Monday, 17 September 2012

लॉगॉन..

नेहमीचा अभ्यास बोअर होतोय.?
आपलं ‘जी.के.’ दाखवून कुणाला इम्प्रेस करायचंय.?
डोक्याला द्यायचां खुराक नवा.? - मग या साइट्स पाहा.

हाय ! 
कॉलेज सुरू झालं. पहिलावहिला फ्रेण्डशिप डेही पार पडला. आता हळूहळू अभ्यास आणि प्रोजेक्ट्ससुद्धा वाढतील. या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करणार्‍या अनेक वेबसाइट्स आहेत. ज्या आपल्याला ‘अप टू डेट’ तर ठेवतीलच पण बोअरिंग वाटणारा विषय इंटरेस्टिंग पण होईल.

http://www.admissionnews.com 
एखाद्या कोर्सची माहिती हवी असेल त्यासाठीच्या परीक्षा कधी होणार आहेत, फॉर्म कधी मिळणार या सगळ्यावर लक्ष ठेवणारी ही वेबसाइट. देशभरातल्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेसमधले कोर्सेस इथे आहेत. शिवाय वेगवेगळ्या परीक्षांचे रिझल्ट्स, स्कॉलरशिप्स याचीही माहिती इथे मिळेल. 

http://www.refdesk.com/ 
तुम्हाला जर वेगवेगळ्या विषयांवरची माहिती रोज हवी असेल तर ही एक भन्नाट साइट. या वेबसाइटच्या होम पेजवरच त्या दिवसाचा इतिहास, बातम्या, महत्त्वाचे वाढदिवस, आणि लेख वाचायला मिळतील. तर जगभरातल्या वेगवेगळ्या पेपरच्या त्यांचे संपादकीय, लेख हेदेखील वाचायला मिळतील. 

http://www.gutenberg.org/ 
भरपूर वाचणार्‍यांसाठी ही एक मेजवानी. या वेबसाइटवर तब्बल ३९,000 पुस्तकं आहेत. ही तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा किंडलवर डाउनलोड क शकता. वेबसाइटवरच्या कॅटलॉग्समधून तुम्ही तुम्हाला हवं ते पुस्तक शोधू शकता. शिवाय इथे अनेर्क ीवळे लेज्ञी देखील आहेत.

http://www.khanacademy.org 
घरच्या घरी कोणताही विषय शिकवणारी ही वेबसाइट. तुमचा प्रायव्हेट क्लास. कारण इथे वेगवेगळ्या विषयांवरची लेक्चर्स आहेत. विषय सोपा करून दाखवणार्‍या आकृत्या आहेत. रअळ, ¬टअळ, ककळ खएए सारख्या परीक्षांची तयारी करून घेणार्‍या परीक्षादेखील आहेत. शाळा - कॉलेजसारखाच अभ्यास घरबसल्या शिकवणारी ही वेबसाइट.

http://www.iknowthat.com 
के जी पासून ते मोठय़ा वर्गांंंंसाठीच गणित, विज्ञान, इतिहास - भूगोल, भाषा धमाल गेम्स आणि व्हिडीओजच्या माध्यामतून इथे शिकता येतील. 

http://www.factmonster.com 
तुमचं जनरल नॉलेज दाखवून जर समोरच्या माणसाला इम्प्रेस करायचं असेल तर ही वेबसाइट वापरा. साहित्य, गणित, सायन्स, जगभरातल्या घडामोडी याविषयीची भन्नाट माहिती इथे आहे. 

www.math.com 
ऑनलाइन गणित शिकण्यासाठी ही वेबसाइट. बेसिक गणितापासून ते अगदी ट्रिग्नोमेट्रीपर्यंंंंत सगळ्या प्रकारांचं गणित इथे शिकता येईल. गणित फटाफट सोडवण्याच्या सोप्या पद्धतीदेखील इथे आहेत. 

http://www.howstuffworks.com/ 
एखादी गोष्ट का होते, यंत्र कशी चालतात, विज्ञानाची वेगवेगळी तत्त्व सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी ही वेबसाइट जरूर पाहा. मेंदूच्या रचनेपासून ते कारच्या रचनेपर्यंंंंत, भौगोलिक आश्‍चर्यापासून ते अगदी घरामागच्या बागेतल्या गोष्टीपर्यंंंंतचा सगळं काही इथे आहे. कुतूहल शमवणारी ही वेबसाइट.

