नावासाठी राहिल आहे हे
आज राजकारण.....
खरतर आहे हे
समाजाला जडलेलं गजकरण.....
राजकारण.....विचार करत असाल ना!आज अचानक मी राजकारणावर का बरं बोलतेय?,चारोळी लिहितेय?,वगैरे वगैरे...
अहो!कालच आमचे राजकारणावर लेक्चर झाले.मुंबई मराठी पत्रकार
संघामध्ये काल दिनांक 9 जाने.-14 ला आमचे राजकीय पत्रकारितेवर लेक्चर घेण्यात
आले.शशिकांत सांडभोर लेक्चर घेण्यास आले होते.आधी बघून वाटले की, आज क्लास मध्ये खूप
कंटाळा येणार कारण सर खूप गंभीर चेहऱ्याचे वाटत होते आणि त्यात विषयही तसा किचकट
होता,न आवडणारा....
सरांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली आणि आमचीदेखील करून
घेतली.लेक्चर ला सुरूवात झाली.वेगवेगळी उदाहरणे देऊन राजकीय पत्रकारीता कशी करायची
हे शिकवले.कशा प्रकारे बातम्या मिळवायच्या,लोकांसमोर कशा आणायच्या,कोणती पुस्तके
वाचायची,कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे हे सर्व उत्तम प्रकारे सांगितले.
खूप छान वाटले आणि खूप मजा आली.
राजकीय पत्रकारिता करताना लक्षात
ठेवायच्या गोष्टी-
1.
शहराचा राजकीय अभ्यास
करावा.
2.
शहराचा अभ्यास करावा.
3.
राजकीय पक्षांची निर्मिती
कशी झाली याचा अभ्यास.
4.
देशाच्या घचनेचा अभ्यास.
5.
देशाच्या मानसशास्त्राचा
अभ्यास.
6.
अंतर्गत राजकारणाची माहिती.
7.
महाराष्ट्राचा अभ्यास.
8.
राजकीय नेत्यांचे आत्मचरित्र
वाचा.
No comments:
Post a Comment