Wednesday, 16 January 2013

चलो वाशी... अभ्यास दौरा

हाय फ्रेंडस,
येत्या शनिवारी दि. 19 जानेवारी 2013 रोजी दुपारी 3 वाजता आपण सगळे श्री. मंदार फणसे यांच्या bharat4india.com या वेबसाइटच्या ऑफिसला भेट देण्यासाठी जाणार आहोत.
अर्थात हा आपल्या अभ्यासाचाच एक भाग असल्याने पुन्हा शनिवारी (दि. 19 जानेवारी) सायंकाळी 6 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात वेगळे लेक्चर होणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
आपणा सर्वांच्या आग्रहाखातर हा दौरा आयोजित केलेला आहे. त्यामुळे कुणीही दांडी मारणार नाही आणि सबबी सांगणार नाही, अशी अपेक्षा आहे.
सर्वांनी पुढील पत्त्यावर वेळेवर हजर राहावे...
धन्यवाद.
पत्ता - बीएसईएल टेक पार्क, सी विंग, पहिला मजला, इनऑर्बिट मॉलच्या समोर, वाशी स्टेशन
वेळ - दुपारी 3 वाजता

- सुनील घुमे

Monday, 14 January 2013

राजकीय पत्रकारिता



Date : ११ - ०१ - २०१३
Lecturer : मधुकर कांबळे

राजकीय पत्रकारिता
राजकीय पत्रकारीता करताना सर्व विषयाला जाणून घेऊन विचार करावा. जिज्ञासा कायम जागी असावी. ज्या नैसर्गिक घटना घडत असतात तेव्हा त्याच्या विरोधी घटना ही घडत असतात. त्याला बातमी बोलतात.त्यामध्ये विरोधाभास शोधणे. चांगली निरीक्षण द्ष्टी असली पाहिजे.भारतीय राज्य घटना माहित असली पाहिजे. पत्रकारिता करताना बुद्धिवादी, तर्कवादी, निष्टावादी, असले पाहिजे. 
मंत्रालय म्हणजे काय?
मंत्रालयामध्ये काम करताना आपल्याला बेसिक रिपोटीग आले पाहिजे. म्हणजे प्रशासन म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक असते.
आपल्याला राजकीय पत्रकार म्हणून काम करताना लोकशाही रचना माहिती पाहिजे.लोकशाहीच्या रचनेवर कामकाज सिस्टिम वर आपली सगळी शासनाची व्यवस्था चालु असते. मंत्रालयात  भाषाविभाग आणि अल्पसंख्याक विभाग एकूण २७ विभाग आहेत.या प्रशासकिय विभागात ज्या घडामोडी घडतात त्याचे रिपोटीग करणे. शासन जेव्हा एखादा निर्णय घेते त्यामागे एक राजकीय हेतु असतो. त्याला विरोध करणारी ऐक यत्रंणा असते त्याला विरोधी पक्ष म्हणतात. मत्रांलयात काम करताना तूमचा संपर्क हा दाडगा जेणे करुन तूम्हाला कोणतीही न्यूज मिळवताना अडचणी येत नाहीत.सबंध सर्व थराच्या लोकांपर्यत असायला पाहिजे.
विधिमंडळ रिपोटीग
महाराष्ट्राचेतीन अधिवेशन होतात. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर संबंध ठेवावे लागतात.जे तारतम्य ठेवावे लागते त्या तारतम्याला अभ्यासाची जोड असणे गरजेची असते.आपण पत्रकारिता करीत असताना आपण ज्या सोर्स कडून बातमी मिळवणार आहोत त्याचे नाव कोणाला हि सांगू नये जर सांगितले तर तो सोर्स आपल्याला ती बातमी देणार नाही. म्हणून त्यामुळे त्या सोर्स ला आपल्या बदल कटुता निर्माण होऊ नये आणि आपल्या बद्दल ची धास्ती आणि आदर राहिला पाहिजे. आपली नजर कायम वेगवेगळी बातमी शोधणारी पाहिजे आणि वेगवगळे शोधण्याची धडपड पाहिजे.
जर आपल्याला कोणत्या हि बातमीची किवा घटनेची इतम्भूत (सविस्तर) माहिती पाहिजे असेल तर ईऊघ ओमू (मानवी अधिकार आयोग) ने आपण ती माहिती मिळवू शकतो उदाहरणार्थ : आपल्या राज्यात आताच टोलनाक्या वरून खूप आंदोलने झाले कि आम्ही टोल भरणार नाही टोल रद्द करा म्हणून खूप आंदोलने झाले. एकूण किती टोलनाके आहेत. कोणत्या कंपनीला काम दिले आहे. त्या रस्त्याला किती खर्च आला आहे. हि इतम्भूत (सविस्तर) माहिती आपण ईऊघ ओमू ने मिळवू शकतो आणि ती पत्रकार म्हणून आपण लोकांसमोर आणि आपल्या समजा समोर मांडू शकतो.
लोकशाहीत पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हणून गणले गेले आहे


-Nitin More

Sunday, 13 January 2013

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेछा!!!!!


                                
                                                            
                                                         

           
             महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! मकरसंक्रांत हा भारतातील शेती संबंधित सण आहे. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथिला मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यादिवसापासून सुर्याचे उत्तरायण सूरु होते.पृथ्वीवरुन पाहिले असता सुर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते हा सण सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यास भोगी, संक्रांती व किंक्रांती असे म्हणतात.संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश भाषा महिन्यानुसार हा दिवस १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 मकरसंक्रांती  येण्याची चाहूल लागताच सर्वत्र लाडवाचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक आनंद पसरतो. काही काही घरात तर गृहिणी आवर्जून तिळाचे लाडू बनवतात . संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. हा सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी आणि  तिळामध्ये उष्णता असल्याने ह्या सणाला तिळाचे लाडू बनवले जातात. या सणाला सर्वत्र वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडविले जातात. लहान मोठे सर्वच जन पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.


