रतिमा कांबळे
http://prtmkamble22.blogspot.in/

धीरज घोलप
http://dhirajgholap.blogspot.in/

अरूणा शिंदे
http://arunashinde1318.blogspot.in/

अभिजीत चव्हाण
http://connectprabhat.blogspot.in/

नितीन पवार
http://08nitin.blogspot.in/

श्रीराम केणी
http://shreeramkeny.blogspot.in/

ममता सोनार
http://sonarmamata.blogspot.in/

मीनल माळी
http://minalreport.blogspot.in/

नमिता वारणकर
http://namitawarankar.blogspot.in/

कीर्ति कुलकर्णी
http://anulekhan.blogspot.in

नितीन मोरे
http://bedhundhmanachilahar.blogspot.in/

Monday, 10 December 2012

माझ्या वेब जर्नलिस्ट सहका-यांसाठी ही माझी ब्लॉग लिंक
http://connectprabhat.blogspot.in/

आता, मोबाईल वरून पाठवण्याद्वात येणाऱ्या एसमएस लेन्स रे वाचू शकतो.

Subject : Science & Technology.

Now, SMSs can be projected on your contact lens
PTI | Dec 10, 2012, 05.53 AM IST

LONDON: Scientists have developed a new technology that allows electronic messages sent from mobile phones to be directly projected on to contact lens placed in the recipient's eyes. 

The technology, developed by Belgian researchers, allows information such as text messages from a mobile phone to the contact lenses. 

Ghent University's centre of micro-systems technology developed the spherical curved LCD display which can be embedded in contact lenses and handle projected images using wireless technology, The Telegraph reported. 

The new technology allows the whole curved surface of the lens to be used, unlike previous contact lens displays, which are limited to a few small pixels to make up an image. One application suggested by the researchers is a "one pixel, fully covered contact lens acting as adaptable sunglasses" . 

"This will never replace the cinema screen for films. But for specific applications it may be interesting to show images such as road directions or projecting text messages from our smart phones straight to our eye," said professor Herbert De Smet. 


आता, मोबाईल वरून पाठवण्यात येणाऱ्या एसमएस लेन्स द्वारे वाचू शकतो.

लंडन : तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज काही होईल ह्याचा काही नेम नाही. ह्याच क्षेत्रात संशोधकांनी एक पाऊल पुढे ठेवत एक शोध लावला आहे. डोळ्यात लावण्यात येणाऱ्या लेन्स द्वारेच मोबाईल वरून पाठवण्यात येणाऱ्या एसमएस वाचू  शकणार आहे.
हे  तंत्रज्ञान  बेल्जियमच्या संशोधकांनी शोधले असून मोबाईल वरून पाठवलेले मेसेज थेट कॉन्टॅक्ट लेन्सवर पाहता येतात.घेंट विद्यापीठाच्या सेंटर ऑफ मायक्रो सिस्टीम टेक्नॉलॉजीने अर्धवर्तुळाकारएलसीडी डिस्प्ले तयार केला असून तो कॉन्टॅक्ट लेन्समध्ये बसविता येतो आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर इमेज दिसतात.
या नव्या तंत्र ज्ञाना मध्ये अर्धवर्तुळाकारएलसीडी डिस्प्ले हा  त्यामागील कॉन्टॅक्ट लेन्ससचा डिस्प्ले  लहान आकाराची इमेज बनवण्यासाठी सीमित आहे.सिनेमासाठी त्याचा पर्याय कधीच होऊ शकत नाही.  प्रोफेसर हर्बर्ट दे स्मार्ट यांच्या मते विशिष्ठ प्रयोगासाठी काही इमेज रस्त्याच्या दिशेने आपल्या स्मार्ट फोन मधून सीधा आपल्या डोळ्यांसमोर संदेश द्वारे आपल्या समोर परिवर्तीत होतील.





                                                                                                    Posted By
                                                                                               Nitin Vasant More








Sunday, 9 December 2012

वेब जर्नलिझम च्या विद्यार्थांनी आपली ब्लॉगची लिंक ह्या पोस्ट मध्ये टाकावी.