या सगळ्यांशिवाय यु ट्यूब, 
National Geographic, TLC, Discovery Channel 
यांच्या वेबसाइट्सदेखील भरपूर माहिती देणार्‍या आहेत. सो या पाहा आणि कंटाळा वाटणारा अभ्यासदेखील रंजक करा.



                                                                                                        -  Ni3more

Sunday, 16 September 2012

रोजच वाचा... वेब आवृत्त्या

उत्तम वेब जर्नलिस्ट होण्यासाठी वाचन फारच आवश्यक आहे. आणि त्यातही विविध वर्तमानपत्रांच्या तसेच वृत्तवाहिन्यांच्या वेब आवृत्त्यांचे वाचन तर जास्तच गरजेचे आहे. खाली या वेब आवृत्त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. दिवसातून यापैकी किमान 5 वेब आवृत्त्या आपण वाचाव्यात, अशी अपेक्षा आहे....

1) वृत्तपत्रे -

महाराष्ट्र टाइम्स
लोकसत्ता
सकाळ
लोकमत
प्रहार
सामना
पुढारी
दिव्य मराठी
केसरी
ऐक्य
देशोन्नती
देशदूत
तरूण भारत
बेळगाव तरूण भारत
नवप्रभा (गोवा)
जनमाध्यम (अमरावती)

2) वृत्तवाहिन्या -

झी 24 तास
एबीपी माझा
आयबीएन लोकमत

- सुनील घुमे

मराठी युनिकोड फॉन्ट इन्स्टॉल करण्यासाठी...

इंटरनेटवर अनेक जण मराठीमध्ये लिहिण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. मात्र प्रत्येक computer अथवा laptopमध्ये अगदी सहज वापरता येणारा असा युनिकोड फॉन्ट असतो. केवळ तो कसा active करुन घ्यायचा याची माहिती नसल्याने अनेकांना मराठीत लिहिण्याची इच्छा असून ते इंग्रजीत टाइप करतात. विशेषतः मेल आणि चॅट करताना.
या सर्वांसाठी मराठी युनिकोड कसा active करावा, याची याची माहिती दै. प्रहारच्या वेबआवृत्तीचे प्रमुख श्री. जयकृष्ण नायर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तरपणे करून दिली आहे. त्यांच्या ब्लॉगवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....


- सुनील घुमे

Friday, 14 September 2012

गुन्हेगारी पत्रकारिता.



Date : ०७-०८-२०१२                                              व्याख्याता : श्यामसुंदर सोनार.

                                                                                विषय : गुन्हेगारी पत्रकारिता.


ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये पत्रकारिता कशी करावी हे सांगितले आहे ?

ज्ञानेश्वरीमध्ये पत्रकारिता करताना ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे कि आपण जी बातमी लोकांना देणार आहोत किवा सांगणार आहोत ती खात्रीलायक आणि सत्य सांगणारी असली पाहिजे तसेच तिच्यात नेमकेपणा असला पाहिजे. पत्रकारीते मध्ये ज्ञानेश्वर त्यांच्या ऐका अभंगातील ओळीचा उल्लेख करताना म्हणतात,
                                                     
                                            साच आणि मावळ मिथुले आणि रसाळ 
                                                  शब्द जैसे कल्लोळ अमृताचे !!!

