व्याख्याते= श्री. तुषार नानल
नवशक्ती चे संपादक तुषार नानल यांनी वृत्तसंपादक/उपसंपादक यांची जबाबदारी तसेच यांचे कार्य यांच्याविषयी मुलभूत मार्गदर्शन नवोदित पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना मोलाचे आहे. रिपोर्टिंग पासून ते पेपर प्रिंटींगला जाण्यापर्यंत या प्रक्रिया मध्ये उपसंपादकाची जबाबदारी हि महत्त्वाची आहे.
वृत्तपत्रात मध्ये कामाची विभागणी हि दोन भागात केली आहे.
१) वार्ताहर २) डेस्क.
उपसंपादक कडे पुढील गुण आवश्यक आहे.
१) सर्व प्रथम उपसंपादका ला बातमी कळली पाहिजे. बातमी कशाची होऊ शकते याची माहिती पाहिजे.
२) उपसंपादका ला सर्व माहिती असायला पाहिजे.
३)भाषेवर प्रभुत्त्व असले पाहिजे.
४) वृत्तपत्रात बातमी आल्या नंतर होणारे कायदेशीर परिणाम याची जाणीव उपसंपादकाला असावी. कलमांचे मुलभूत ज्ञान असावी
५) बातमीला शीर्षक देणे. शीर्षक वाचण्यास प्रोत्साहन देणारे असावे.
६)इतर पेपरातील आकर्षक लेखन कला आत्मसात करणे. इतर पेपरातील वचन मुळे संदर्भ कळतात. यामुळे प्रगल्भता वाढते.
७)इलेक्ट्रोनिक बातम्या मध्ये राहिलेले महत्त्वाचे मुद्दे उपसंपादकाला लक्षात आले पाहिजे. त्याप्रमाणे ते मुद्दे बातमीत आले पाहिजे.
८) बातमी लावताना सूक्ष्म परीक्षण आवश्यक.
९) नेतृत्त्व गुण असले पाहिजे.
१०)उपसंपादकाला कामातील डेड लाईन पाळता आली पाहिजे.
११) बातमीतला अनावश्यक भाग टाळणे.
१२)बातमीतील अचूकपणा व वाक्य रचना यामध्ये उपसंपादकाचे कसब पणाला लागलेले असते. त्याकडे जास्त लक्ष्य उपसंपादकाने देणे गरजेचे आहे.
उपसंपादकाची पात्रता -
१) वाचक व व्यवसाय म्हणून सगळ्या क्षेत्रातील वाचन आवश्यक.
२)निरीक्षण क्षमता.
३)कोणत्या विषयावर बातमी केली जाऊ शकते याचे ज्ञान.
४) सांस्कृतिक, प्रादेशिक, भौगोलिक, राजकीय संदर्भ माहित असणे,
५) स्वताचा विश्लेषण दृष्टीकोन असावा.
६) बातमी हि बातमी रहावी याकडे उपसंपादकाने लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वग्रह व भावनिक नसावे.
८) हे क्षेत्र तणाव ग्रस्त असल्यामुळे कामातील तणावाचे व्यवस्थापन करणे उपसंपादकाला जमले पाहिजे.
उपसंपादकाने आपले दोष व चुका सुधारण्यासाठी स्वताचा पेपर दुसय्रा दिवशी निघाल्या नंतर वाचणे गरजेचे आहे.
उपसंपादकाने आपले दोष व चुका सुधारण्यासाठी स्वताचा पेपर दुसय्रा दिवशी निघाल्या नंतर वाचणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे श्री. तुषार नानल यांनी आम्हाला अमूल्य असे मार्गदर्शन केले.
श्रीराम केणी
श्रीराम केणी
No comments:
Post a Comment