Sunday, 13 January 2013

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेछा!!!!!


                                
                                                            
                                                         

           
             महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! मकरसंक्रांत हा भारतातील शेती संबंधित सण आहे. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथिला मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यादिवसापासून सुर्याचे उत्तरायण सूरु होते.पृथ्वीवरुन पाहिले असता सुर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते हा सण सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यास भोगी, संक्रांती व किंक्रांती असे म्हणतात.संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश भाषा महिन्यानुसार हा दिवस १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 मकरसंक्रांती  येण्याची चाहूल लागताच सर्वत्र लाडवाचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक आनंद पसरतो. काही काही घरात तर गृहिणी आवर्जून तिळाचे लाडू बनवतात . संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. हा सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी आणि  तिळामध्ये उष्णता असल्याने ह्या सणाला तिळाचे लाडू बनवले जातात. या सणाला सर्वत्र वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडविले जातात. लहान मोठे सर्वच जन पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.


                                            तुम्हा सर्वाना मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
                                                      तिळगुळ घ्या गोड गोड बोल !!!

                                                
   

   -Nitin More

No comments:

Post a Comment