नमस्कार
मी प्रतिमा हनुमंत कांबळे
माझ्या ब्लॉगची लींक देत आहे

http://prtmkamble22.blogspot.in/


धन्यवाद


नमस्कार मित्रहो.
मी नितिन वसंत मोरे. ही माझी ब्लॉग साईट आहे.


http://bedhundhmanachilahar.blogspot.in


www.saibaba123.wordpress.com


 हि मीनल माळी हिची 

ब्लॉगची लिंक 


minalreport.blogspot.in

http://anulekhan.blogspot.in/
http://sonarmamata.blogspot.in/
http://namitawarankar.blogspot.in/
http://minalreport.blogspot.in/
http://shreeramkeny.blogspot.in/
http://08nitin.blogspot.in/
http://connectprabhhat.blogspot.in/
http://neetamohite.blogspot.in/



                                                                                                            

Tuesday, 4 December 2012

मंदार फणसे आपल्या भेटीला

वेब जर्नलिस्ट मित्रांनो,
येत्या शनिवारी 8 डिसेंबर 2012 रोजी संध्या. 6 वाजता http://bharat4india.com/ या नव्या वेबसाइटचे संपादक मंदार फणसे आपल्या भेटीला येणार आहेत. टीव्ही अँकर आणि पत्रकार म्हणून ते आपणा सर्वांना परिचित आहेतच. झी अल्फा न्यूज, एनडी टीव्ही, सीएनएन आयबीएन, आयबीएन लोकमत अशी 13 वर्षांची त्यांची मुशाफिरी. आता नव्या वेबसाइटचे प्रमुख या नात्याने ते आपल्याशी आपले अनुभव शेअर करणार आहेत. तेव्हा सर्वांनी वेळेवर या...

Friday, 16 November 2012


नमस्कार  

          रविवार दि.३० सप्टेंबर २०१२ च्य़ा लोकसत्ता लोकरंग मध्य़े  श्री. गिरीश कुबेर य़ांचा चला चंगळवादी होऊय़ा ' हा लेख मी वाचला.पंतप्रधान मनमोहन सिंग य़ांनी घोषित केलेल्य़ा नव्य़ा आर्थिक सुधारणांना होणारा काही पक्षांचा विरोध,सरकारचे य़ाबाबतचे धोरण व पर्य़ाय़ाने एफ.डी.आय़. मुळे होणारा भारताचा काय़ापालट आणि विकासाची संधी य़ा महत्त्वाच्य़ा बाबी  श्री. कुबेर य़ांनी य़ा लेखात उत्तमरित्य़ा मांडल्य़ा आहेत.त्य़ांना प्रत्य़क्ष भेटून ऐकण्य़ाची संधी मला मिळाली.
          श्री.प्रमोद चुंचुवार सरांनी गुरूवार  दि. १० क्टोबर २०१२ रोजी आम्हा पत्रकार  होऊ इच्छिणा-य़ा विद्य़ार्थ्य़ांना शुक्रवार  दि.१२ क्टोबर २०१२ रोजी सह्य़ाद्री वाहिनीवर प्रदर्शित होणा-य़ा  सपट लोकमानस य़ा  परिसंवादात्मक कार्य़क्रमामध्य़े सहभागी होण्य़ास सांगितले.  य़ा  कार्य़क्रमाचा विषय़ होता भारताचे नवीन आर्थिक धोरण आणि त्य़ाचे भविष्य़.
          ठीक ४.३० वा. आम्हा सर्वांना स्टुडिओत नेण्य़ात आले. श्री.जय़ु भाटकर सर व त्य़ांची टीम शिस्तबद्धतेने स्टुडिओतली व्य़वस्था पार पाडत होते.पडद्य़ावर दिसणा-य़ांपेक्षा पडद्य़ामागच्य़ा कलाकारांना किती ऍलर्ट राहून काम करावे लागते हे आम्ही अनुभवले. कन्ट्रोलर रूममधून स्टुडिओतील लोकांना सूचना देण्य़ात य़ेत होत्य़ा.प्रत्य़ेक जण निय़ंत्रणात काम करत होता.
          ठीक ५.०० वा.कार्य़क्रम सुरू झाला. सूत्रसंचालक डॉ. समीरण वाळवेकर  य़ांनी उपस्थित वक्त्य़ांची ओळख करून दिली ती पुढीलप्रमाणे :-

१) डॉ. भालचंद्र मुणगेकर   :- भारताच्य़ा निय़ोजन आय़ोगाचे सदस्य़, राज्य़सभा सदस्य़, मुंबई विद्य़ापिठाचे माजी कुलगुरू व ज्य़ेष्ठ अर्थतज्ज्ञ.