आपण पत्रकारिता करताना आपण जी बातमी  लोकांना देणार  आहोत ती बातमी 'साच'  असली पाहिजे. साच म्हणजे सत्य असली पाहिजे. ती मावळ पद्धतीने  योग्य रुपात आणि तटस्त पणे लोकांसमोर मवाळ पद्धतीने मांडली  पाहिजे . ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे आपण बातमी देताना आपल्या बातमीतली आपली शैली शुद्ध आणि रसाळ असली पाहिजे जेणे करून कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही पाहिजे आणि जी बातमी मांडणार आहोत ती सत्य सांगणारी असावी.आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्या बातमी साठी एक छोटीशी जागा असते.  आपण एखादी गुन्हेगारी विषयक माहिती गोळा करण्यासाठी आपण त्या जागेवर जातो नंतर पोलीस स्टेशन मध्ये जातो तिथून माहिती गोळा करतो आणि एवढी पायपीट करून आपण माहिती गोळा करतो आणि आपण संपादन केलीली माहिती घेऊन आपल्या वृत्तपत्राच्या कार्यालयात जातो आणि विचार करतो आता मी ह्या बातमीला न्याय मिळवून देणार आणि तशी एक पूर्ण पान भर बातमी आपण लिहितो  पण आपल्या वृत्त पेपर मध्ये छोटीसी जागा असते आणि आपल्याला त्या जागेत  पुरेल  एवढीच माहिती लिहायची असते म्हणून आपण जी काही बातमी लिहणार आहोत ती अगदी छोट्या आशयामध्ये आणि त्या भागात बसेल एवढी माहिती लिहावी.शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ह्या मध्ये एका शब्दाचे दोन अर्थ कसे  होतात ह्याचे हे उत्तम  उदाहरण  ज्ञानेश्वरांनी समजून देताना एक उदाहरण सांगितले आहे. Exp : एक वृद्ध माणूस रांगेमध्ये उभा असतो आणि त्याचा पुढे असलेल्या माणसाला धक्का लागून तो खाली पडतो  तर तो माणूस रागवून त्या वृद्ध माणसा कडे पाहतो तर तो त्याला मारायला जातो तर तो वृद्ध माणूस त्या माणसाला बोलतो मी तुझ्या बापासारखा आहे. तर तो माणूस काहीच बोलत नाही आणि त्याला सोडून देतो. तर त्याने हेच उलटे बोलला असता तर कि मी तुझ्या आईच्या नवर्यासारखा  आहे तर तो माणूस त्याला हाणल्या शिवाय राहणार नाही. म्हणून दुसर्या वाक्याने अर्थाचे अनर्थ झाला. म्हणून पत्रकरिता करताना आपली लेखन शैली हि त्या  शब्दांचे दोन  शब्दांमध्ये  कल्लोळ करणारी नसावी ती शुद्ध आणि अर्थाचा अनर्थ करणारी नसावी.

गुन्हेगारी कशी निर्माण झाली?
गुन्हेगारी पत्रकारिता करताना पत्रकाराची लेखन शैली हि अतिशय  प्रभावशाली आणि शुद्ध असली पाहिजे. जेणे करून गुन्हेगारी पत्रकारिता 

करताना आपल्या लेखांवर कोणत्याही गुन्हेगाराने किवा पक्षाने आक्षेप घेतला नाही पाहिजे. आपण मुंबई मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात काम करत असताना गुन्हेगारी मध्ये जे काही घडते त्या गुन्हेगारीचे मागचे पुढचे संदर्भ माहित असणे गरजेचे असते. एक चाळीस वर्ष पासून मागे गेलो तर एक सत्तर च्या दशकात  संघटीत  गुन्हेगारी  नावारूपाला आली. संघटीत गुन्हेगारी  मध्ये खूप पैसा असल्या कारणाने ती पुढे खूप फोफावत गेली. सुरवातीला संघटीत गुन्हेगारी मध्ये दादा होते नंतर हळू हळू त्यानावाचे रुपांतर भाई असे नाव नावारूपाला आली होती मग पुढे - पुढे ड्याडी  असे नाव नावारूपाला आली.पहिला ह्या दादा ला ऐक  एरिया वाटून  दिलेला असायचा त्यांनी त्या एरिया मध्ये लोकांचे सामजिक कामे करायची आणि त्यांची सामजिक मदत करत असे हे दादा लोक त्यावेळेला ह्या दादान मध्ये आपापसात मारामारी होऊ लागली आणि खटके उडू लागले.  त्यावेळी संघटीत गुन्हेगारीचे उप्पनाचे मोठे साधन म्हणजे  मटका, दारू आणि झुगार हे पैशे कमावण्याचे मोठे साधन  होते. त्यामुळे खूप सर्र्याप्रकारची गुन्हेगारी महाराष्ट्रात  घडू लागली. त्यावेळी महाराष्ट्रात सरकारने दारूवर बंदी आणली होती आणि  त्यावेळी गावठी  दारू मोठ्या प्रमाणात बनवली  जात असे आणि विकली जात असे  ती बनवायला महिलांचा वापर केला जात असे आणि त्या महिला गावठी  दारूच्या ब्यागा पोटामध्ये लपवून  प्रेग्नंट अवस्थे मध्ये त्या जायच्या म्हणून त्या वेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला पोलिसांची गरज भासु लागली आणि महिला पोलिस कॉनस्टेबलची भरती केली गेली. आणि त्यानंतर  महिला पोलीस (PSI) ची भरती केली गेली. त्यावेळी स्मिता जयकर या पहिल्या PSI अधिकारीची भरती करण्यात आली. सरकारने त्यावेळी ज्या गोष्टीन वर बंदी आणत असेल ते बेकायदेशीर प्रकार होत असे  आणि त्यावेळी महिला पोलीस भरती होण्याचे श्रेय ज्याला दिले जाते ती आहे दारू. त्यावेळी ह्या सर्वावर महाराष्ट्रात बंदी आल्यामुळे त्यानंतर हि संघटीत गुन्हेगारी सोन्याची तस्करी करायला लागली. आणि सोन्यावर (excise duty ) भरायला लागत असल्याने त्यावेळेला सर्रास सोन्याची तस्करी होत असे आणि ह्या सर्वानमधून हाजी मस्तान, युसुफ पठाण सारखे गुन्हेगार निर्माण झाले.त्यानंतर तस्करीचे काम करत करत दाऊत इब्राहीम तयार झाला आणि त्या नंतर गोल्डन ग्यांग तयार झाली. आणि त्यानंतर ह्या सर्वांनी आपले जागा वाटून घेतल्या आणि आपापले स्वतंत्र काम करायला सुरुवात केली.एखादा जर दुसर्याच्या  हद्दीत गेला तर त्यामध्ये खटके उडत आणि त्यामुळे नंतर पुढे ग्यांगवोर सुरु झाले. पोलीसाचाच मुलगा असणारा दाऊत इब्राहीम हा हाजी मस्तान, लाला कासर ह्यांच्या बरोबर काम करत करत नंतर मोठा डॉन झाला. त्यानंतर १९८५ ते १९९० ह्या दरम्यान डान्स बार सुरु झाले. मग नंतर हे डान्स बार उप्पनाचे साधन झाले त्यानंतर ही मंडळी सिनेमा कडे वळली आणि नंतर खंडणी हा प्रकार मोठ्या प्रमाणे सुरु झाले. 

