Saturday, 25 January 2014

विवेकाचा जागर....

श्रद्धेचा जेव्हा अतिरेक होतो,तेव्हा अंधश्रद्धेचा जन्म होतो.जवळ जवळ 18 वर्षे रखडलेल्या जादूटोणविरेधी कायद्याचा वटहुकूम एका दिवसात जारी केला आणि त्यावर राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी शिक्कामोर्तब केलं.त्यामुळे आता जादूटोणा,अघोरी प्रथा यांचा अवलंब करणाऱ्यांना आणि अशा कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना किमान सहा महीने ते सात वर्षांचा तुरुंगवास,तसंच पाच हजार ते 50 हडार रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
       या कायद्याविरोधात असणाऱ्या सनातनी शक्तिंनी जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी समाजात गैरसमज पसरवलेत.काही राजकारण्यांनीही वस्तुस्थिती समजून न घेता आपलं राजकारण चालवलं.या सगळ्यातून प्रबोधनाऎवजी अज्ञानाचा गोंधळच उडाला.यामुळेच आता हा कायदा सर्वसामान्यांना समजावून सांगणं,वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं,प्रबोधन करणं आवश्यक आहे.या कायद्यात एकूण 12 कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
      आपण 12 कलमं समजून घेऊः-
कलम 1.भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तिला दोराने किंवा साखळीने बांधून मारहाण                                                                           करणं,मिरचीची धुरी देणं,तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणं,त्या व्यक्तिला उघड्यावर    लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणं,त्याचा विविध प्रकारे छळ करणं,मूत्रविष्ठा खायला लावणं अशी कृत्य गुन्हा ठरतील.   
कलम 2.एखाद्या व्यक्तिने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणं आणि अशा तथाकथित चमात्कारांचा प्रसार व प्रचार करून लोकांना फसवणं,ठकवणं,त्यांच्यावर दहशत बसवणं त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणं गुन्हा ठरेल.
कलम 3.अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतुने,ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात,अशा अमानुष,अनिष्ट,अघोरी प्रथांचा अवलंब करणं आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणं,उत्तेजन देणं किंवा सक्ती करणं हा गुन्हा आहे.   
कलम 4.मौल्यवान वस्तु,गुप्तधन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने,जारणमारण,करणी,भानामती या नावाने अमानुष,अनिष्ट आणि अघोरी कृत्य आणि जादूटोणा करमं आणि यांच्या नावाने नरबळी देणं किंवा देण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणं हा गुन्हा.     
कलम 5.आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती अथवा एखाद्या व्यक्तित अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भिती निर्माण करणं आणि त्या व्यक्तिचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणं,फसवणं,ठकवमं हा गुन्हा असेल.केवळ अंगात येणं हा गुन्हा नाही.
कलम 6.एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते,जादूटोणा करते,भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते असं सांगुन त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणं,अपशकुनी अहे,सैतान आहे असं जाहीर करणं.अशा व्यक्तीचे जगणं मुश्किल करणं,त्रासदायक करणं हा गुन्हा.   
कलम 7.जारणमारण,करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली व्यक्तिला मारहाण करणं,नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारावर बंदी घालणं हा गुन्हा.   
कलम  8.मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करेन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणं,एखाद्या व्यक्तीला शरीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणं,घबराट निर्माण करणं,मृत्युची भिती घालणं हा गुन्हा.   
कलम 9.कुत्रा,साप आणि विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी तिला अमानुष,अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणं किंवा मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणं हा गुन्हा.   
कलम 10.बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणं किंवा गर्भवती महिलांच्या गर्भाचं लिंग बदलून दाखवतो असा दावा करणं हा गुन्हा.   
कलम 11.स्वतःला अलौकिक शक्ती असल्याचं वा आपण अवतार असल्याचं भासवून नादी लागलेल्या व्यक्तीस तू माझी गेल्या जन्मीची पत्नी,प्रेयसी वा प्रियकर होता असं सांगून लैंगिक संबंध ठेवणं.तसंच मुल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तिद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा.       
कलम 12.एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचं भासवणं,त्याद्वारे त्या व्यक्तिचा वापर धंदा,व्यवसायासाठी करणं हा गुन्हा.
      मंबई मराठी पत्रकार संघात आमचे लेक्चर घेण्यासाठी आलेले पुरूषोत्तम आवरे पाटील सरांनी आम्हाला या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली आणि समजावून सांगितले.
      या कायद्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळावर जा.
                 www.abans.com


Sunday, 19 January 2014

अधिकार माहीतीचा...