२) डॉ. गिरीश कुबेर          :- दैनिक लोकसत्ताचे कार्य़कारी संपादकज्य़ेष्ठ  पत्रकार,  अर्थशास्त्राचे अभ्य़ासक.

३) श्री. व्य़ंकटेश कुलकर्णी       :- कृषीतज्ज्ञ व उद्य़ोजक

४) श्री. विनय़ सहस्रबुद्धे     :अर्थविश्लेषक  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक.

     सर्वप्रथम डॉ.मुणगेकर य़ांना आपले मत वाळवेकर य़ांनी विचारले असता  मुणगेकरांनी सरकारचे एफ. डी.आय़. धोरण आपल्य़ा देशाच्य़ा अर्थव्य़वस्थेला बळकटी आणणार असल्य़ाचे ठामपणे सांगितले.
      डॉ.गिरीश कुबेर  म्हणाले, "भारताच्य़ा अर्थव्य़वस्थेला शिस्त व बळकटी  आणण्य़ासाठी हे धोरण ऊपय़ुक्तच आहे.आपल्य़ाकडे आर्थिक शिस्त नसल्य़ाने व सर्वसामान्य़ जनता य़ा आर्थिक बाबतीत साक्षर नसल्य़ाने  आपल्य़ा देशातील शेतक-य़ाचे व ग्राहकाचे नुकसान होते.शेतक-य़ाकडून एफ.डी.आय़. प्रत्य़क्ष माल विकत घेऊन,त्य़ाची य़ोग्य़ साठवणूक करून ती जनतेला विकत असेल तर हे चांगलेच आहे.य़ामुळे हा  चंगळवाद देशाच्य़ा फाय़द्य़ासाठीच  असल्य़ाने  त्य़ाला विरोध का करावा ? "
     श्री.व्य़ंकटेश कुलकर्णी म्हणाले, " मी शेतक-य़ांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे.शेतक-य़ांना य़ा धोरणाबाबतची संपूर्ण माहिती दिल्य़ास ६ लाख खेड्य़ातील शेतक-य़ांना य़ाचा फाय़दा होणार आहे.प्रत्य़ेक वस्तूचे A.B.C.D. ग्रेडिंग करून उत्पादन विकल्य़ास शेतकरी,जनता व पर्य़ाय़ाने संपूर्ण भारताला य़ाचा फाय़दा होणार आहे ".
     मात्र श्री.विनय़ सहस्रबुद्धे य़ांनी "हा सरकारचा टंगळमंगळ वाद आहे ", असे म्हणत विरोध दर्शविला. शेतक-य़ांना य़ंत्रांची,साठवणूकीची माहिती दिली पाहिजे तर त्य़ांचा विकास होईल असे ते म्हणाले.

     प्रेक्षकांमध्य़े बॅंकिंग क्षेत्रातले, व्य़ापारी क्षेत्रातलेशेतकरी, विद्य़ार्थी असे विविध क्षेत्रातले लोक उपस्थित होते. प्रेक्षकांतील निवडक लोकांना त्य़ांच्य़ा प्रतिक्रिय़ा डॉ.वाळवेकरांनी विचारल्य़ा असता  डॉ. आंबेडकर कॉलेज ,वडाळा  य़ेथील  अर्थशास्त्र  विषय़ाच्य़ा प्राध्य़ा.सुमित्रा पराडकर   य़ांनी ,"सरकारच्य़ा य़ा धोरणामुळे सामान्य़ माणूस भरडला जातोय़ " असे मत दिले.
      बाजारसमितीचे प्रतिनिधी म्हणून आलेले श्री.संजय़ पानसरे  य़ांनी  य़ा   धोरणाला प्रचंड विरोध दर्शविला.
          उद्य़ोगपती  राजीव पो-हाडे  म्हणाले , " य़ा  धोरणामुळे  खेड्य़ातील   बेरोजगारांना  रोजगाराच्य़ा प्रचंड संधी उपलब्ध होतील ".
          सारस्वत बॅंकेचे महाव्य़वस्थापक आनंद खोत य़ांनी य़ामुळे  बॅंकिंग क्षेत्राला बळकटी य़ेईल असे सांगितले.