गुन्हेगारी पत्रकारिता कशी करावी?
गुन्हेगारी पत्रकारिता करीत असताना आपल्याला जिथे गुन्हा घडला असेल तिथे जाऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो नेमके काय झाले आहे. तो गुन्हा कुठे घडला ते ठिकाण पाहावे लागते. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वरिष्ट अधिकार्यांना भेटून त्या घटने बद्दल पूर्ण  इत्तम्भूत  माहिती गोळा करून नंतर त्या घटनेशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेऊन ती माहिती गोळा करून नंतर त्या माहितीची योग्य तर्र्हेने माहिती  (Edit ) करून ती लोकांसमोर मांडावी. आणि गुन्हेगारी पत्रकारिता करताना एक गोष्टा पत्रकाराने लक्षात ठेवली पाहिजे, आपण जी बातमी कव्हर करत आहोत त्याची इत्तम्भूत माहिती आपल्या समोर येत नाही आणि ती बातमी अजून काही ठिकाणा हून (confirmed) करीत नाही  तोपर्यंत ती बातमी आपण लोकांना देऊ नये.

बातमी म्हणून बातमी देऊ नये.(कर्तव्य)
आपण जी बातमी देत आहोत त्या बातमी ची आपल्याला सामाजिक जान असली पाहिजे ती बातमी म्हणून बातमी देऊ नये तर त्या कडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कोण हा सामजिक नजरेचा असावा आणि आपण त्या बातमीला न्याय मिळवून देऊ शकतो ह्या दृष्टीने त्या बातमी कडे पहिले पाहिजे तरच आपण चांगले पत्रकार होऊ शकतो.

                                                                                                  
                                                                                                        -Ni3more

Wednesday, 12 September 2012

वृत्तसंपादन


व्याख्याते= श्री. तुषार नानल  

नवशक्ती चे संपादक तुषार नानल यांनी वृत्तसंपादक/उपसंपादक यांची जबाबदारी तसेच यांचे कार्य यांच्याविषयी मुलभूत मार्गदर्शन नवोदित पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना मोलाचे आहे. रिपोर्टिंग पासून ते पेपर प्रिंटींगला जाण्यापर्यंत या प्रक्रिया मध्ये उपसंपादकाची जबाबदारी हि महत्त्वाची आहे.

