Thursday, 6 September 2012

न्युज रिपोर्टिंग


Lecture Date : ३०-०८-२०१२     व्याख्याता : प्रकाश  अकोलकर. 
                                        
                                                                        विषय: न्युज रिपोर्टिंग 

१. बातमी म्हणजे काय?
उत्तर:  बातमी म्हणजे माहित नसलेली गोष्टा म्हणजे त्याला बातमी बोलतात. 

बातमी बनवताना आवश्यक असलेल्या बाबी पुढील प्रमाणे.

१. माहित नसलेली माहिती.
२. रस असला पाहिजे . 
३. आवश्यक माहिती - नेमकेपणा . (Target Group ) 
४. आपण जी बातमी लिहिणार आहोत त्या बातमी मध्ये असलेली जवळीक. (जवळीक ).
५. आपण जी बातमी देणार आहोत किवा करणार आहोत ती बातमी ताजी असली पाहिजे म्हणजे ती वर्तमानात घडलेली बातमी पाहिजे. (ताजी बातमी ).

तसेच बातमी मध्ये खूप सारे प्रकार आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघू.
बातमी म्हणजे माहित नसलेली गोष्टा त्याला  "बातमी" बोलतात. जेव्हा एकदा पत्रकार बातमी देतो तेव्हा त्याला बातमी देण्याचा सेन्स असला पाहिजे. म्हणजे आपण जी बातमी देत आहोत ती बातमी बातमी होऊ शकते का? त्याची  ओळखण्याची  सेन्स पत्रकारा मध्ये पाहिजे. आपण जी बातमी देणार आहोत ती ताजी असली पाहिजे, घडून गेलेली पाहिजे आणि ती गोष्टा होणारी पहिजे त्याला आपण बातमी म्हणू शकतो. 
 त्यामध्ये हि दोन उपप्रकार आहेत.
१. अपेक्षित बातमी.
२. अनपेक्षित बातमी.

१.  अपेक्षित बातमी म्हणजे ज्या बातम्या भविष्यात घडणार आहेत किवा घडून गेल्या आहेत त्याला "अपेक्षित बातमी" म्हणतात
  example : सभा संमेलने होणार आहेत, संसद विधिमंडळ होणार आहेत किवा हे हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

२. अनपेक्षित बातमी  म्हणजे ज्या बातम्या अचानक घडतात त्यांना "अनपेक्षित बातमी" म्हणतात.
    example : घात - अपघात.

बातमी लिहिण्याची पद्धत.
समजा हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत अशी असते ती हत्या कोणी केली. कुठे केली, केव्हा केली , का केली ,कशासाठी केली अश्या प्रकारे .
 बातमी हि वेगवेगळ्या अंगाने लिहिली  जाते त्याचे प्रकार.

१.राजकीय 
२.सामाजिक 
३.घात - अपघात 
४.मनोरंजन 
५.क्रीडा 
६. शैक्षणिक
७.आर्थिक 
८.आरोग्य 
  
 न्युज रिपोर्टिंग कसे करावे त्याची माहिती पुढील प्रमाणे 

न्यूजरिपोर्टिंग कसे करावे? 
न्युज रिपोर्टिंग करताना  आवश्यकबाब म्हणजे आपल्याला कोणती बातमी द्यायची आहे त्याचा सेन्स असणे गरजेचे  आहे. जी बातमी घडली आहे किवा घडून गेली आहे ती किती मोठी आहे किवा छोटी त्या वर आपल्याला ती बातमी बातमी बनू शकते का आणि आपण त्या वर बातमी करू शकतो का ह्या वर असते. न्यूजरिपोर्टिंग करताना आपण जी बातमी लिहिणार आहोत ती बातमी वर्तमानात घडलेली आहे कि भूतकाळात घडलेली आहे त्यावर आपल्याला माहिती गोळा करावी लागते. आणि ती बातमी लिहिताना त्या बातमीचा नेमकेपणा आपल्याला माहित असला पाहिजे आणि त्या बातमीची जवळीक काय आहे ते जाणून घेऊन आपल्याला ती बातमी योग्यरीत्या( एडीट) केली पाहिजे. बातम्या लिहिताना त्यामध्ये दोन प्रकारच्या बातम्या येतात अपेक्षित बातमी अनपेक्षित बातमी . अपेक्षित बातम्या म्हणजे जसे सभा संमेलने होणार आहेत, सिनेमे रिलीज होणार आहेत अश्या प्रकारच्या बातम्या असू शकतात. अनपेक्षित बातम्यान  मध्ये घात-अपघात अश्या प्रकारच्या बातम्या येतात. 
समजा हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत अशी असते ती हत्या कोणी केली. कुठे केली, केव्हा केली , का केली ,कशासाठी केली अश्या प्रकारे बातमी लिहिता येते. 


Publish by
Nitin More (Ni3 more)

1 comment:

  1. नितीन, खूपच छान. प्रकाश अकोलकरसरांच्या लेक्चरचा तुझा आढावा चांगला झाला आहे. तुझे निरीक्षण आणि आकलन अगदी योग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठीमध्ये एवढ्या विस्तृतपणे तू लिहिलेस, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन. आपले इतर मित्र-मैत्रिणीही तुझ्यापासून निश्चितच स्फूर्ती घेतील, यात शंका नाही.
    - सुनील घुमे

    ReplyDelete