          हे सर्व सुरू असताना दूरध्वनीवरून  महाराष्ट्राचे अर्थमंत्री  श्री. जय़ंत पाटील  म्हणाले की , "सामान्य़ माणसाला कशी मदत करता य़ेईल य़ावर आम्ही मंत्रिमंडळ विचार करत असून झालेल्य़ा निर्णय़ानंतर प्रतिक्रिय़ा देऊ ", असे त्य़ांनी सांगताच स्टुडिओत एकच हशा उसळला.

     कार्य़क्रमाच्य़ा शेवटी सर्व वक्त्य़ांचे एकमत य़ावरच झाले की, प्रत्य़क्ष शेतक-य़ांकडून माल विकत घेतला जावा व मधल्य़ामध्य़े गब्बर होणा-य़ा दलालांचा य़ातला वावर बंद केला जावा तरच  शेतक-य़ाला त्य़ाच्य़ा उत्पादनाचा य़ोग्य़ तो फाय़दा मिळेल, ग्राहकांनाही य़ोग्य़ तो फाय़दा मिळेल. पर्य़ाय़ाने आपल्य़ा देशाची अर्थव्य़वस्था बळकट होऊन शिस्तबद्धतेने काम करत जाईल आणि आपल्य़ा देशाची विकासात्मक प्रगती साधता य़ेणं सहजशक्य़ होईल.

     अशा त-हेने हा कार्य़क्रम ठीक ६.०० वा.संपला असे श्री.जय़ु भाटकर सरांनी जाहिर केले आणि आम्ही तेथून आमच्य़ा  पत्रकारितेच्य़ा क्लासला य़ाय़ला निघालो.


                                                                                                              - प्रतिमा ह. कांबळे

Thursday, 25 October 2012

विषय : ई - पेपर.


Date : 13/10/2012                                     व्याख्याता : जयकृष्ण नायर आणि प्रमोद गणेशे



ई - पेपर म्हणजे काय?
छापील अंक आहे तसा इंटरनेट वर उपलब्ध करून देणे त्याला ई - पेपर असे म्हणतात. ऑनलाइन न्यूज़ पेपर अथवा वेब न्यूज़ पेपर दैनिकाचा extanded part.
ई - पेपरचे प्रकार
तंत्राद्यानामुळे  ई - पेपर अधिकाधिक चांगला आणि रिदर्ड्स. 
epaper with text and newspaper view lokmat.
Text and image format.
epaper with flick book. 
epaper मध्ये पेपर user friendally ठेवायचा प्रयत्न.

http://epaper.mailtoday.in
http://www.mid-day.com/epaper/
test and newspaper view 

epaper with readout feature (like podeast)
केवळ online epaper 
southportreporter.com

काही उत्तम ई - पेपर 
Times of India 
The Hindu (केवळ डेमो)
Sakal 
Lokmat
Prahaar .

E - paper redars interaction 
Archives Exp : times of india सारखे वृत्तपत्राने The Times of India (11 आवृत्या).
The Economic Times (चार आवृत्या). आणि mirror (चार आवृत्या) या दैनिकांचे अनुक्रमे २००३,२००४, आणि २००५ पासूनचे अंक online उपलब्ध करून दिले आहेत. सर्वसाधारण एक वर्ष ते तीन महिन्या पर्यंतचे अंक उपलब्ध होऊ शकतात.

ई - पेपर साठीचे तंत्रज्ञान (Technology used in epaper)
Technology used for designing and development of epaper is HTML, flash, PHP, MYSQL, ASP,NCT, MS, SQL, JAVA etc.

ई - पेपर आणि लाईव वेबसाइट  ई - पेपर सोबत ताज्या बातम्या प्रहार आणि लोकमत.
ई - पेपर mobile apps 
ई - पेपर मोबाइलवर रीडर्स फ्रेंडली दिसेल यासाठी विशेष  mobile apps .
मोबाइलवर वेगाने डाउनलोड .

२४*७  वेबसाइट असताना ई - पेपरची काय गरज? 
वाचकांची सवय 
वृत्तपत्र वाचण्याचा फिल 
वाचकांच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न.

भविष्यातील ई -  पेपर 
मोबाइलवर सहज आणि वेगाने ओपन होतील.( टेबलेट).

ई - मासिक 
लोकप्रभा (साप्ताहिक)
http://lokprabha.loksatta.com

अनुभव मासिक 
http://www.newseum.org/todaysfrontpages/

काही महत्वाच्या वेबसाइट
http://www.newseum.org/todayfrontpages/
www.epapergallary.com
pressdisplay.com


                                                                                            Nitin More

 

जाहिरात



Date : 11/09/2012                                                                  व्याख्याता :विजय  पाध्ये.

