Saturday, 28 December 2013

हेरिटेज: काय व कसे?

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही 27 डिसेंबर 2013 ला दिवंगत आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांच्या समस्येवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.यंदाचा हा परिसंवाद हेरिटेज: काय व कसे?” यावर आधारित होता.या परिसंवादास मुंबई महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्री.दिनेश अफझलपूरकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास मटाले व आप्पा पेंडसे यांच्या कन्या वसुंधरा पेंडसे उपस्थित होते.
     महाराष्ट्राच्या पूनर्विलोकन समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र व मुंबईचा पूर्णतः अभ्यास असणारे श्री.दिनेश अफझलपूरकर यांच्या म्हणण्यानुसार, पाश्चिमात्य देशात पुरातन वास्तू जतन करण्यासाठी जी चळवळ होत होती,ताथील विचार आचरणात आणून महाराष्ट्रात असा कायदा 1991 मध्ये अंमलात आणला गेला(विकास नियंत्रण नियमावली कायदा क्र.67-हेरिटेज रेग्युलेशन कायदा).अफझलपूरकरांनी हेरिटेज वास्तूंअंतर्गत येणाऱ्या श्रेणी व त्यांची यादी प्रस्तुत केली.मुंबईतील काही भागांवर सुनावणी चालू असल्याने फार काही माहिती देणे त्यांना शक्य झाले नाही.
     यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी CRZ भागातील कोळी लोकांचे प्रश्न,चाळीत राहणाऱ्या लोकांच्या समस्या असा एकंदरीत वस्तुस्थितीचा चेहरामोहरा समोर आणला. फूटपाथवर झोपडी बांधून राहणाऱ्या लोकांना कालांतराने घर मिळते,तर आधीपासून वास्तव्यास असलेल्या लोकांच्या समस्यांचे काय?”अशा प्रकारच्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या.यावर या सर्व समस्यांस खूप गोष्टी कारणीभूत आहेत,त्यातील एक म्हणजे 1945-1947 यादरम्यान आलेला भाडे नियंत्रण कायदा कारणीभूत 

Friday, 29 November 2013

गरुडझेप

       
 दिनांक 20 नोव्हें.-13 रोजी,मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार श्री.सुकृत खांडेकर यांची एकसष्ठी साजरी झाली.आणि त्याचबरोबर त्यांच्या गरुडझेप या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
       सत्कारमूर्ती सुकृत खांडेकर हे गेली 40 वर्षे पत्रकारितेत वावरत आहेत.ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक माणसे जवळ केली.मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह आहे.अंदाजे 33 निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून त्यांनी काम केले आहे.तटस्थ,निर्भीड पत्रकार म्हणून आज ते नावाजले जातात.

       असे हे विविध कंगोरे असलेले सुकृत खांडेकर,यांचा सत्कार सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला.तसेच,पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा मुख्यमंत्रींच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील विविध स्तरावरील लोकांनी उपस्थिती लावली होती.आमदार बाळा नांदगांवकर,महापौर सुनील प्रभू,विरोधी पक्ष नेते विनोद तावडे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काही वरिष्ठ पत्रकार,घरची मंडळी आणि जीवलग मित्रांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
 

Saturday, 26 October 2013

17 वा स्मृतिदिन सोहळा

       
  दिनांक 20 ऑक्टोबर,2013 या दिवशी वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांचा 17 वा स्मृतिदिन होता. रविवार च्या संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वास्तूत त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती.शैक्षणिक क्षेत्रातील,राजकारणात रस असणारे,वृत्तपत्रात हिरीरीने काम केलेले वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
        वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांच्या 17 व्या स्मृतिदिनी प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक हे त्यांच्या शिष्या व पहिल्या महिला पत्रकार निला उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली संपादित झाले.मुंबई मराठी पत्रकार संघ आणि नवचैतन्य प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दि.वी.गोखले:व्यक्तित्व आणि कर्तुत्व हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
        प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.विनय सहस्त्रबुद्धे,डॉ.विजय कुवळेकर आणि डॉ. विनय हर्डीकर यांनी गोखलेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.गोखलेंचे जवळचे मित्र श्री.जयंत जोगळेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
        हे पुस्तक गोखलेंच्या कर्तुत्व,कामगिरी,व्यक्तिमत्व आणि पुण्याईची साक्ष देते.या पुस्तकात निरनिराळ्या विचारवंतांचे,लेखकांचे गोखलेंविषयीचे मत आणि विचार दिसतील. गोखलेंविषयी त्यांच्या सहकार्यांचे व मित्रांचे मत:-गोखले हे द्रष्टा पत्रकार,युद्धश्स्त्राचे अभ्यासक,संघ प्रचारक,कठोर,स्पष्ट वक्ते,सावरकरवादी,मार्गदर्शक,उदारमतवादी आणि पारखी होते.त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह होता.युद्धाविषयक पत्रकारितेची पायाभरणी गोखलेंनी केली होती.


        असे हे अष्टपैलू असणाऱ्या गोखलेंचा स्मृतिदिनी रविवारच्या भारावलेल्या संध्याकाळी त्यांच्या आठवणींमध्ये पार पडला.