वृत्तपत्रात  मध्ये कामाची विभागणी हि दोन भागात केली आहे.
१) वार्ताहर २) डेस्क.  

उपसंपादक कडे पुढील गुण आवश्यक आहे. 

१) सर्व प्रथम  उपसंपादका ला बातमी कळली पाहिजे. बातमी कशाची होऊ शकते याची माहिती पाहिजे.
२) उपसंपादका ला सर्व माहिती असायला पाहिजे. 
३)भाषेवर प्रभुत्त्व असले पाहिजे. 
४) वृत्तपत्रात बातमी आल्या नंतर होणारे कायदेशीर परिणाम याची जाणीव  उपसंपादकाला असावी. कलमांचे मुलभूत ज्ञान असावी 
५) बातमीला शीर्षक देणे. शीर्षक वाचण्यास प्रोत्साहन देणारे असावे. 
६)इतर पेपरातील  आकर्षक लेखन कला आत्मसात करणे. इतर पेपरातील वचन मुळे संदर्भ कळतात. यामुळे प्रगल्भता वाढते.
७)इलेक्ट्रोनिक बातम्या मध्ये राहिलेले महत्त्वाचे मुद्दे उपसंपादकाला लक्षात आले पाहिजे. त्याप्रमाणे ते मुद्दे बातमीत आले पाहिजे. 
८) बातमी लावताना सूक्ष्म परीक्षण आवश्यक.
९) नेतृत्त्व गुण असले पाहिजे. 
१०)उपसंपादकाला कामातील डेड लाईन पाळता आली पाहिजे.
११) बातमीतला अनावश्यक भाग टाळणे.
१२)बातमीतील अचूकपणा व वाक्य रचना यामध्ये उपसंपादकाचे कसब पणाला लागलेले असते. त्याकडे जास्त लक्ष्य उपसंपादकाने देणे गरजेचे आहे. 

उपसंपादकाची पात्रता -
१) वाचक व व्यवसाय म्हणून सगळ्या क्षेत्रातील वाचन आवश्यक.

२)निरीक्षण क्षमता.
)कोणत्या विषयावर बातमी केली जाऊ शकते याचे ज्ञान. 
४) सांस्कृतिक, प्रादेशिक, भौगोलिक, राजकीय संदर्भ माहित असणे, 

५) स्वताचा विश्लेषण दृष्टीकोन असावा. 
६) बातमी हि बातमी रहावी याकडे उपसंपादकाने लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वग्रह व भावनिक नसावे. 
७)वाचकाला आपण काय देतो याचे भान असावे. तसेच सर्व स्तरातील लोकांना समोर ठेवून बातमी  संकलन करावे.
८) हे क्षेत्र तणाव ग्रस्त असल्यामुळे कामातील तणावाचे व्यवस्थापन करणे उपसंपादकाला जमले पाहिजे.
उपसंपादकाने आपले दोष व चुका सुधारण्यासाठी स्वताचा पेपर दुसय्रा दिवशी निघाल्या नंतर वाचणे गरजेचे आहे. 
           अशाप्रकारे श्री. तुषार नानल यांनी आम्हाला अमूल्य असे मार्गदर्शन केले

