शेवटच्या पानाची खंत...
जनरली आपण जे मराठी बोलतो त्यात किती चुका करत असतो हे आपल
आपल्याला ही कळत नसत. तरीही ते गोळा केलेल मराठी आपण अभिमानाने एखाद्यच्या माथी
मारतो. अभिमानाने मी मराठीचा टेंबा मिरवत असतो. दरवर्षी शाळेच्या पाठ्यपुस्ताकतल
शेवटचं शुद्धलेखनाच पान आम्ही पलटुन कधी बघितलच नव्हत. ते जर पाहील असत तर आज
आमच्या शुद्धलेखनाच्या चुकाच कोणी काढल्या नसत्या. तेव्हा शिक्षकांनीही कधी आमच्या
लक्षात आणल नाही आणि शिक्षण मंडळांनेही कधी आग्रह धरला नाही. आयुष्याची पान कशी
भराभर पलटत गेली पण त्या न पलटलेल्या पानाची किंमत आजही आम्हाला मोजावी लागत आहे. आपल्या
मायबोली मराठीत आपण किती लेखनाच्या शुद्ध चुका करु शकतो हे आज कळायला लागल.
मराठी शुद्दधलेखन समजवणार्या दिपक रंगारी
सरांच लेक्चर माझ्यासहीत सर्वांच्या चांगलच लक्षात राहील एवढ मात्र नक्की. आपण
नेहमी लिहीत असलेल मराठी किती अशुद्ध असु शकत हे नव्याने शिकायला मिळाल. सुरुवात
स्वतःच्या नावांपासुनच झाली. आपल्या नावातच र्हस्व-दिर्घाच्या एवढ्या चुका
केलेल्या असतात त्या जर आपल्याला कळाल्या तर आपल नाव सांगतानाही कींचीतशी लाज
वाटावी. माझ नाव सरांनी विचारल्यावर प्रविण अस मोठ्याने स्पष्ट सांगितल. ते
लिहीताना प्रवीण अस लिहाव अस सरांनी सांगीतल. मग पाठोपाठ श्रुतिका, प्रीती,
रवीकीरण यांचे जन्म दाखलेही बदलावे लागणार हे त्यांना पटु लागल. बाकीच्यांना तर
नंतर स्वतःच नाव सांगायचीच भिती वाटु लागली. माझ्या बारश्याला रंगारी सरांसारखा
एखादा व्यक्ती आला असता तर पुढे माझ्या जन्म आणि शाळेच्या दाखल्यात ही चुक झाली
नसती बहुदा..असो माझ्यापुढच्या पिढीसाठी हे लक्षात राहील याचा व्यवस्था केलीय.
आतापर्यंत व्याकरणाची पुस्तक व शुद्धलेखनाची
पान नीट वाचली असता तर आज शिकण्यासारख अस काही नव्हत. आपल शुद्धलेखन सुधारत असताना
या क्षेत्रात काम करताना बर्याचदा बॉस इस ऑल्वेज राईट हे सुद्धा लक्षात असु द्या
असा गोड सल्लाही सरांनी लेक्चर संपताना दिला.
-प्रवीण दाभोळकर
No comments:
Post a Comment