अधिकार माहीतीचा...

    आपला देश सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. आपले लोकप्रतिनीधी असलेले नगरसेवक, आमदार, खासदार, ते पंतप्रधान, राष्ट्रपती ही मंडळी आपल प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आपल्याला दिला गेला आहे. माहीतीचा अधिकार कलम 205 अन्वये आपण संबधित अधिकार्याकडुन माहीती मागवू शकतो. ज्याबद्दल आपल्याला खुप कमी व अर्धवट माहीती असते. माहीतीच्या अधिकाराची ही यंत्रणा आपण संमजावुन घेतली तर अनेक सरकारी कामांची आपण माहीती मिळवु शकतो. यासंबधी सविस्तर माहीती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनिल गलगली सरांचा लेक्चर आयोजला होता.

     माहीतीच्या अधीकराचा उपयोग करुन अनिल गलगली सरांनी आदर्श घोटाळ्याचे धागेदोरे बाहेर काढले होते. सरकारी यंत्रणेतील अनेक घोटाळे-कारस्थान अनिल सरांनी बाहेर काढून प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवली आहेत. सरांचे बरेच किस्से ऐकण्या-शिकण्यासारखे होते. प्रत्येकाने किमान दोन आर.टी.आय मागवुन याला सुरुवात करावी एसा सल्लाही आम्हाला दिला.

    थोड्या दिवसांनीच सामना ऑफीसजवळ सरांची भेट घेउन एक आर.टी.आय मागवला..त्याच उत्तर येईल तेव्हा खर..पण पत्रकार म्हणुन आपल्याला अशा गोष्टींची सवय स्वतःला केली पाहीजे, असे सरांच मत होत.अनेकजण माहीतीच्या अधिकाराचा उपयोग स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी करीत असतात. अशा मंडळींना धोक्याची जास्त भिती असते. कोणताही वैयक्तीक फायदा न पाहता लोकहीतासाठी माहीतीच्या अधिकाराचा उपयोग केला तर घाबरण्याची काळजी नाही, असेही ते म्हणाले.


                                                      -प्रवीण दाभोळकर

शेवटच्या पानाची खंत...