                                                                                                                                               श्रीराम केणी

Monday, 10 September 2012

ग्रामीण पत्रकारिता

Lecture Date : ३१-०८-२०१२ & ०६-०९-२०१२             व्याख्याते : सुनील कुहीक


                                                                          विषय :ग्रामीण पत्रकारिता 




ग्रामीण पत्रकारिता कशी करावी?
आपल्याला ग्रामीण पत्रकारिता करायची असेल तर ग्रामीण भागातल्या राजकीय रचना आणि ग्रामीण शेतकर्यान पुढे  पडणार्या  समस्येचा  जाणीव असली पाहिजे. आपण ग्रामीण पत्रकारितेचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला महाराष्ट्राची भोगोलिक रचना माहित असली पाहिजे. महाराष्ट्राची भोगोलिक रचना ही पाच विभागात विभागली गेली आहे.विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिममहाराष्ट्र अशी विभागली गेलेली आहे. तसेच महाराष्ट्राचे विभाग मुंबई, कोकण,पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती असे पडतात.
 ग्रामीण पत्रकारितेमध्ये तीन प्रकारच्या बातम्या प्रसारित होतात 
१.Events २.Fact ३.Views Em-pressed .
ग्रामीण पत्रकारिता करताना आपल्याला ग्रामीण भागातल्या राजकीय रचना आणि ग्रामीण शेतकर्यान पुढे  पडणार्या  समस्या माहित असल्या पाहिजे.
ग्रामीण विभागातील सर्व जीवन हे कृषीवर आधारित असते.  ग्रामीण पत्रकारिता करताना पत्रकाराला आपण जी बातमी निवडणार आहोत ती बातमी निवडण्याचे ज्ञान असले पाहिजे. आणि जी बातमी लिहणार आहोत ती पूर्ण बातमीचा परिचय करून देणारी असावी.आणि आपण जी काही बातमी देणार आहोत ती तटस्त असली पाहिजे. पत्रकारितेचा विचार केला तर ती दोन भागांमध्ये विभागलेली आहे १.शहरी पत्रकारिता २.ग्रामीण पत्रकारिता.
हळूहळू आता वर्तमान पत्र आणि इलेक्ट्रोनिक मिडियाला लोकलटच  लागला. पहिला वर्तमानपत्र हे आठ - दहा पानांचे निघायचे पण आता वर्तमानपात्रांना लोकल टच देण्याच्या हेतूने नंतर वर्तमानपत्राच्या आवृत्या निघू लागल्या. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये चोवीस तास बातम्या दिल्या जातात.

 साधन  सुविधांचा  अभाव.
शहरी पत्रकारितेच्या तुलनेत आपण जर ग्रामीण पत्रकारितेकडे वळलो तर त्यामध्ये साधन सुविधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. समजा एखाद्या गावात एक घटना घडली आहे पत्रकाराला तिथे जाण्यासाठी अनेक साधनांचा आधार त्याला घ्यावा लागतो त्याला त्या घटना स्थळी पोहोचण्यासाठी त्याला बस बोला किवा बैलगाडी बोला अश्या तटपुंज्या सुविधांचा आधार घेत त्याला स्वखर्चावर तिथे त्यावेळेत पोहचून ती बातमी कव्हर करून त्या वेळात त्या बातमीचे रिपोर्टिंग करायचे असते. म्हणून शहरी पत्रकारीते पेक्षा ग्रामीण पत्रकारिता करताना साधन सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

व्यक्तीचा सहभाग 

आपल्याकडे राजकारण हा विषय सध्याचा दृष्टीने खूप महत्वाचा विषय बनला आहे.तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पाहायला गेले तर काही जणाचा राजकारणात असलेला सहभाग (Involtment ) हा असेलच असे नाही तर काही जणाचा सहभाग (Involtment ) राज्यपातळीवर किवा अंतरार्ष्ट्रीय पातळीवर असू शकतो. हे प्रत्यक्षात त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

वार्ताहर म्हणून नेमला?
जर तुम्हाला वार्ताहर म्हणून नेमला तर तुम्ही शहरी भागात काम करा किंवा ग्रामीण भागात काम करा तुमच्या मध्ये Basic skill असणे गरजेचे आहे.
तुम्हाला समजा अंतरार्ष्ट्रीय सभेला किवां एखाद्या ग्रामीण भागात वार्ताहर म्हणून नेमला तर आपल्याला वार्ता संपादन करण्याची क्षमता असली पाहिजे तसेच ती योग्य प्रकारे मदत आली पाहिजे.त्यासाठी आपल्या कडे skill असणे गरजेचे असते. एखाद्या पत्रकाराला बातमी द्यायची असेल तर कोणत्या बातमीवर बातमी होऊ शकते आणि कोणती बातमी आपण बातमी म्हणून निवडू शकतो ह्याचे पूर्ण ज्ञान असणे  गरजेचे असते.