जाहिरात म्हणजे काय ?

आपण एखादी गोष्ट करून लोकांकडे पोहचवतो तिला 'जाहिरात' असे म्हणतात . 
'दवंडी' हि जाहिरातीची पहिली सीडी आहे. जाहिरात म्हणजे आपण जी जाहिरात करून लोकांसमोर सादर करणार आहे तिला जाहिरात बोलतात. जाहिरातीचा पहिल्या मुळा पासून अभ्यास केला तर पहिला जाहिरात हि म्हणजे राजे महाराजांच्या काळात एखादी गोष्टा किवा वार्ता पूर्ण शहरभर आणि पूर्ण पंच कृषित सांगायची असेल तर ती एकाद्या माणसाद्वारे संपूर्ण गावात दवंडी पीटवून सांगितली जात असे जेणे करून राजा चा त्या काळी जो फर्मान असे तो दवंडी मार्फत लोकांकडे पोहोचवला जात असे. नंतर कालांतराने त्या मध्ये बदल होत गेले सुरुवातीला तुतारी नंतर दवंडी पीटवने असे होत असे नंतरच्या काळात wall painting जाहिराती होत असे. नंतर कालांतराने जाहिरात ह्या प्रकारे प्रसिद्ध होऊ लागली रेडीओ, टीवी,glosure , Hordingdz, wall painting ह्या माध्यमातून जाहिरात देण्याचे प्रमाण वाढू लागले.  
जाहिरात करताना पुढील बाबी आवश्यक 
जाहिरात करताना copy wirter, art director पाहिजे. तसेच जाहिरात करताना सृजनशीलता, कल्पकता हे महत्वाचे गुण असणे गरजेचे आहे .
लोकसत्तेचा वाचक हा novelty च्या मागे असतो. महाराष्ट्र टाइम्स  हा highly qualifyed असल्या कारणाने त्यांना त्या प्रकारच्या न्युज द्यावी लागतात. तसेच कम्यूनिकेशन  ची साधना जरा चालवायची असेल तर जाहिराती शिवाय पर्याय नाही आहे.  जाहिराती मध्ये इतका स्कोप त्या मध्ये करू तेवढे कमीच.

सर्वात जास्त खपाचे मासिक : मनोरमा मल्याळम.

जाहिरात करताना आपल्या आपण ती लोकांसमोर अशी मांडली पाहिजे कि तुम्हाला ग्राहक हा mouth publicity मधून मिळाला पाहिजे. जाहिरात हे एक असे माध्यम आहे जे तुम्ही काही केलाय ते  लोकांसमोर चांगल्या प्रकारे पोहचले पाहिजे. जाहिरात अशी केली पाहिजे कि ती करताना आपल्याला त्या जाहिरातीतून त्या brand ची loyality जपली पाहिजे आणि त्या साठी जाहिरात अशी बनवावी कि त्यातून लोकांसमोर चांगली जाहिरात समोर देवून त्या brand ची जपणूक करावी लागते. exp: कालनिर्णय, cadbury. कालनिर्णय हि जाहिरात लोकांच्या अशी मनावर बिंबली आहे कि भिंती वर कोणती दिग्दर्शिका पाहिजे तर कालनिर्णय. जाहिराती मध्ये marketing हा मोठा गुरु आहे. कला, व्यवसाय, धंदा, काय आहे जाहिरात आहे. आणि जाहिरात करताना प्रत्येक वेळी positive sense असणे गरजेचे आसते आणि जाहिरात करताना कधीच अडचणी येत नाहीत. आणि जाहिरात करताना ग्राहकांची नीती मूल्याता  जपली पाहिजे.

                                                                                                   Nitin More 

विषय- इलेक्ट्रोनिक मिडिया व रिपोर्टिंग

                                                                                 
      Date : ४/१०/२०१२                                                          व्याख्याता  : शशिकांत सांडभोर .


