होय! हे शक्य आहे...
'वेबसाइट बिल्डर्स'च्या माध्यमातून तुम्ही विनामुल्य वेबसाइट बनवू शकता. गेली अनेक वर्षे 'वेबसाइट बिल्डर्स' फ्री वेबसाइटची सेवा पुरवित आहेत. जर तुम्हाला स्वत:चं किेंवा तुमच्या व्यवसायाचं ऑनलाईन मार्केटींग करायचं असेल तर त्यासाठी 'वेबसाइट बिल्डर्स' हा एक उत्तम पर्याय सध्या उपलब्ध आहे.
इंटरनेमुळे व्यापार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेत. व्यवसायाचा आवाखा वाढविण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पण त्यासाठी तुमचा व्यवसाय ऑनलाई असणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्या व्यवसायासाठी, इतर उपलब्ध पर्यायांच्या तुलनेत, ऑनलाईन मार्केटींग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यालाच वेब मार्केटींग असेही संबोधले जाते. पण वेब मार्केटींगसाठी वेबसाइट आवश्यक असते. फक्त वेबसाइटच्या माध्यमातूनच वेब मार्केटींग होत, असं नाही. पण स्वत:ची वेबसाइट हे तुमचं हक्काचं व्यासपीठं असतं.
वेबसाइट ही अनेकांसाठी अजूनही एक क्लिष्ट प्रक्रीया आहे. वेबसाइट बनवणं म्हणजे खर्चिक काम, असं अनेकांचं मतं आहे. काही अंशी ते योग्यही आहे. पण आता 'वेबसाइट बिल्डर्स'चा पर्याय उपलब्ध असल्यामुळे, वेबसाईटबाबत भीतीचं काही कारणं नाही. 'वेबसाइट बिल्डर्स' म्हणजे अशा वेबसाइट्स ज्या तुम्हाला फ्री वेबसाईट बनविण्यासाठी लागणा-या सर्व प्रणाली ऑनलाईन पुरवितात. पूर्वीचा ओबडधोबड वेबसाइट्सचा जमाना गेला. आता 'वेबसाइट बिल्डर्स' तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या डिझाइनचा समावेश असलेले टेम्प्लेट्स पुरवितात. या टेम्प्लेट्सच्या माध्यमातून एक सुंदर-सुबक अशी विनामुल्य वेबसाइट तुम्ही बनवू शकता.
websitebuildertop10.com च्या सर्वेक्षणानूसार 2016 मधील टॉप टेन 'वेबसाइट बिल्डर्स'...
www.sitebuilder.com 98%
www.websitebuilder.com 95%
www.sitey.com 91%
www.ehost.com 90%
www.sitelio.com 85%
http://www.webs.com/ 80%
www.siteblog.com 79%
www.godaddy.com 78%
http://www.squarespace.com/ 77%
http://www.1and1.com/ 76%
(नरेंद्र बयाणी)
(नरेंद्र बयाणी)
No comments:
Post a Comment