कृषी 
ग्रामीण पत्रकारिता हि पूर्णपणे कृषी वर आधारित आहे. ग्रामीण विभागातील जीवन हे शेतीवर आधरित आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती करताना बी - बियाणे, खत हे पुरवावी लागतात. साधारणतः आपल्या कोकण भागात रब्बी पिके आणि खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे  नेहमीचीच पिके घेतात. आणि साधारणतः शेतकरी तिसरे पिक घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कापूस पेरणारे वर्ष दोन वर्ष कापूसच पेरतात ज्वारी पेरणारे ज्वारी पेरतात. ह्या आधी पश्चिममहाराष्ट्रात खोब्राकडे नावाच्या शेतकर्याने तांदळाच्या पिकावर प्रयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ पिकवले  ह्याद्वारे ह्या शेतकर्याने corpattern मधला ट्रेंड आणून त्यांनी HMT प्रकारचा तांदळाच्या जाती विकसित केल्या. आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करून तो तांदळाचा तुकडा किती मोठा आहे आणि तो खाण्यासाठी  किती सुगंधित आहे आणि खावयास किती चांगला आहे हे दर्शवून दिले. अश्या प्रकारे हल्लीच्या जगतात काही काही शेतकरी आहेत ते शेतीवर वेगवेगळे प्रयोग करून आपली शेती करतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
ग्रामीण विभाग हा संपूर्णपाने शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच जमिनीवर एकाचप्रकाराने शेती केल्याने जमीन नापीक होते आणि त्या जमिनीचे पिक देण्याचे प्रमाण कमी होते. आपण जर पाहायला गेलो तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात त्या मागील करणे हि खूप आहेत. शेतकर्यांना शेती करताना बी - बियांनान साठी सावकार कडून कर्ज  काढावे लागतात किवां घरातल्या करणान मुळे शेतकऱ्याला कर्ज काढावे लागते. आणि पाऊस अनियमित झाल्याने शेती नीट होत नाही त्या मुळे शेतकऱ्याला योग्य ते मानधन  मिळत नाही . एकीकडे सरकार कापसाचे चांगले उपन्न झाले तर सरकार लगेच काही दिवसाचे त्या आयातीवर निर्बंध लावते आणि त्या काळात लगेच मोठ मोठे दुकानदार सावकार आणि कारखान्याचे मलिक कमी किमतीत तोच माल शेतकर्यान कडून विकत घेतात आणि तोच माल बनवून जास्त किमतीत विकतात शेतकर्यांना मात्र त्या दरम्यान कमी किमतीत आपले पिक विकावे लागते त्यामुळे त्यांची कर्ज काढलेली रक्कम पण वसूल होत नाही त्यामुळे दिवसेंदिवस कर्ज काढून काढून त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर होते त्यामुळे शेतकर्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तितेच सरकार त्या मालावारून बंदी उठवतो तेव्हा शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच पडत नाही.

                                                       
                                                                                                         - Ni3more

Thursday, 6 September 2012

न्युज रिपोर्टिंग


Lecture Date : ३०-०८-२०१२     व्याख्याता : प्रकाश  अकोलकर. 
                                        
                                                                        विषय: न्युज रिपोर्टिंग 

१. बातमी म्हणजे काय?
उत्तर:  बातमी म्हणजे माहित नसलेली गोष्टा म्हणजे त्याला बातमी बोलतात. 

बातमी बनवताना आवश्यक असलेल्या बाबी पुढील प्रमाणे.

१. माहित नसलेली माहिती.
२. रस असला पाहिजे . 
३. आवश्यक माहिती - नेमकेपणा . (Target Group ) 
४. आपण जी बातमी लिहिणार आहोत त्या बातमी मध्ये असलेली जवळीक. (जवळीक ).
५. आपण जी बातमी देणार आहोत किवा करणार आहोत ती बातमी ताजी असली पाहिजे म्हणजे ती वर्तमानात घडलेली बातमी पाहिजे. (ताजी बातमी ).

तसेच बातमी मध्ये खूप सारे प्रकार आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघू.
बातमी म्हणजे माहित नसलेली गोष्टा त्याला  "बातमी" बोलतात. जेव्हा एकदा पत्रकार बातमी देतो तेव्हा त्याला बातमी देण्याचा सेन्स असला पाहिजे. म्हणजे आपण जी बातमी देत आहोत ती बातमी बातमी होऊ शकते का? त्याची  ओळखण्याची  सेन्स पत्रकारा मध्ये पाहिजे. आपण जी बातमी देणार आहोत ती ताजी असली पाहिजे, घडून गेलेली पाहिजे आणि ती गोष्टा होणारी पहिजे त्याला आपण बातमी म्हणू शकतो. 
 त्यामध्ये हि दोन उपप्रकार आहेत.
१. अपेक्षित बातमी.
२. अनपेक्षित बातमी.