Wednesday, 23 October 2013

ई-पेपर
   
आज दिनांक 12/10/2013,शनिवारचा दिवस.मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आमचे वेब चे लेक्चर होते.जयकृष्ण नायर हे आजचे आमचे लेक्चरर होते.त्यांची ओळख अशी की,ते प्रहारच्या ई-वृत्तपत्राचे चीफ आहेत.आजचे लेक्चर हे वृत्तपत्राचे ऑनलाईन एडिशन आणि ई-पेपर यांतील फरक काय?,यावर होते.
              आज लेक्चर थोडे उशिरा म्हणजे 6.20 ला चालू झाले.विद्यार्थ्यांची उपस्थिती काही कारणास्तव कमी होती,परंतु सर त्यांचे 100% द्यायला कुठेच कमी पडले नाहीत.6.20 ला सर आल्यावर सरांनी 10 मिनीटे साईटस् ओपन करण्यासाठी दिले,कारण त्यांना आम्हांला प्रक्टीकली दाखवायचं होतं.त्यानंतर जे त्यांनी शिकवायला सुरुवात केली,तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत कोणीच कंटाळलं नाही.
              सरांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करुन आणले होते.त्यावरुन त्यांनी एक-एक गोष्ट अगदी विस्तारुन सांगितली.ई-पेपर म्हणजे काय ,त्याचे प्रकार कोणते ,24x7 ऑनलाईन वेबसाईटस् असताना ई-पेपरची गरज काय ,वगैरे वगैरे....फक्त दिलेल्या विषयातच अडकून न राहता,त्यांनी इतर गोष्टींचे देखील व्यवस्थित ज्ञान दिले.जसे की,इंटरनेटचा इतिहास,त्याची पार्श्वभूमी,वृत्तपत्रांचा इतिहास,माध्यमांबद्दल माहिती आणि उत्तम प्रकारचे ई-पेपरचे उदाहरण देखील दिले.
              इंटरनेटवरील वृत्तपत्र दाखवून त्यांनी आमच्यामधे इंटरनेटवर वृत्तपत्र वाचण्याची आवड निर्माण केली.
              काही उत्तम ई-पेपर:-
1.     Times of India
2.     HT (news podcast)
3.     The Hindu
4.     Sakaal
5.     Lokmat
6.     Prahar
7.     Loksatta
     काही वेबसाईटस्:-
1.     epaper.mailtoday.in
2.     www.mid-day.com
3.     paper.hindustantimes.com
4.     epaper.loksatta.com
5.     epaper.prahar.in
for magazines:-
1.     imcl.in (business magazine)
2.     lokprabha.loksatta.com
3.     uniquefeatures.in/anubhav
4.     www.mediummagazin.de (German Magazine)
इथे जगभरातील 800 हून अधिक वृत्तपत्रे मिळतील:-
1.     www.newseum.org
2.     www.epapergallary.com



Saturday, 15 June 2013

अंतिम निकाल

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे गेल्या वर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेल्या वेब जर्नलिझम प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची ऑनलाइन लेखी परीक्षा दि. 18 मे 2013 रोजी पार पडली. या परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर वैयक्तिक ब्लॉग, वैयक्तिक वेबसाइट आणि सामूहिक ब्लॉगसाठी केलेल्या कामाचे एकूण मूल्यमापन करून या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा निकाल तयार केला आहे.

(वि. सूचना - तिघा विद्यार्थ्यांचा निकाल काही तांत्रिक कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. तो नंतर जाहीर करण्यात येईल.)
..................


मुंबई मराठी पत्रकार संघ
वेब जर्नलिझम प्रमाणपत्र अभ्यासक्रम
(2012-13)

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे -
1) मिनल माळी
लेखी परीक्षा - 48 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 75 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 55 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 10 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 188 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 58.75
..............

2) चैताली गुरव
लेखी परीक्षा - 47 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 75 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 50 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 10 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 182 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 56.87
.............

3) नमिता वारणकर
लेखी परीक्षा - 30 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 60 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 18 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 143 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 44.68
.................

4) नितीन मोरे
लेखी परीक्षा - 26 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 55 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 15 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 131 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 40.93
...............

5) प्रतिमा कांबळे
लेखी परीक्षा - 39 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 40 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 40 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 10 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 129 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 40.31
................

6) ममता सोनार
लेखी परीक्षा - 23 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 45 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 15 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 118 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 36.87
...............

7) कीर्ति कुलकर्णी
लेखी परीक्षा - 32 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 35 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 16 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 118 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 36.87
..............

8) श्रीराम केणी
लेखी परीक्षा - 25 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 42 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 15 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 117 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 36.56
..................

9) नीता मोहिते
लेखी परीक्षा - 20 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 45 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 40 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 10 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 115 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 35.93
.................

10) अरूणा शिंदे
लेखी परीक्षा - 14 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक ब्लॉग - 35 गुण (पैकी 100 गुण)
वैयक्तिक साइट - 35 गुण (पैकी 100 गुण)
अवांतर गुण - 10 गुण (पैकी 20 गुण)

एकूण गुण - 94 (पैकी 320 गुण)
टक्केवारी - 29.37
..............

11) विठोबा राऊत
(निकाल राखून ठेवला आहे.)
...................

12) नितीन पवार
(निकाल राखून ठेवला आहे.)
...................

13) अभिजीत चव्हाण
(निकाल राखून ठेवला आहे.)
.................

Sunday, 14 April 2013

सुटबुट में आया कन्हैया...

यंग आणि डायनामिक गेस्ट लेक्चरर संतोष टाकळे यांनी आमच्या वेब जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांवर जे गारूड केले, त्याचा अनुभव चैताली गुरव हिच्या शब्दांत....
...........................

शनिवारी दुपारी सुनिल सरांचा नेहमीप्रमाणे मॅसेज आला. नीलम रिएलेटर्सचे मॅनेजर संतोष टाकळे आजच लेक्चर घेणार आहेत. संध्याकाळचे पावणेसहा वाजले. ऑफिसमधून घाईत काम आटपून हुतात्मा चौकाजवळून जी मिळाली ती बस पकडून सीएसटीला आले. मी तर वेळेत पोहचले पण माझी सगळीच मित्रमंडळी तेथे नव्हती. आम्ही चौघच वर्गात होतो. एम.ए च्या पुस्तकातील चुका काढण्यात मी, श्रीराम आणि नितीन व्यस्त झालो. त्यातच नितीनची मस्करी करत असताना माझ्या मागून सुटबूटमध्ये एक व्यक्ती आली. हाय! मी संतोष टाकळे म्हणत त्यांनी त्यांच्या खांद्यावरची बॅग ठेवली. मला काही सेकंदांसाठी कळलच नाही काय बोलू ते. शेवटी हॅलो म्हणत मी माझ्या जागेवर जाऊन बसले. वर्गात चारच डोकी बघून सरांचा जरा हिरमोड झाला. आपण थोडया वेळात लेक्चरला सुरूवात करू असे म्हणत ते बाहेर जाऊन बसले.

पहिल्यांदाच कोणीतरी सर सुटबूटमध्ये लेक्चर घेण्यासाठी आले होते. आम्ही थोडे अचंबितच झालो आणि आमची आपली कुजबूज चालू झाली. शेवटच्या आठवडयात सायबर क्राइमच्या लेक्चरने कंटाळलेले आम्ही यावेळेस फार टेन्शनमध्ये होतो. तेव्हा म्हटल सुटबूटमे आया कन्हैया बॅण्ड बजाने को........ तितक्यात किर्ती मॅडम आल्या साडीमध्ये. किर्ती मॅडम आज चक्क साडी काही विशेष का? तर नेहमीप्रमाणे अगदी गोड हसत नाही सहजच अस म्हणाल्या. बोलता बोलता ब-यापैकी मुल आल्याने लेक्चरला ६.२०ला सुरूवात झाली.

