हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???
हेरीटेज म्हणजे नक्की काय रे भाऊ ???...या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही व्याख्यानमालेत पोहोचलो. हेरीटेज म्हणजे नक्की काय भानगड हे समजुन घेण्यासाठी आम्ही खास आमंत्रीत होतो, त्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष आभार..दिनांक 27 डिसेंबर..निमित्त होत आप्पा पेंडसे स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे...विषय होता हेरीटेज काय व कसे..आणि आमंत्रित व्याख्याते होते दादर विभागाचे मनसेचे आमदार नितीन सरदेसाई आणि हेरीटेज पुर्नलोकन समिती अधिकारी दिनेश अफजलपुरकर.
एखाद्या वास्तुवर हेरीटेज लागु केले तर त्या
वास्तुवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे तिथल्या विकासकामाला
अडथळा येत असतो. मुंबईच्या तिनही बाजुने समुद्र आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत
असलेल्या मुंबईच्या जमिनीची भाग वाढणे केवळ अशक्य हे आपण समजुन घेतले पाहीजे.
त्यामुळे राहत्या जागेची वर्टीकल वाढ करणे किंवा त्यात विकासकाम करणे एवढाच पर्याय
मुंबईच्या नागरीकांकडे आहे. सध्या दादरकरांनी याच समस्येला वाचा फोडली आहे.
वास्तुचे पुरातनत्व टिकुन रहावे यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. ज्यात
काही बदल केले तर नागरीकांसाठीही सुसह्य ठरु शकते.
हेरीटेजमुळे पुर्नविकासाला
अडथळा आल्यानेच दादर सारख्या विभागाची जनता रस्त्यावर उतरत आहे. असे नितीन सरदेसाई
यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. तर भाडे नियंत्रण कायद्यातुन हेरीटेज वास्तु
धारकांना सुट देणे, उरलेली ठराविक जागा एफ.एस.आय हा टि.डी.आर कायद्यानुसार
विकण्याची परवानगी देणे, तसेच वास्तुधारकांना करामध्ये सवलत देणे अशा बदलामुळे
कायद्यात शिथीलता येईल असे मत अफजलपुरकर यांनी व्यक्त केले.
-प्रविण दाभोळकर
No comments:
Post a Comment