शेवटच्या पानाची खंत...    
जनरली आपण जे मराठी बोलतो त्यात किती चुका करत असतो हे आपल आपल्याला ही कळत नसत. तरीही ते गोळा केलेल मराठी आपण अभिमानाने एखाद्यच्या माथी मारतो. अभिमानाने मी मराठीचा टेंबा मिरवत असतो. दरवर्षी शाळेच्या पाठ्यपुस्ताकतल शेवटचं शुद्धलेखनाच पान आम्ही पलटुन कधी बघितलच नव्हत. ते जर पाहील असत तर आज आमच्या शुद्धलेखनाच्या चुकाच कोणी काढल्या नसत्या. तेव्हा शिक्षकांनीही कधी आमच्या लक्षात आणल नाही आणि शिक्षण मंडळांनेही कधी आग्रह धरला नाही. आयुष्याची पान कशी भराभर पलटत गेली पण त्या न पलटलेल्या पानाची किंमत आजही आम्हाला मोजावी लागत आहे. आपल्या मायबोली मराठीत आपण किती लेखनाच्या शुद्ध चुका करु शकतो हे आज कळायला लागल.
    मराठी शुद्दधलेखन समजवणार्या दिपक रंगारी सरांच लेक्चर माझ्यासहीत सर्वांच्या चांगलच लक्षात राहील एवढ मात्र नक्की. आपण नेहमी लिहीत असलेल मराठी किती अशुद्ध असु शकत हे नव्याने शिकायला मिळाल. सुरुवात स्वतःच्या नावांपासुनच झाली. आपल्या नावातच र्हस्व-दिर्घाच्या एवढ्या चुका केलेल्या असतात त्या जर आपल्याला कळाल्या तर आपल नाव सांगतानाही कींचीतशी लाज वाटावी. माझ नाव सरांनी विचारल्यावर प्रविण अस मोठ्याने स्पष्ट सांगितल. ते लिहीताना प्रवीण अस लिहाव अस सरांनी सांगीतल. मग पाठोपाठ श्रुतिका, प्रीती, रवीकीरण यांचे जन्म दाखलेही बदलावे लागणार हे त्यांना पटु लागल. बाकीच्यांना तर नंतर स्वतःच नाव सांगायचीच भिती वाटु लागली. माझ्या बारश्याला रंगारी सरांसारखा एखादा व्यक्ती आला असता तर पुढे माझ्या जन्म आणि शाळेच्या दाखल्यात ही चुक झाली नसती बहुदा..असो माझ्यापुढच्या पिढीसाठी हे लक्षात राहील याचा व्यवस्था केलीय.
    आतापर्यंत व्याकरणाची पुस्तक व शुद्धलेखनाची पान नीट वाचली असता तर आज शिकण्यासारख अस काही नव्हत. आपल शुद्धलेखन सुधारत असताना या क्षेत्रात काम करताना बर्याचदा बॉस इस ऑल्वेज राईट हे सुद्धा लक्षात असु द्या असा गोड सल्लाही सरांनी लेक्चर संपताना दिला.

                                                                       -प्रवीण दाभोळकर

Friday, 10 January 2014

राजकारणावर बोलू काही....

नावासाठी राहिल आहे हे
             आज राजकारण.....
             खरतर आहे हे
             समाजाला जडलेलं गजकरण.....
      राजकारण.....विचार करत असाल ना!आज अचानक मी राजकारणावर का बरं बोलतेय?,चारोळी लिहितेय?,वगैरे वगैरे...
      अहो!कालच आमचे राजकारणावर लेक्चर झाले.मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये काल दिनांक 9 जाने.-14 ला आमचे राजकीय पत्रकारितेवर लेक्चर घेण्यात आले.शशिकांत सांडभोर लेक्चर घेण्यास आले होते.आधी बघून वाटले की, आज क्लास मध्ये खूप कंटाळा येणार कारण सर खूप गंभीर चेहऱ्याचे वाटत होते आणि त्यात विषयही तसा किचकट होता,न आवडणारा....
      सरांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली आणि आमचीदेखील करून घेतली.लेक्चर ला सुरूवात झाली.वेगवेगळी उदाहरणे देऊन राजकीय पत्रकारीता कशी करायची हे शिकवले.कशा प्रकारे बातम्या मिळवायच्या,लोकांसमोर कशा आणायच्या,कोणती पुस्तके वाचायची,कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे हे सर्व उत्तम प्रकारे सांगितले.
                खूप छान वाटले आणि खूप मजा आली.
राजकीय पत्रकारिता करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी-
1.       शहराचा राजकीय अभ्यास करावा.
2.       शहराचा अभ्यास करावा.
3.       राजकीय पक्षांची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास.
4.       देशाच्या घचनेचा अभ्यास.
5.       देशाच्या मानसशास्त्राचा अभ्यास.
6.       अंतर्गत राजकारणाची माहिती.
7.       महाराष्ट्राचा अभ्यास.
8.       राजकीय नेत्यांचे आत्मचरित्र वाचा.



Sunday, 5 January 2014

हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???

हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???

हेरीटेज म्हणजे नक्की काय रे भाऊ ???...या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही व्याख्यानमालेत पोहोचलो. हेरीटेज म्हणजे नक्की काय भानगड हे समजुन घेण्यासाठी आम्ही खास आमंत्रीत होतो, त्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष आभार..दिनांक 27 डिसेंबर..निमित्त होत आप्पा पेंडसे स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे...विषय होता हेरीटेज काय व कसे..आणि आमंत्रित व्याख्याते होते दादर विभागाचे मनसेचे आमदार नितीन सरदेसाई आणि हेरीटेज पुर्नलोकन समिती अधिकारी दिनेश अफजलपुरकर. 