                                            तुम्हा सर्वाना मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
                                                      तिळगुळ घ्या गोड गोड बोल !!!

                                                
   

   -Nitin More

Thursday, 10 January 2013

आमची मुंबई... 'सुरक्षित ' मुंबई..? (प्रोजेक्ट)

हाय फ्रेंडस,
राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिलांवरील वाढते बलात्कार आणि अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला आहे.
अशा स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..?
कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशीरापर्यंत घराबाहेर असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?
रात्री-अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का..?
घराबाहेर सोडा, निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का..?

याच विषयावर आपण सर्वांनी आपापल्या जीवनातील वैयक्तिक अनुभव शेअर करावेत, असे वाटते.
विशेषतः विद्यार्थिनींनी...
एकापेक्षा जास्त अनुभव असतील तरीही चालतील.
विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील, ओळखीच्या महिला वर्गाला आलेले अनुभव शब्दबद्ध करावेत.
वेब जर्नलिझम शिकणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हे वैयक्तिक अनुभव केस स्टडी म्हणून आपण विचारात घेऊ आणि मुंबई खरोखरच महिलांसाठी सुरक्षित आहे का, याबाबत आपल्यापुरता प्रातिनिधीक निष्कर्ष काढू...
हा उपक्रम प्रोजेक्ट म्हणून सर्वांनी करायचा असून, येत्या आठवडाभरात आपापले लेख इ-मेलवरून पाठवावेत तसेच आपापल्या वैयक्तिक ब्लॉगवर देखील अपलोड करावेत.

एकूण गुण - 50
शब्दमर्यादा - किमान 1 हजार शब्द
प्रोजेक्ट सादर करण्याची अंतिम तारीख - 18 जानेवारी 2013

निर्धारित मुदतीनंतर आलेल्या मेलचा विचार केला जाणार नाही आणि त्यासाठी गुण मिळणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद.

- सुनील घुमे
9821911700
sunilghume@gmail.com

Monday, 7 January 2013

न्यू इयर सेलिब्रेशन

हाय फ्रेंड्स,

2013 या नव्या वर्षाची सुरूवात शनिवारी (दि. 5 जानेवारी) एकदम झक्कास झाली...
वेब जर्नलिस्ट बनण्याचा जो संकल्प आपण केला आहे, त्याचे सेलिब्रेशन सर्वांनी मिळून केले.
जल्लोषात.
कीर्ति कुळकर्णी मॅडमच्या हस्ते यावेळी केकही कापण्यात आला...

हा मान त्यांनी मिळवला, तो त्यांच्या मेहनतीने, कष्टाने आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नाने...
गेल्या चार-साडे चार महिन्यात आपण जी काही थोडीफार प्रगती करू शकलो, त्याची चाचपणी करण्यासाठी डिसेंबर अखेरीस एक लेखी परीक्षा झाली. त्या परीक्षेला केवळ चारच विद्यार्थी उपस्थित होते. बाकीच्यांना बहुतेक इयर एन्डिंगच्या मूडमध्ये लेक्चरसाठी वेळ नसावा... असो.

तर ही लेखी परीक्षा आणि त्याआधी एकदा झालेली लेखी परीक्षा... या दोन्ही परीक्षांचा निकाल, ब्लॉगवरील लिखाण, दिलेल्या सूचनांचे नियमित पालन, लेक्चरसाठीची हजेरी, अभ्यासपूर्ण चर्चा आणि वेब जर्नलिस्ट बनण्यासाठीची धडपड अशा विविध निकषांवर कीर्ति मॅडम अव्वल ठरल्या.

स्टुडंट ऑफ द इयर... 2012
म्हणून त्यांचा हा सन्मान...

त्याशिवाय आणखी तिघा विद्यार्थ्यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले.





श्रीराम केणी




नमिता वारणकर


आणि ममता सोनार...

हे होते आपले 'चॉकलेट कुमार' किंवा 'चॉकलेट कुमारी'...
त्यांनी केवळ लेखी परीक्षा दिली म्हणून त्यांचे कौतुक नाही. तर कोर्स सुरू झाल्यापासून त्यांनी जे सातत्य दाखवले आहे, त्याचा हा रिझल्ट होता. ममताचे खास कौतुक अशासाठी की, मराठी भाषिक नसतानाही ती ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे, ती काबिल-ए-तारीफच आहे.

त्याशिवाय आणखीही बरीच धम्माल झाली. गप्पागोष्टी रंगल्या.
नीता मोहितेंनी तर माझीच प्रकट मुलाखत घेऊन टाकली. एकदम वेगळ्या अशा विषयावर.
थँक्स नीता...
नीता आणि तिच्यासह या धम्मालमस्तीत सहभागी झालेल्या सर्वांसाठी खास लिंक सोबत देत आहे.
http://mumloverspot.blogspot.in/

आता ही काय भानगड आहे, हे बाकीच्यांना कळणार नाही.
त्याला माझा काही इलाज नाही.
सो एन्जॉय...

(ता.क. - जे कुणी लेखी परीक्षेला बसले नव्हते (म्हणजेच आले नव्हते) ते फेल झालेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.)

- सुनील घुमे

Wednesday, 2 January 2013

हॅप्पी न्यू इयर

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
वेब जर्नलिस्ट होण्याचा आपला संकल्प लवकरात लवकर तडीस जावो, हीच सदिच्छा...
- सुनील घुमे