पीपीटी चालू नसल्यामुळे थोडा अडथळा आला. सगळयांच्या ओळखीचा कार्यक्रम आटपला आणि प्रॉपर कम्युनिकेशन कस असाव हे उदाहरणासहित आम्हाला समजविण्यात आले. पण त्यानंतर ख-या लेक्चरला सुरूवात झाली. शांत असलेल्या पूर्ण वर्गाचे बोलक्या वर्गात रूपांतरण झाल. सरांनी सगळयांना त्यांच्या शब्दांनी आणि हसण्याने मंत्रमुग्ध केल्यासारख वाटत होत. तेव्हा वाईट वाटून मी स्वतःवरच रागवत होते. ज्या व्यक्तीवर आपण टिप्पणी करत होतो. ती व्यक्ती किती चांगली होती. दापोलीतील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संतोष सरांनी आमच्यावर जादूच केली. स्वतःबद्दल सांगताना त्यांच्या डोळयांमध्ये वेगळीच चमक होती. आमच सगळयांच मन तर गहिवरून आलच होत पण त्याचवेळेस सरांच्या हातावर काटा येत होता. त्यांचा शाळेच्या कापडी पिशवीतील पुस्तकांपासून ते लॅपटॉपपर्यंतचा प्रवास किती खडतर होता ते आम्हाला कळले. मी वेळेच उल्लंघन तर करत नाही ना, असे सर म्हणाले. सर उल्लंघन काय चांगलेच साडेआठ वाजून गेले होते. लेक्चरची वेळ फक्त ६ ते ८ चीच होती. पण आम्ही १० वाजले तरी चालतील असे म्हणालो आणि धमाल करण्यास सुरूवात झाली. आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टीची साथ घेऊ नका याची शिकवण त्यांनी दिली. मुलाखत घेणारे निखील वागळे, बालक पालकचा निर्माता रितेश देशमुख आणि युवासेना नेता आदित्य ठाकरे बनून त्यांनी वर्गात एक वेगळेच वातावरण तयार केले. पहिल्यांदा अॅशन्करिंग करताना मीनल आणि नीताचा आनंद ओसंडून वाहत होता. तीन तासात सरांनी आम्हाला आपलस केल.

वर्षानुवर्षे शाळेत, कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षकही इतके जवळचे वाटत नाही. पण सरांनी ते साध्य करून दाखवल. संतोष टाकळे ही अनोळखी असणारी व्यक्ती आम्हाला आपलीशी वाटू लागली. त्यावेळेस मी मनात म्हणाले, सुटबूटमे आया कन्हैया हमे अपना बनाने को. मोठ होण्यासाठी वाईट परिस्थिती असली तरी हार मानू नये. जर जिद्द असले तर आपण सर्व काही सार्थ करू शकतो. तेव्हा तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचण्यास कोणीच रोखू शकत नाही. याचच उदाहरण म्हणजे संतोष सर. त्यादिवशी लेक्चर संपूच नये असे वाटत होते. पण शेवटी सरांचा निरोप घ्यावा लागला.

संतोष सर तुम्ही सांगितल आहे की, आमच अजून एक लेक्चर घेणार म्हणून तर त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. सर, अगदी मनापासून सांगते तुम्ही त्यादिवसापासून माझ्यासाठी आयडॉल झालात. तुम्हाला मी लेक्चरच्या शेवटी म्हणाले होते ना, तुम्ही फार छान हसता. तुमच हे हास्य नेहमी असच राहो ही सदिच्छा. मी आणि माझे वर्गमित्र सर्वच तुमचे फार आभारी आहोत.

- चैताली गुरव

Thursday, 7 March 2013

Happy Woman' s Day !!!




                                                   जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा







                                              जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा !!!!
                                                            Happy Woman's Day
   
   -Ni3more

Tuesday, 5 March 2013

वेबसाइट लाँचिंग webjournalist.webs.com

वेब जर्नलिझमचे धडे गिरवणा-या विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, या एकमात्र हेतूने प्रायोगिक तत्त्वावर webjournalist.webs.com ही नवी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शशिकांत सांडभोर यांच्या हस्ते शनिवार दि. 2 मार्च 2013 रोजी या वेबसाइटचे लाँचिंग झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने चालवण्यात येणा-या पत्रकारिता अभ्यासक्रमांचे समन्वयक प्रमोद चुंचुवार आणि प्रमोद इंदुलकर देखील उपस्थित होते.

वेब जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशीच या नव्या साइटची रचना आहे. विद्यार्थ्यांनी केलेले लिखाण तसेच ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार या व्यासपीठावरून सर्वांना पाहता येतील. वेब जर्नलिझमच्या अफाट विश्वात आमच्या विद्यार्थ्यांचे हे पहिले पाऊल आहे. या प्रामाणिक प्रयत्नाला आपण सर्वांनीही सहकार्य करावे, वेब जर्नलिझममधील नव्या शिलेदारांच्या धडपडीला मनमोकळी दाद द्यावी, या अपेक्षांसह ही वेबसाइट लाँच करत आहोत.

वेबसाइट पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा....
http://webjournalist.webs.com/

- सुनील घुमे

वृत्तसंपादन

वृत्तपत्रामध्ये वृत्तसंपादन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. गेली अनेक वर्षे वृत्तसंपादनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे दै. 'नवशक्ति'चे संपादक श्री. तुषार नानल यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या या मोलाच्या टिप्स....

...................................