  एखाद्या वास्तुवर हेरीटेज लागु केले तर त्या वास्तुवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे तिथल्या विकासकामाला अडथळा येत असतो. मुंबईच्या तिनही बाजुने समुद्र आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असलेल्या मुंबईच्या जमिनीची भाग वाढणे केवळ अशक्य हे आपण समजुन घेतले पाहीजे. त्यामुळे राहत्या जागेची वर्टीकल वाढ करणे किंवा त्यात विकासकाम करणे एवढाच पर्याय मुंबईच्या नागरीकांकडे आहे. सध्या दादरकरांनी याच समस्येला वाचा फोडली आहे. वास्तुचे पुरातनत्व टिकुन रहावे यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. ज्यात काही बदल केले तर नागरीकांसाठीही सुसह्य ठरु शकते.
  हेरीटेजमुळे पुर्नविकासाला अडथळा आल्यानेच दादर सारख्या विभागाची जनता रस्त्यावर उतरत आहे. असे नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. तर भाडे नियंत्रण कायद्यातुन हेरीटेज वास्तु धारकांना सुट देणे, उरलेली ठराविक जागा एफ.एस.आय हा टि.डी.आर कायद्यानुसार विकण्याची परवानगी देणे, तसेच वास्तुधारकांना करामध्ये सवलत देणे अशा बदलामुळे कायद्यात शिथीलता येईल असे मत अफजलपुरकर यांनी व्यक्त केले.


                                                                  -प्रविण दाभोळकर

Saturday, 4 January 2014

लाख रुपयाची वेबसाइट


लाख रुपयाची वेबसाइट

        प्रत्येक शनिवारच्या लेक्चरला आपण वेब जर्नलिस्टचे विद्यार्थी वेबसाईट, ब्लॉग असे अनेक प्रकार शिकत असतो. खुप कठीण पद्धती कोणी आपल्याला सोप्या करुन शिकवल तर कोणी वेबसाईटच्या माध्यमातुन लाखभर रुपये कमवायला शिकवल. पण वेबसाईट अजुन किती सोप्या रीतीने बनवता व डेव्हलप करता येऊ शकते ते आज शिकायला मिळाल..
       4 जानेवारी शनिवारचा लेक्चर सुनिल घुमे सरांचा होता. ज्यामध्ये वेबसाईट बनवायची सर्वात सोपी पद्धत सरांनी शिकवली. www.webs.com या अधिकृत साईट वरुन आपण मोफत वेबसाईट बनवु शकतो. आतापर्यंत आपण वेबसाईट बनविण्याच्या ज्या अनेक पद्धती शिकलो त्यापैकी सर्वात सहज-सोपी पद्धत सुनिल घुमे सरांनी शिकवली. ज्याप्रमाणे आपण ब्लॉग बनवायला शिकलो तीच सोपी पद्धत इथे अवलंबता येते.
      ड्रीमव्हीवर सॉफ्टवेअर असेल तरच वेबसाईट चालु करता येते असा आपला समज झाला होता किंवा करुन देण्यात आला होता. जे ड्रीमव्हीवर आपल्या ड्रीमपुरतच (स्वप्नातच) मर्यादित राहील. आय मिन कोणाकडेच डाऊनलोड झाल नाही. ज्याची पुर्ण माहीती मिळवण्यासाठी आम्ही काही विद्यार्थी मिळुन प्रायवेट ट्युशन्सला जाणार होतो..आमचे पैसे वाचविल्याबद्दल सुनिल सरांचे आभार...वर्डप्रेसवर वेबसाईट बनवणे कीचकट आहे अस या लेक्चर नंतर वाटायला लागल.आजच्या लेक्चरला फक्त 10 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ज्यापैकी 3 विद्यार्थ्यांना इनस्क्रीप्ट मराठी टायपींग न आल्याने पुन्हा घरची वाट धरावी लागली.  

                                                                     -प्रविण दाभोळकर