इलेक्ट्रोनिक मिडिया दोन प्रकारे काम केले जाते 
१. BBC  २. CNN

इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना patience असले पाहिजे. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना दोन बंधन पाळले जाते एक म्हणजे जास्तीत जास्त ऐकावे आणि दुसरे म्हणजे लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधा. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये रिपोर्टिंग करताना कोणाचेही अनुकरण करू नये आणि आपली स्वतःची बोलण्याची style असली पाहिजे. 
चॅनल मध्ये दोन आउट पुट्स असतात 1. इनपुट 2. आउटपुट  जिथे आपल्याला बातमी करायची आहे आणि जिथे स्टोरी आइडिया आणि बातमीची विषमता किवा विश्वासहरता असते तिथे बातमी होते. इलेक्ट्रोनिक मिडिया हे चोवीस तासाचे राक्षस आहे त्याला काहीना काही सारखा खायला द्यावे लागता त्यासाठी कोणत्या बातमी मधून कोणती बातमी करायची ह्याचे सेन्स पत्रकाराला असले पाहिजे.

पत्रकारिता करताना पत्रकाराला आवश्यक असणारे गुण 
१. पत्रकाराला न्युज सेन्स असला पाहिजे.
२. प्रश्न पडले पाहिजे.
३. पत्रकाराने source दुसर्यांना सांगू नये.
४. चांगला ऐकणारा चांगला पत्रकार होऊ शकतो.
५. professional आणि निर्भीड असले पाहिजे.
६. प्रश्न विचारण्याची पद्धत हि आक्रमक आणि शांत असली पहिजे.
७. पत्रकारिता करत असताना पाय जमिनीवर ठेवा.
८. आपण जी बातमी देणार आहोत त्याचा अभ्यास खोल वर करावा.
९. व्यक्तिमत्व चांगले ठेवा आणि संवाद कौशल्य चांगले ठेवा.


इलेक्ट्रोनिक माध्यमामध्ये मुलाखती घेण्याचे प्रकार सांगितले ते पुढीलप्रमाणे- 
phono, one to one, walker, opening p2c, closing p2c, MCR

                                                                                                 ni3more

Wednesday, 24 October 2012

४/१०/२०१२ 
 व्यक्ते- शशिकांत सांडभोर 
    विषय- इलेक्ट्रोनिक मिडिया व रिपोर्टिंग.



                  
शशिकांत सर यांनी  इलेक्ट्रोनिक माध्यमाचा इतिहास सांगताना म्हणाले कि १९९० मध्ये झी टि.वी. हे पहिले Private channel निघाले तसेच त्यांच्या वाहनाला ओ. बी  outdoor broad-casting van म्हणतात.

 इलेक्ट्रोनिक माध्यमामध्ये मुलाखती घेण्याचे प्रकार सांगितले ते पुढीलप्रमाणे- 
phono, one to one, walker, opening p2c, closing p2c, MCR


एका चांगल्या पत्रकारचे गुण त्यांनी पुढीलप्रमाणे  सांगितले.- 

१) न्यूज सेन्स असला पाहिजे. 


२) पत्रकाराला प्रश्न पडले पाहिजे. 


३) पत्रकाराने आपला बातमीचा source दुसऱ्यांना सांगू  नये. 


४)चांगला ऐकणारा चांगला पत्रकार होऊ शकतो.


५) पत्रकाराने आपल्या पत्रकारीते मध्ये Professional  असले पाहिजे. 


६) पत्रकाराने निर्भीड असले पाहिज. 


७) परिस्थिती नुसार प्रश्न विचारण्याचे स्कील अवगत केले पाहिजे.- शांत व आक्रमक 


८) पत्रकाराचे पाय जमिनीवर असले पाहिजे. 

९) बातमीचा अभ्यास खोलवर करावा. 

१०)व्यक्तिमत्त्व चांगले ठेवा.(प्लेन शर्ट घालावे)  पत्रकाराने संवाद कौशल्ये विकसित केले पाहिजे. 

११)पत्रकाराने हजरजवाबी पण दाखवला पाहिजे 

१२).पत्रकाराने स्वत:चे Branding करता आले पाहिजे. हे आजच्या पत्रकारीते मध्ये महत्वाचे आहे. 

१३)आपले मत निर्भीडपणे व्यक्त करता आले पाहिजे. 


१४) बातमीत सातत्य असले पाहिजे.Follow up असला पाहिजे. 


शशिकांत  सरांनी  नवोदित पत्रकाराला उपयुक्त पडतील अशी काही पुस्तके सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे- 

१)नापास मुलांची गोष्टी. 

२) खाती ज्यांच्या शून्य होते.- अरुण शेवरे. 