वृत्तपत्राच्या निर्मितीत वृत्त संपादन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बातमीसाठी जे पाच ‘क’ असतात (का, कुणी, केव्हा, कसे आणि कुठे) त्यांचा समुच्चय असल्याशिवाय कोणतीही बातमी पूर्ण होत नाही. आपल्या वृत्तपत्राचा वाचक हा सर्वज्ञानी आहे, असा गैरसमज करून घेऊन बातमी लिहिणे वा प्रसिध्द करणे हे उचित नसते. एखाद्या घटनेचा पुढील परिणाम म्हणून जी बातमी दिली जाते, ती देताना मूळ घटनेचा धावता उल्लेख आवश्यक तपशिलासह दिला जातो, तो याचमुळे. बातमीदाराने बातमी तशी दिलेली आहे की नाही हे पाहणे आणि नसल्यास त्यात आवश्यक ती भर घालणे हे वृत्त संपादन करणार्‍या व्यक्तीचे प्रमुख काम आहे. त्याकडे वळण्यापूर्वी वृत्तपत्राच्या कामकाजाचे स्वरूप कळून घेणे आवश्यक आहे. दिवस उगवल्यापासून रात्री वृत्तपत्र छपाईसाठी जाईपर्यंतचा काळ हा वृत्तपत्रासाठी महत्वाचा असतो. त्यादृष्टीने वृत्तपत्रात काही विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

वृत्तपत्र निर्मितीप्रक्रियेच्या रचनेत जे प्रमुख विभाग असतात ते पुढीलप्रमाणे :

1. संपादकीय
2. प्रॉडक्शन (यात छपाईपूर्व तांत्रिक प्रक्रिया आणि छपाई यांचा समावेश असतो.)
3. जाहिरात
4. वितरण

याखेरीज एखाद्या कार्यालयासाठी आवश्यक असणारे अन्य विभागही वृत्तपत्राच्या कार्यालयात असतात. उदा. व्यवस्थापन, एचआर, अकाऊंट, वगैरे.

संपादकीय विभागाची साधारणत: रचना अशी असते  -

1. मुख्य संपादक
2. सहाय्यक संपादक
3. वृत्तसंपादक
4. मुख्य वार्ताहर / मुख्य उपसंपादक
5. वरिष्ठ वार्ताहर / वरिष्ठ उपसंपादक
6. वार्ताहर / उपसंपादक

या रचनेत वृत्तपत्राच्या गरजांनुसार बदल होऊ शकतो. याचाच अर्थ संपादकीय विभागात बातमीदार आणि उपसंपादक असे दोन विभाग असतात. बातमीदार म्हणजे कार्यालयाच्या बाहेर विविध ठिकाणी रोज जाऊन तिथून माहिती, तपशील मिळवून त्याअनुषंगाने बातमी तयार करणारी व्यक्ती. तर उपसंपादक म्हणजे बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आवश्यक संपादकीय संस्कार करणारी व्यक्ती. शिवाय उपसंपादकाला शहराबाहेरील बातम्यांचेही संपादन करावे लागते. ज्या ठिकाणी आपल्या वृत्तपत्राचा वार्ताहर/प्रतिनिधी नसेल तेथील बातम्या वृत्तसंस्थेकडून मिळवून घेणे, त्यावर संस्कार करणे, त्याचप्रमाणे देशातील व देशाबाहेरच्या बातम्या वृत्तसंस्थेकडून इंग्रजीत येतात त्यापैकी आपल्याला ज्या बातम्या घ्यावयाच्या आहेत त्याचे भाषांतर करणे हे उपसंपादकाचे काम असते. हे सगळे काम कार्यालयात बसूनच करायवाचे असते त्यामुळे या विभागाला ‘डेस्क’ असेही म्हणतात. याखेरीज रविवार आवृत्ती आणि अन्य पुरवण्यांसाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र विभाग असतो.

आपण रोज सकाळी जे वृत्तपत्र वाचतो, त्याची निर्मिती प्रक्रिया ही आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून सुरू होते. म्हणजे उदाहरण घ्यायचे, तर मंगळवारी आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याची तयारी सोमवार सायंकाळपासून सुरू केली जाते. संपादकीय विभागाच्या दृष्टीने ही तयारी म्हणजे काय? तर दिवसभरातील घडामोडी, मग त्या आपल्या शहरातील, राज्यातील, देशातील अथवा परदेशातील असतील, त्यांचा विचार केला जातो. त्यापैकी कोणत्या घडामोडी ह्या बातम्या आहेत, त्यांचे आकारमान किती असायला हवे, त्यांचे सादरीकरण कसे असायला हवे या सगळ्या गोष्टी संपादकीय विभागातील ‘डेस्क’ने निश्‍चित करायच्या असतात. आज इलेक्ट्रॉनिक मिडीया मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे एकंदरच मिडीयात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पत्रकारितेत करीअरसाठी येणार्‍यांनी त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. वाढती स्पर्धा म्हणजे नोकर्‍यांच्या भरपूर संधी असा संकुचित अर्थ कुणी घेऊ नये. वृत्तपत्रांसाठी वाढती स्पर्धा म्हणजे, प्रत्येकावर अधिकाधिक सजग, अचूक, नेमके आणि समाजाला योग्य दिशा देणारे विचार पोचवण्याची वाढती जबाबदारी, असा अर्थ आहे.

वृत्तपत्र छपाईला जाण्यापूर्वी ते उपसंपादक आणि मुख्य उपसंपादकाकडून तयार केले जाते. प्रत्येक पानावर कोणत्या बातम्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या, किती घ्यायच्या, त्याला सोबत छायाचित्र घ्यायचे का याचा निर्णय वृत्तसंपादक आणि अन्य वरिष्ठ करतात. मात्र, त्यासाठी वृत्तसंपादकांना दिवसभरातील घडामोडींविषयी आपल्याकडे असलेल्या मजकुराबाबत पूर्ण माहिती मुख्य उपसंपादक आणि मुख्य वार्ताहराने द्यावयाची असते. त्यासाठी या दोघांनाही सगळ्या बातम्यांचा दैनंदिन माग ठेवावा लागतो. वरिष्ठांच्या बैठकीत ठरल्यानुसार, प्रत्यक्ष अंकात बातम्या घेण्याची जबाबदारी मुख्य उपसंपादकाची असते. तसेच त्या बातम्यांचे संपादन / भाषांतर उपसंपादकांकडून करवून घेणे हेही मुख्य उपसंपादकाचे काम आहे. यासाठी त्याला वरिष्ठ उपसंपादकाने साह्य करणे अपेक्षित असते. म्हणजेच वरिष्ठ उपसंपादकाने मुख्य उपसंपादक आणि उपसंपादक अशा दोन्ही भूमिकांची जाण ठेवून गरजेनुसार ती ती भूमिका वठवायची असते.

