Saturday, 26 October 2013

17 वा स्मृतिदिन सोहळा

       
  दिनांक 20 ऑक्टोबर,2013 या दिवशी वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांचा 17 वा स्मृतिदिन होता. रविवार च्या संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वास्तूत त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती.शैक्षणिक क्षेत्रातील,राजकारणात रस असणारे,वृत्तपत्रात हिरीरीने काम केलेले वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
        वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांच्या 17 व्या स्मृतिदिनी प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक हे त्यांच्या शिष्या व पहिल्या महिला पत्रकार निला उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली संपादित झाले.मुंबई मराठी पत्रकार संघ आणि नवचैतन्य प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दि.वी.गोखले:व्यक्तित्व आणि कर्तुत्व हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
        प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.विनय सहस्त्रबुद्धे,डॉ.विजय कुवळेकर आणि डॉ. विनय हर्डीकर यांनी गोखलेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.गोखलेंचे जवळचे मित्र श्री.जयंत जोगळेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
        हे पुस्तक गोखलेंच्या कर्तुत्व,कामगिरी,व्यक्तिमत्व आणि पुण्याईची साक्ष देते.या पुस्तकात निरनिराळ्या विचारवंतांचे,लेखकांचे गोखलेंविषयीचे मत आणि विचार दिसतील. गोखलेंविषयी त्यांच्या सहकार्यांचे व मित्रांचे मत:-गोखले हे द्रष्टा पत्रकार,युद्धश्स्त्राचे अभ्यासक,संघ प्रचारक,कठोर,स्पष्ट वक्ते,सावरकरवादी,मार्गदर्शक,उदारमतवादी आणि पारखी होते.त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह होता.युद्धाविषयक पत्रकारितेची पायाभरणी गोखलेंनी केली होती.


        असे हे अष्टपैलू असणाऱ्या गोखलेंचा स्मृतिदिनी रविवारच्या भारावलेल्या संध्याकाळी त्यांच्या आठवणींमध्ये पार पडला.

No comments:

Post a Comment