३)साडेसातच्या बातम्या- समीर वाळवण.

          
             अशा प्रकारे शशिकांत सरांनी मुलभूत मार्गदर्शन केले 


                                                                                                       श्रीराम केणी





Saturday, 20 October 2012

ई-पेपर सादरीकरण

वेब जर्नलिझमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा ई-पेपर विषयावर prahaar.in चे जयकृष्ण नायर आणि प्रमोद गणेशे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले, त्या सादरीकरणातील हे ठळक मुद्दे...
..............

संकल्पना

इंटरनेटची सुरूवात
इंटरनेटवरील वाचकांसाठी माध्यमांचा प्रवास वेब मिडियाकडे
ई-पेपरची प्राथमिक अवस्था
भाषिक वृत्तपत्रांच्या अडचणी आणि मर्यादा
बदलत्या तंत्रज्ञानामुळे ई-पेपर अधिक उत्तम होत गेला
.................

ई-पेपर म्हणजे काय?

छापील अंक आहे तसा इंटरनेटवर उपलब्ध
ई-पेपर, ऑनलाइन न्यूजपेपर, अथवा वेब न्यूजपेपर दैनिकांचा Extended Part
...............

ई-पेपरचे प्रकार

तंत्रज्ञानामुळे ई-पेपर अधिक अधिक चांगला आणि रिडर्स फ्रेंडली

Simple Picture Epaper
उदा- http://epaper.esakal.com
.....................

वृत्तपत्रासारखाच दिसणारा ई पेपर

http://epaper.prahaar.in/

http://epaper.pudhari.com
...............

वृत्तपत्रासारखेच दिसणारे तसेच स्वतंत्र मजकूर निवडता येईल असे ई-पेपर

http://epaper.lokmat.com/

http://epunyanagari.com
..............


पुस्तकांसारखी पाने उलटता येतील असे ई पेपर

http://epaper.mailtoday.in

http://www.mid-day.com/epaper/ (text &
Newspaper view)
................

बातम्या ऐकता येतील असे ई-पेपर (पॉडकास्ट सुविधेसह)

केवळ ऑनलाइन ई-पेपर


southportreporter.com
...................

काही उत्तम ई-पेपर

Times of india
The Hindu (केवळ डेमो)
Sakal
Lokmat
Prahaar
Loksatta
Prahaar
............

ई-पेपर आणि वाचकांशी सुसंवाद

ई-पेपरमध्ये रिडर्ससाठी चांगले फिचर्स
मोफत ई-पेपर
द हिंदूचा अपवाद (175 रूपये)
द हिंदूचे वेगळेपण
...............

ई-पेपर पीडीएफ
.................

Archives
उदा. times of india सारख्या वृत्तपत्राने The Times of India (11 आवृत्त्या),
The Economic Times (चार आवृत्त्या) आणि
Mirror (चार आवृत्त्या) या दैनिकांचे अनुक्रमे
2003, 2004 आणि 2005 पासूनचे अंक ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.

सर्वसाधारणपणे एक वर्ष ते तीन महिन्यांपर्यंतचे अंक उपलब्धध
...............

ई-पेपरसाठीचे तंत्रज्ञान (technology used in epaper)

Technology used for designing and
development of epaper is , HTML,
Flash, PHP, MYSQL,ASP.NET, MS SQL
JAVA etc...
.................

ई-पेपर आणि लाईव्ह वेबसाईट

ई-पेपर सोबत ताज्या बातम्या

उदा. प्रहार आणि लोकमत
....................

ई-पेपरसाठीचे business model

जाहिराती -
ई सकाळच्या छोट्या जाहिराती

http://imcl.in/epaper/
................

ई-पेपर mobile apps

ई-पेपर मोबाईलवर रिडरफ्रेंडली दिसेल यासाठी विशेष mobile apps

मोबाईलवर वेगाने डाऊनलोड
...........

24x7 वेबसाईट असताना ई-पेपरची काय गरज?

वाचकांची सवय
वृत्तपत्र वाचण्याचा फिल
वाचकांच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न
...............

भविष्यातील ई-पेपर-

मोबाइलवर सहज आणि वेगाने ओपन होतील
टॅबलेट
...............

ई-मासिके

लोकप्रभा (साप्ताहिक) http://lokprabha.loksatta.com

अनुभव मासिक http://uniquefeatures.in/anubhav

http://www.mediummagazin.de/ (जर्मन)
................