आज सर्वच क्षेत्रांत तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे. वृत्तपत्र क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पूर्वीच्या काळी बातम्या कागदावर लिहून त्या जुळार्‍याकडे पाठवल्या जात. तो ती बातमी खिळेजुळणी तंत्राने तयार करीत असे. त्याचे प्रिंट काढून प्रुफरीडिंग केले जाई आणि पूर्णपणे चुका दुरुस्त केलेल्या बातमीचा खिळे जुळवलेला तुकडा पानाच्या आकारात ठेवला जाई. अशा रीतीने पान पूर्ण भरले की त्याची प्लेट तयार करून मग ती छपाईला मशीनवर लावली जात असे. यात कालानुरूप विविध बदल होत गेले आणि आज वृत्तपत्र हे जवळजवळ पूर्णपणे संगणकावर तयार होऊ लागले आहे. जवळजवळ एवढ्याचसाठी म्हटले की अजूनही ग्रामीण भागात संगणकीकरण पूर्णांशाने झालेले नाही.

हे सगळे नमूद करण्याचे कारण म्हणजे, या बदलांचा थेट परिणाम हा उपसंपादकाशी म्हणजेच त्याच्या कामाच्या पध्दतीशी निगडित आहे. या पार्श्‍वभूमीवर उपसंपादकाचे काम करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, हे जाणून घेऊ या.

भाषा
ज्या भाषिक वृत्तपत्रात उपसंपादक काम करतो, त्या भाषेचे सखोल ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मराठी भाषिक वर्तमानपत्रात डेस्कवर (किंवा रिपोर्टिंगलाही) काम करणार्‍याला मराठीचे ज्ञान गरजेचे आहे. मराठी ही आपली मातृभाषा तर आहे, त्यात वेगळे शिकण्यासारखे काय आहे, असा दृष्टीकोन नसावा. भाषा नीट ठाऊक नसली तर अनेक गोंधळ होऊ शकतात. वृत्तपत्रातून प्रसिध्द होणारी बातमी एकाचवेळी हजारा/लाखो वाचकांपर्यंत जाते. हे वाचक विविध थरांतील असतात. त्या सर्वांना ती बातमी नीट समजावी, यासाठी भाषा नेमकी असणे महत्वाचे आहे. आपल्यालाच जर एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक नसेल तर प्रत्येक वाचकाला तो शब्द समजेल हे गृहित धरणे चूक आहे. त्यामुळे बातमी ही नेहमी साधी, सोप्या भाषेत लिहिलेली, नेमकेपणा असणारी हवी. अनेकांना भाषेशी खेळण्याची सवय असते. बातमी देताना भाषेशी खेळणे उचित नाही. कारण तसे करताना बातमीचा आत्मा निसटण्याचा संभव असतो. बातमीचे शीर्षक देताना क्वचितप्रसंगी भाषेचा खेळ चालू शकतो. भाषेचे ज्ञान नसले तर कोणता शब्द कुठे हवा हे समजत नाही आणि अर्थाचा अनर्थ घडू शकतो. यासाठी किमान व्याकरण ठाऊक असायला हवे. त्याचबरोबर शुध्दलेखन येणे हाही उपसंपादकासाठी महत्त्वाचा घटक आहे. र्‍हस्व, दीर्घ, आकार, उकार याची माहिती उपसंपादकाला असलीच पाहीजे. कोणता शब्द कसा लिहितात, हेही उपसंपादकाला माहीत असणे आवश्यक आहे. उदा. ठाऊक की ठावूक, होऊन की होवून, विशिष्ट की विशिष्ठ, पोलीस की पोलिस, सरकार की शासन, परीक्षा की परिक्षा, लखनौ की लखनऊ, चौकशी की चवकशी इ. अर्थात, यासाठी वृत्तपत्रांची आपापली शैलीपुस्तिका असतेच.

याखेरीज उपसंपादकाला इंग्रजी भाषेचेही आवश्यक ज्ञान असले पाहीजे. ते केवळ कामचलाऊ असून उपयोगाचे नाही. याचा अर्थ इंग्रजी साहित्य असा नाही. कारण इंग्रजी शब्दांचे अर्थ विविध छटांसह माहिती नसतील तर भाषांतर करताना चुकीचा अर्थ भाषांतरित होईल. उदा. Jammu police today recovered huge catche of arms. It contains 25 rifels, 500 magazines, 200 handgreneds and 48 pistols.

याचे भाषांतर एकाने पुढीलप्रमाणे केले :
जम्मू पोलिसांनी आज मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यात 25 रायफली, 500 मासिके, 200 हातबॉंब आणि 50 पिस्तुलांचा समावेश आहे. काडतुसांऐवजी मासिके असे होऊ नये, याची काळजी उपसंपादकाने घ्यायची असते.

व्याकरणाची किमान माहिती उपसंपादकाला असायला हवी. कर्ता, कर्म, क्रियापद योग्य प्रकारे बातमीत आहे याची तपासणी उपसंपादकाने करावयाची असते. वाक्यरचनाही सुविहित करण्याची जबाबदारी उपसंपादकाची असते. उदा. थंडगार कैरीचे पन्हे असे न लिहिता कैरीचे थंडगार पन्हे असे लिहिणे आवश्यक आहे. अर्थाचा अनर्थ होऊ नये याची काळजी घेणे हे उपसंपादकाचे काम आहे.

