बाजारात दिसणाऱ्या फिकट पोपटी
रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस असं आहे. या फळाचं झाड
बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक प्रमाणात आढळतं.
बाजारात
दिसणाऱ्या फिकट पोपटी रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस
असं आहे. या फळाचं झाड बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक
प्रमाणात आढळतं.
अंदमान आणि निकोबार बेटावर हे
प्रामुख्याने आढळतं. या फळाच्या फुलांना चारच पाकळ्या आणि असंख्या पुंकेसर
असतात. या फळाचा रंग पांढरा, हिरवा किंवा फिकट गुलाबीही असून त्याची साल
चकचकींत असते. त्याच्या चकचकीतपणामुळे आणि आकारामुळे हे फळ वॅक अॅपल किंवा
बेल अॅपल या नावानेही ओळखलं जातं.
यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. तसंच
चवीला ते थोडंफार हिरव्या सफरचंदासारखं लागतं. या फळात जीवनसत्त्व सी,
फायबर, प्रथिनं, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते.
» जीवनसत्त्व ‘अ’चं प्रमाण यात अधिक असतं. याच्या सेवनामुळे पांढऱ्या रक्तपेशी वाढण्याला मदत होते.
» दिवसभर कॉम्प्युरटवर काम केल्याने डोळे
थकतात, जळजळ होते, कधी कधी त्यातून पाणीही येतं. असा त्रास नियमित होत
असलेल्यांनी या फळाचं नियमित सेवन करावं.
» लहान मुलांना ताप येत असेल तर याच्या फुलांचा लेप लावावा, आराम पडतो.
» पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने
उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. म्हणजे घामावाटे बाहेर पडणाऱ्या पाण्याची
झीज भरून काढायला मदत होते.
» अतिसार किंवा डायरिया आदी विकारांवरही हे फळ अतिशय उत्तम आहे.
» उष्णतेमुळे तोंड आल्यावर त्यावर आपण या फळाचं सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.
» वीर्यवृद्धीसाठीदेखील उपयुक्त आहे.
प्रिता झगडे
No comments:
Post a Comment