काही महत्त्वाच्या वेबसाइट

http://www.newseum.org/todaysfrontpages/

जगभरातील ८००हून अधिक वृत्तपत्रे

http://www.epapergallery.com
..............

ई-पेपर कसा तयार करतात...
..............

धन्यवाद

- जयकृष्ण नायर आणि प्रमोद गणेशे

Friday, 12 October 2012

रेडिओ पत्रकारिता

Date : १४-०८-२०१२                                                       व्याख्याता :  नरेंद्र विसपुते 


                                                    विषय : रेडिओ पत्रकारिता  

रेडिओचा इतिहास

भारतातला पहिला  रेडिओ स्टेशन २३ जुलै १९२७ ला सुरु झाला. सर्वात पहिला ० ते ५० हे रेडिओ स्टेशन होते. ते पुढील प्रकारे विभागलेले होते.
० ते २० -  Ship Air Controller .
२० ते ५० - Walky Talky & Security System. 

रेडिओचे रिपोर्टिंग करताना आपल्याला पुढील प्रकारे काम करावे लागते.
 News Writing 
 News Reporting
 News Editing
 News Recording
 News Reading
 News Buletin 
 News Read / Programme
 News Forwared / Drama 
 News Transalation 
नेहमी टी वी  समोर बसून बातम्या सांगताना आपली बसण्याची पद्धत व्यवस्थित असेल तर आपण तास काय दोन दोन तास बसून टी वी वर बातम्या देऊ शकतो. आणि नेहमीच बोलण्याची पद्धत हि नीट - नेटकी आणि व्यवस्थित असली पाहिजे.आणि आपण जे मध्यम जो  मेसेज पास करायचा आहे त्यासाठी जो माध्यम वापरला जातो त्याला Decode करतात आणि सांगतात कि आम्हाला कळतंय असा response आपण घेतला तर आपल्याला communication करताना communication gap समजायला पाहिजे.त्याशिवाय आपण communication करू नाही शकत. आपण जी बातमी देणार आहोत त्याची आपल्या कडे उत्तम व  सुटसुटीत प्रिंट किवा लिहिले पान असले पाहिजे म्हणजे बातमीचे format तयार पाहिजे.जेणे करून बातम्या सांगताना त्रास होणार नाही. आणि बातम्या सांगताना बातमी डोक्यात तयार पाहिजे जेणे करून बातम्या सांगताना सोयी चे होईल.
स्टूडियो किंवा टी वि समोर बातम्या वाचून सांगत असताना आपल्याला कोणत्या बातमी सांगून झाल्यानंतर कुठे थांबायचे आहे. बातमी वाचून सांगत असताना आपल्याला कोणत्या बातमी सांगून झाल्यानंतर कुठे थांबायचे आहे आणि बातमी वाचत असताना कोणती टोन ठेवायची आहे ते ठरवून घ्यावे आणि कोणत्या ओळ वाचून कुठे थाबयाचे आहे ते आणि कुठे स्ट्रेस द्यायचा आहे ते ठरवून मगच बातमी सांगावी. जरा समजा  आपण बातम्या सांगत असताना मधेच चुकीचे बोललो तर आपल्याला जी चुक झाली असेल त्यामध्ये  सुधार करून माफ़ करा असे बोलले पाहिजे जेणे करून सर्वाना समजावे. आणि अचानक कधी एखादा बदल झाला बातमी वाचत असताना तर लगेच रिअक्ट करून बोलले पाहिजे आता आता आलेल्या बातमी नुसार असे बोलून ती बातमी सांगितली पाहिजे.EXP : जर एखादी बातमी सांगताना मधेच समजा सचिन ने शतक पूर्ण केले अशी बातमी मधेच आली तर आपल्याला अश्या प्रकारची बातमी लगेच सांगावी लागते. तसेच बातम्या सांगण्याच्या आधी आपल्याला ज्या रेपोर्टेर ने बातम्या लिहून दिल्या असतील त्याच्या कडून पहिला त्या बातम्या निश्चित करून घेणे आणि हा शब्द कोणता हे विचारावे आणि आपण जे वाचणार आहोत ते स्वतःशी  confimed करून घेणे. exp : Vispute / Dispute , महाजन/ परांजपे ईत्यादि. 


                                                                                                      Posted By 
                                                                                                      Nitin More