सामान्य ज्ञान
उपसंपादकासाठी सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामान्य ज्ञान म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांसाठी असते तसे नाही. ‘कोन बनेगा करोडपती’साठी जे सामान्य ज्ञान लागते ते वेगळे. उपसंपादकाला आपले शहर, राज्य, देश, जगातले किमान महत्त्वाचे असे राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक तसेच प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेचे, साहित्य, न्याय, राजकारण याबद्दलचे सामान्य ज्ञान असायला हवे. अथे सामान्य ज्ञान याचा अर्थ किमान माहिती असा आहे. म्हणजे 1352 साली युरोपात कोणता सत्ताधीश बलवान होता हे ठाऊक नसले तरी हरकत नाही. मात्र, तुम्ही जर मुंबईतील वर्तमानपत्रात काम करीत असाल तर मुंबईची महानगरपालिका काय करते, तिचे मुख्यालय कुठे आहे, किती नगरसेवक आहेत, किती वॉर्ड आहेत, महापौर कोणत्या पक्षाचा आहे, या शहराची राजकीय, सामाजिक, आर्थिक गणिते काय आहेत, इथल्या रहिवाशांच्या समस्या कोणत्या आहेत वगैरेसारखी माहिती तुम्हाला असलीच पाहीजे. अशाच प्रकारे आपले राज्य, आपला देश याची माहिती असायला हवी. बातमी करताना एखाद्या गावाचा वा शहराचा उल्लेख आला तर ते गाव किंवा शहर कोणत्या राज्यातले आहे हे ठाऊक नसेल तर जाणून घेतले पाहीजे. आपल्या राज्यातील एखादे गाव कोणत्या जिल्ह्यात येते किंवा राज्याचे प्रशासकीय विभाग कोणते, कोणता जिल्हा कोणत्या विभागात येतो, इ. बाबी उपसंपादकाला माहीती नसतील तर तो बातमीत आवश्यक त्या दुरुस्त्या करू शकणार नाही.

याचप्रमाणे उपसंपादकाला पदांची माहिती असली पाहीजे. म्हणजे लष्कर, नौदल, पोलीस, सरकारी यंत्रणा, तसेच परदेशातील मंत्रिपदे इ. म्हणजे आपल्या देशात minister of Finance असेल तर अमेरिका-ब्रिटनमध्ये तो Secretary of Finance असतो. हे ठाऊक नसेल तर भाषांतर करताना आपण अर्थसचिव असे शब्दश: करू आणि ते चुकीचे असेल.

बातमीची जाण
उपसंपादकाकडे एखादी बातमी ज्यावेळी संपादनासाठी किंवा भाषांतरासाठी येते तेव्हा त्या बातमीचा विषय ठाऊक नसेल तर बातमी असेच तिचे महत्त्व कळू शकणार नाही. त्यामुळे उपसंपादकाला बातमीची जाण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, बातमीत काय असावे आणि काय नसावे हे त्याला माहीत असणे संपादनाच्यादृष्टीने गरजेचे असते. बातम्यांचे संंपादन करताना पुढील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे - बातमीत बिनचूकपणा आणणे, शक्यतो अवजड शब्द न वापरणे, प्रत्येक वाचकाला कळेल अशा रीतीने बातमी लिहिलेली असणे, मूळ बातमी तशी नसेल नर त्या रीतीने पुनर्लेखन करणे, बातमीला अंतीम रूप देताना शीर्षक-इन्ट्रो-तपशील-शेवट हा क्रम राखणे.

तंत्रज्ञान/लेआऊट
नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या उपसंपादकाला बातम्या कम्प्युटरवर स्वत: ऑपरेट कराव्या लागतात. त्यामुळे संगणकावर काम करण्याचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच वृत्तपत्राची पानेही आता संगणकावरच तयार होत असल्यामुळे पान कसे लावायचे याचेही ज्ञान उपसंपादकाला असले पाहीजे. (या दोन्ही बाबी वार्ताहरांनादेखील आता आवश्यक होत आहेत.) संगणकावर पान लावण्यासाठी अगदी किमान तांत्रिक माहिती आवश्यक असते. आपल्याकडे, पान लावण्यासाठी तीनपैकी एका सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. ही सॉफ्टवेअर्स पुढीलप्रमाणे आहेत - 1) पेजमेकर 2) क्वार्क एक्सप्रेस आणि 3) इन डिझाइन. यापैकी पेजमेकरचा वापर हा प्रामुख्याने मासिके, नियतकालिक यांच्यासाठी केला जातो. पूर्ण आकाराच्या म्हणजे ब्रॉडशिट वृत्तपत्रासाठी इतर दोन सॉफ्टवेअरचा वापर होतो. ही सॉफ्टवेअर वापरणे अवघड नाही.

साधारणपणे आठपंधरा दिवसांचा सराव त्यासाठी पुरेसा असतो. ही सॉफ्टवेअर्स वापरतानाच उपसंपादकाने पानाच्या रचनेबाबत म्हणजेच लेआऊटबाबत लक्ष दिले पाहीजे. आपल्याकडे असलेली बातमी अधिकाधिक वाचनीय केल्यानंतर आपल्याकडील पानही अधिकाधिक प्रेक्षणीय करता आले पाहीजे. त्यासाठी बातम्यांची मांडणी, बातमीसंदर्भातील छायाचित्र वा अन्य व्हिज्युअलचा वापर करू केलेली सजावट, चौकटी, रंगांचा वापर, आकर्षक आणि विविध फॉंटसचा शीषर्कासाठी वापर आदी गोष्टी लेआऊट करताना उपयुक्त ठरतात.

उदा. दोन कॉलम आकाराच्या बातम्या शक्यतो शेजारी शेजारी लावू नये. त्यात मध्ये शक्य असल्यास छायाचित्र वा सिंगल कॉलम बातमी लावावी. जागेअभावी अथवा अन्य काही कारणाने अशा प्रकारे बातम्या शेजारी शेजारी लावणे भाग पडत असेल तर दोन्ही बातम्यांच्या शीषर्काचे फॉंट ठळकपणे वेगळे दिसतील, असे वापरावे. पानाचे लेआऊट करताना साधारणत: मुख्य बातमी (लीड), छायाचित्र आणि तळातील बातमी (अँकर) यांचा समतोल साधला पाहीजे.

