Thursday, 10 January 2013

आमची मुंबई... 'सुरक्षित ' मुंबई..? (प्रोजेक्ट)

हाय फ्रेंडस,
राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिलांवरील वाढते बलात्कार आणि अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला आहे.
अशा स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..?
कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशीरापर्यंत घराबाहेर असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?
रात्री-अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का..?
घराबाहेर सोडा, निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का..?

याच विषयावर आपण सर्वांनी आपापल्या जीवनातील वैयक्तिक अनुभव शेअर करावेत, असे वाटते.
विशेषतः विद्यार्थिनींनी...
एकापेक्षा जास्त अनुभव असतील तरीही चालतील.
विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील, ओळखीच्या महिला वर्गाला आलेले अनुभव शब्दबद्ध करावेत.
वेब जर्नलिझम शिकणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हे वैयक्तिक अनुभव केस स्टडी म्हणून आपण विचारात घेऊ आणि मुंबई खरोखरच महिलांसाठी सुरक्षित आहे का, याबाबत आपल्यापुरता प्रातिनिधीक निष्कर्ष काढू...
हा उपक्रम प्रोजेक्ट म्हणून सर्वांनी करायचा असून, येत्या आठवडाभरात आपापले लेख इ-मेलवरून पाठवावेत तसेच आपापल्या वैयक्तिक ब्लॉगवर देखील अपलोड करावेत.

एकूण गुण - 50
शब्दमर्यादा - किमान 1 हजार शब्द
प्रोजेक्ट सादर करण्याची अंतिम तारीख - 18 जानेवारी 2013

निर्धारित मुदतीनंतर आलेल्या मेलचा विचार केला जाणार नाही आणि त्यासाठी गुण मिळणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद.

- सुनील घुमे
9821911700
sunilghume@gmail.com

No comments:

Post a Comment