Friday, 29 November 2013

गरुडझेप

       
 दिनांक 20 नोव्हें.-13 रोजी,मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार श्री.सुकृत खांडेकर यांची एकसष्ठी साजरी झाली.आणि त्याचबरोबर त्यांच्या गरुडझेप या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
       सत्कारमूर्ती सुकृत खांडेकर हे गेली 40 वर्षे पत्रकारितेत वावरत आहेत.ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक माणसे जवळ केली.मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह आहे.अंदाजे 33 निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून त्यांनी काम केले आहे.तटस्थ,निर्भीड पत्रकार म्हणून आज ते नावाजले जातात.

       असे हे विविध कंगोरे असलेले सुकृत खांडेकर,यांचा सत्कार सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला.तसेच,पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा मुख्यमंत्रींच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील विविध स्तरावरील लोकांनी उपस्थिती लावली होती.आमदार बाळा नांदगांवकर,महापौर सुनील प्रभू,विरोधी पक्ष नेते विनोद तावडे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काही वरिष्ठ पत्रकार,घरची मंडळी आणि जीवलग मित्रांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
 

No comments:

Post a Comment