उपसंपादक कसा हवा?
- तो चांगला वाचक हवा. कारण अधिकाधिक विषयांवरचे वाचन कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
- सभोवताली घडणार्‍या घटनांचे त्याला भान असायला हवे. कारण या घडामोडी किंवा त्यांचे परिणामच बातमीरूपाने उपसंपादकासमोर येत असतात.
- बातमीसाठी आवश्यक संदर्भ ठाऊक असले पाहीजेत. त्यासाठी सामान्य ज्ञान सतत अपडेट करायला हवे.
- प्रादेशिक, सांस्कृतिक, राजकीय वैशिष्ट्ये ठाऊक असावीत.
- त्याला एकाचवेळी समूहमन आणि विशिष्ट समाजघटकांच्या भावना यांचे भान बातमी संपादित करताना ठेवता आले पाहीजे.
- उपसंपादकाकडे विश्‍लेषणात्मक दृष्टीकोन असला पाहीजे.
- बातमी कशी विकसित होईल तसेच तिचे सर्वसमान्यांवर काय परिणाम होऊ शकतील, याची जाणीव उपसंपादकाला असली पाहीजे. त्यामुळे बातमीचे महत्व त्याला कळू शकते.
- वृत्तपत्रनिर्मिती ही सामूहिक प्रक्रिया आहे. कोणाही एका माणसाचे ते काम नाही, याची जाणीव हवी.
- वृत्तपत्र निर्मितीत वेळ किंवा वशरवश्रळपश याला अत्यंत महत्व असते. राज सकाळी वाचकापर्यंत आपले वृत्तपत्र वेळेत जाण्यासाठी ही निर्मिती प्रक्रिया वेळेतच होणे आवश्यक असते. ही वेळ सांभाळण्याची जबाबदारी डेस्कवर असते.
- बातम्या संपादित करताना वाचक हा केंद्रबिंदू मानला पाहीजे. तसेच बातम्या पूर्वग्रहावर आधारित असणार नाहीत, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्रात काम करताना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यादृष्टीने प्रकृतीची काळजी सदोदित घेणे आवश्यक आहे. भरपूर तास, न अकता विशेषत: रात्री काम करण्याची शारीरिक तसेच मानसिक क्षमता आणि तयारी हवी.

- तुषार नानल

Wednesday, 16 January 2013

चलो वाशी... अभ्यास दौरा

हाय फ्रेंडस,
येत्या शनिवारी दि. 19 जानेवारी 2013 रोजी दुपारी 3 वाजता आपण सगळे श्री. मंदार फणसे यांच्या bharat4india.com या वेबसाइटच्या ऑफिसला भेट देण्यासाठी जाणार आहोत.
अर्थात हा आपल्या अभ्यासाचाच एक भाग असल्याने पुन्हा शनिवारी (दि. 19 जानेवारी) सायंकाळी 6 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात वेगळे लेक्चर होणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
आपणा सर्वांच्या आग्रहाखातर हा दौरा आयोजित केलेला आहे. त्यामुळे कुणीही दांडी मारणार नाही आणि सबबी सांगणार नाही, अशी अपेक्षा आहे.
सर्वांनी पुढील पत्त्यावर वेळेवर हजर राहावे...
धन्यवाद.
पत्ता - बीएसईएल टेक पार्क, सी विंग, पहिला मजला, इनऑर्बिट मॉलच्या समोर, वाशी स्टेशन
वेळ - दुपारी 3 वाजता

- सुनील घुमे

Monday, 14 January 2013

राजकीय पत्रकारिता



Date : ११ - ०१ - २०१३
Lecturer : मधुकर कांबळे

राजकीय पत्रकारिता
राजकीय पत्रकारीता करताना सर्व विषयाला जाणून घेऊन विचार करावा. जिज्ञासा कायम जागी असावी. ज्या नैसर्गिक घटना घडत असतात तेव्हा त्याच्या विरोधी घटना ही घडत असतात. त्याला बातमी बोलतात.त्यामध्ये विरोधाभास शोधणे. चांगली निरीक्षण द्ष्टी असली पाहिजे.भारतीय राज्य घटना माहित असली पाहिजे. पत्रकारिता करताना बुद्धिवादी, तर्कवादी, निष्टावादी, असले पाहिजे. 
मंत्रालय म्हणजे काय?
मंत्रालयामध्ये काम करताना आपल्याला बेसिक रिपोटीग आले पाहिजे. म्हणजे प्रशासन म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक असते.
आपल्याला राजकीय पत्रकार म्हणून काम करताना लोकशाही रचना माहिती पाहिजे.लोकशाहीच्या रचनेवर कामकाज सिस्टिम वर आपली सगळी शासनाची व्यवस्था चालु असते. मंत्रालयात  भाषाविभाग आणि अल्पसंख्याक विभाग एकूण २७ विभाग आहेत.या प्रशासकिय विभागात ज्या घडामोडी घडतात त्याचे रिपोटीग करणे. शासन जेव्हा एखादा निर्णय घेते त्यामागे एक राजकीय हेतु असतो. त्याला विरोध करणारी ऐक यत्रंणा असते त्याला विरोधी पक्ष म्हणतात. मत्रांलयात काम करताना तूमचा संपर्क हा दाडगा जेणे करुन तूम्हाला कोणतीही न्यूज मिळवताना अडचणी येत नाहीत.सबंध सर्व थराच्या लोकांपर्यत असायला पाहिजे.
विधिमंडळ रिपोटीग
महाराष्ट्राचेतीन अधिवेशन होतात. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर संबंध ठेवावे लागतात.जे तारतम्य ठेवावे लागते त्या तारतम्याला अभ्यासाची जोड असणे गरजेची असते.आपण पत्रकारिता करीत असताना आपण ज्या सोर्स कडून बातमी मिळवणार आहोत त्याचे नाव कोणाला हि सांगू नये जर सांगितले तर तो सोर्स आपल्याला ती बातमी देणार नाही. म्हणून त्यामुळे त्या सोर्स ला आपल्या बदल कटुता निर्माण होऊ नये आणि आपल्या बद्दल ची धास्ती आणि आदर राहिला पाहिजे. आपली नजर कायम वेगवेगळी बातमी शोधणारी पाहिजे आणि वेगवगळे शोधण्याची धडपड पाहिजे.
जर आपल्याला कोणत्या हि बातमीची किवा घटनेची इतम्भूत (सविस्तर) माहिती पाहिजे असेल तर ईऊघ ओमू (मानवी अधिकार आयोग) ने आपण ती माहिती मिळवू शकतो उदाहरणार्थ : आपल्या राज्यात आताच टोलनाक्या वरून खूप आंदोलने झाले कि आम्ही टोल भरणार नाही टोल रद्द करा म्हणून खूप आंदोलने झाले. एकूण किती टोलनाके आहेत. कोणत्या कंपनीला काम दिले आहे. त्या रस्त्याला किती खर्च आला आहे. हि इतम्भूत (सविस्तर) माहिती आपण ईऊघ ओमू ने मिळवू शकतो आणि ती पत्रकार म्हणून आपण लोकांसमोर आणि आपल्या समजा समोर मांडू शकतो.
लोकशाहीत पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हणून गणले गेले आहे


-Nitin More

Sunday, 13 January 2013

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेछा!!!!!