१.  अपेक्षित बातमी म्हणजे ज्या बातम्या भविष्यात घडणार आहेत किवा घडून गेल्या आहेत त्याला "अपेक्षित बातमी" म्हणतात
  example : सभा संमेलने होणार आहेत, संसद विधिमंडळ होणार आहेत किवा हे हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

२. अनपेक्षित बातमी  म्हणजे ज्या बातम्या अचानक घडतात त्यांना "अनपेक्षित बातमी" म्हणतात.
    example : घात - अपघात.

बातमी लिहिण्याची पद्धत.
समजा हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत अशी असते ती हत्या कोणी केली. कुठे केली, केव्हा केली , का केली ,कशासाठी केली अश्या प्रकारे .
 बातमी हि वेगवेगळ्या अंगाने लिहिली  जाते त्याचे प्रकार.

१.राजकीय 
२.सामाजिक 
३.घात - अपघात 
४.मनोरंजन 
५.क्रीडा 
६. शैक्षणिक
७.आर्थिक 
८.आरोग्य 
  
 न्युज रिपोर्टिंग कसे करावे त्याची माहिती पुढील प्रमाणे 

न्यूजरिपोर्टिंग कसे करावे? 
न्युज रिपोर्टिंग करताना  आवश्यकबाब म्हणजे आपल्याला कोणती बातमी द्यायची आहे त्याचा सेन्स असणे गरजेचे  आहे. जी बातमी घडली आहे किवा घडून गेली आहे ती किती मोठी आहे किवा छोटी त्या वर आपल्याला ती बातमी बातमी बनू शकते का आणि आपण त्या वर बातमी करू शकतो का ह्या वर असते. न्यूजरिपोर्टिंग करताना आपण जी बातमी लिहिणार आहोत ती बातमी वर्तमानात घडलेली आहे कि भूतकाळात घडलेली आहे त्यावर आपल्याला माहिती गोळा करावी लागते. आणि ती बातमी लिहिताना त्या बातमीचा नेमकेपणा आपल्याला माहित असला पाहिजे आणि त्या बातमीची जवळीक काय आहे ते जाणून घेऊन आपल्याला ती बातमी योग्यरीत्या( एडीट) केली पाहिजे. बातम्या लिहिताना त्यामध्ये दोन प्रकारच्या बातम्या येतात अपेक्षित बातमी अनपेक्षित बातमी . अपेक्षित बातम्या म्हणजे जसे सभा संमेलने होणार आहेत, सिनेमे रिलीज होणार आहेत अश्या प्रकारच्या बातम्या असू शकतात. अनपेक्षित बातम्यान  मध्ये घात-अपघात अश्या प्रकारच्या बातम्या येतात. 
समजा हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत अशी असते ती हत्या कोणी केली. कुठे केली, केव्हा केली , का केली ,कशासाठी केली अश्या प्रकारे बातमी लिहिता येते. 


Publish by
Nitin More (Ni3 more)

Tuesday, 4 September 2012

ब्लॉग म्हणजे काय रे भाऊ..?

वेब जर्नलिझम अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण सर्वांनी मिळून हा ब्लॉग चालवायचा, असे ठरले आहे. परंतु अद्याप आपणाकडून काहीच प्रतिसाद नाही. आपण जे काही शिकतोय, त्याच्या नोट्स तयार करून ब्लॉगवर अपलोड करणे अपेक्षित आहे. अर्थात आपल्यापैकी अनेकांची मुख्य अडचण आहे ती मराठी टायपिंगची. मराठी टायपिंग लवकरात लवकर शिकून घेणे, हाच त्यावरील एकमात्र उपाय आहे. त्यादृष्टीने उपयोगी पडतील, अशा काही लिंक्स खाली जोडत आहे. येत्या शनिवारी दि. 8 सप्टेंबर 2012 रोजी आपण मराठी टायपिंग कसे शिकावे आणि ब्लॉग कसा सुरू करावा, यापासूनच सुरूवात करू. तोपर्यंत तुम्ही सराव करत राहा...

इन्स्क्रिप्ट कीबोर्ड संबंधित काही महत्त्वाच्या लिंक्स....
http://en.wikipedia.org/wiki/InScript_keyboard

देवनागरी इन्स्क्रिप्ट की बोर्ड डाऊनलोड करून घेण्यासाठी उपयुक्त लिंक
http://ildc.in/inscriptlayout.html

मराठी इन्स्क्रिप्ट की बोर्डचा फोटो