                                
                                                            
                                                         

           
             महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! मकरसंक्रांत हा भारतातील शेती संबंधित सण आहे. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथिला मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यादिवसापासून सुर्याचे उत्तरायण सूरु होते.पृथ्वीवरुन पाहिले असता सुर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते हा सण सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यास भोगी, संक्रांती व किंक्रांती असे म्हणतात.संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश भाषा महिन्यानुसार हा दिवस १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 मकरसंक्रांती  येण्याची चाहूल लागताच सर्वत्र लाडवाचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक आनंद पसरतो. काही काही घरात तर गृहिणी आवर्जून तिळाचे लाडू बनवतात . संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. हा सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी आणि  तिळामध्ये उष्णता असल्याने ह्या सणाला तिळाचे लाडू बनवले जातात. या सणाला सर्वत्र वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडविले जातात. लहान मोठे सर्वच जन पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.


                                            तुम्हा सर्वाना मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
                                                      तिळगुळ घ्या गोड गोड बोल !!!

                                                
   

   -Nitin More

Thursday, 10 January 2013

आमची मुंबई... 'सुरक्षित ' मुंबई..? (प्रोजेक्ट)

हाय फ्रेंडस,
राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिलांवरील वाढते बलात्कार आणि अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला आहे.
अशा स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..?
कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशीरापर्यंत घराबाहेर असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?
रात्री-अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का..?
घराबाहेर सोडा, निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का..?

याच विषयावर आपण सर्वांनी आपापल्या जीवनातील वैयक्तिक अनुभव शेअर करावेत, असे वाटते.
विशेषतः विद्यार्थिनींनी...
एकापेक्षा जास्त अनुभव असतील तरीही चालतील.
विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील, ओळखीच्या महिला वर्गाला आलेले अनुभव शब्दबद्ध करावेत.
वेब जर्नलिझम शिकणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हे वैयक्तिक अनुभव केस स्टडी म्हणून आपण विचारात घेऊ आणि मुंबई खरोखरच महिलांसाठी सुरक्षित आहे का, याबाबत आपल्यापुरता प्रातिनिधीक निष्कर्ष काढू...
हा उपक्रम प्रोजेक्ट म्हणून सर्वांनी करायचा असून, येत्या आठवडाभरात आपापले लेख इ-मेलवरून पाठवावेत तसेच आपापल्या वैयक्तिक ब्लॉगवर देखील अपलोड करावेत.

एकूण गुण - 50
शब्दमर्यादा - किमान 1 हजार शब्द
प्रोजेक्ट सादर करण्याची अंतिम तारीख - 18 जानेवारी 2013

निर्धारित मुदतीनंतर आलेल्या मेलचा विचार केला जाणार नाही आणि त्यासाठी गुण मिळणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद.

- सुनील घुमे
9821911700
sunilghume@gmail.com

Monday, 7 January 2013

न्यू इयर सेलिब्रेशन

हाय फ्रेंड्स,

2013 या नव्या वर्षाची सुरूवात शनिवारी (दि. 5 जानेवारी) एकदम झक्कास झाली...
वेब जर्नलिस्ट बनण्याचा जो संकल्प आपण केला आहे, त्याचे सेलिब्रेशन सर्वांनी मिळून केले.
जल्लोषात.
कीर्ति कुळकर्णी मॅडमच्या हस्ते यावेळी केकही कापण्यात आला...

हा मान त्यांनी मिळवला, तो त्यांच्या मेहनतीने, कष्टाने आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नाने...
गेल्या चार-साडे चार महिन्यात आपण जी काही थोडीफार प्रगती करू शकलो, त्याची चाचपणी करण्यासाठी डिसेंबर अखेरीस एक लेखी परीक्षा झाली. त्या परीक्षेला केवळ चारच विद्यार्थी उपस्थित होते. बाकीच्यांना बहुतेक इयर एन्डिंगच्या मूडमध्ये लेक्चरसाठी वेळ नसावा... असो.

तर ही लेखी परीक्षा आणि त्याआधी एकदा झालेली लेखी परीक्षा... या दोन्ही परीक्षांचा निकाल, ब्लॉगवरील लिखाण, दिलेल्या सूचनांचे नियमित पालन, लेक्चरसाठीची हजेरी, अभ्यासपूर्ण चर्चा आणि वेब जर्नलिस्ट बनण्यासाठीची धडपड अशा विविध निकषांवर कीर्ति मॅडम अव्वल ठरल्या.

स्टुडंट ऑफ द इयर... 2012
म्हणून त्यांचा हा सन्मान...

त्याशिवाय आणखी तिघा विद्यार्थ्यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले.





श्रीराम केणी




नमिता वारणकर


आणि ममता सोनार...

हे होते आपले 'चॉकलेट कुमार' किंवा 'चॉकलेट कुमारी'...
त्यांनी केवळ लेखी परीक्षा दिली म्हणून त्यांचे कौतुक नाही. तर कोर्स सुरू झाल्यापासून त्यांनी जे सातत्य दाखवले आहे, त्याचा हा रिझल्ट होता. ममताचे खास कौतुक अशासाठी की, मराठी भाषिक नसतानाही ती ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे, ती काबिल-ए-तारीफच आहे.

त्याशिवाय आणखीही बरीच धम्माल झाली. गप्पागोष्टी रंगल्या.
नीता मोहितेंनी तर माझीच प्रकट मुलाखत घेऊन टाकली. एकदम वेगळ्या अशा विषयावर.
थँक्स नीता...
नीता आणि तिच्यासह या धम्मालमस्तीत सहभागी झालेल्या सर्वांसाठी खास लिंक सोबत देत आहे.
http://mumloverspot.blogspot.in/

आता ही काय भानगड आहे, हे बाकीच्यांना कळणार नाही.
त्याला माझा काही इलाज नाही.
सो एन्जॉय...

(ता.क. - जे कुणी लेखी परीक्षेला बसले नव्हते (म्हणजेच आले नव्हते) ते फेल झालेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.)

- सुनील घुमे

Wednesday, 2 January 2013

हॅप्पी न्यू इयर

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
वेब जर्नलिस्ट होण्याचा आपला संकल्प लवकरात लवकर तडीस जावो, हीच सदिच्छा...
- सुनील घुमे