Friday, 10 January 2014

राजकारणावर बोलू काही....

नावासाठी राहिल आहे हे
             आज राजकारण.....
             खरतर आहे हे
             समाजाला जडलेलं गजकरण.....
      राजकारण.....विचार करत असाल ना!आज अचानक मी राजकारणावर का बरं बोलतेय?,चारोळी लिहितेय?,वगैरे वगैरे...
      अहो!कालच आमचे राजकारणावर लेक्चर झाले.मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये काल दिनांक 9 जाने.-14 ला आमचे राजकीय पत्रकारितेवर लेक्चर घेण्यात आले.शशिकांत सांडभोर लेक्चर घेण्यास आले होते.आधी बघून वाटले की, आज क्लास मध्ये खूप कंटाळा येणार कारण सर खूप गंभीर चेहऱ्याचे वाटत होते आणि त्यात विषयही तसा किचकट होता,न आवडणारा....
      सरांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली आणि आमचीदेखील करून घेतली.लेक्चर ला सुरूवात झाली.वेगवेगळी उदाहरणे देऊन राजकीय पत्रकारीता कशी करायची हे शिकवले.कशा प्रकारे बातम्या मिळवायच्या,लोकांसमोर कशा आणायच्या,कोणती पुस्तके वाचायची,कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे हे सर्व उत्तम प्रकारे सांगितले.
                खूप छान वाटले आणि खूप मजा आली.
राजकीय पत्रकारिता करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी-
1.       शहराचा राजकीय अभ्यास करावा.
2.       शहराचा अभ्यास करावा.
3.       राजकीय पक्षांची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास.
4.       देशाच्या घचनेचा अभ्यास.
5.       देशाच्या मानसशास्त्राचा अभ्यास.
6.       अंतर्गत राजकारणाची माहिती.
7.       महाराष्ट्राचा अभ्यास.
8.       राजकीय नेत्यांचे आत्मचरित्र वाचा.



Sunday, 5 January 2014

हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???

हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???

हेरीटेज म्हणजे नक्की काय रे भाऊ ???...या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही व्याख्यानमालेत पोहोचलो. हेरीटेज म्हणजे नक्की काय भानगड हे समजुन घेण्यासाठी आम्ही खास आमंत्रीत होतो, त्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष आभार..दिनांक 27 डिसेंबर..निमित्त होत आप्पा पेंडसे स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे...विषय होता हेरीटेज काय व कसे..आणि आमंत्रित व्याख्याते होते दादर विभागाचे मनसेचे आमदार नितीन सरदेसाई आणि हेरीटेज पुर्नलोकन समिती अधिकारी दिनेश अफजलपुरकर. 

  एखाद्या वास्तुवर हेरीटेज लागु केले तर त्या वास्तुवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे तिथल्या विकासकामाला अडथळा येत असतो. मुंबईच्या तिनही बाजुने समुद्र आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असलेल्या मुंबईच्या जमिनीची भाग वाढणे केवळ अशक्य हे आपण समजुन घेतले पाहीजे. त्यामुळे राहत्या जागेची वर्टीकल वाढ करणे किंवा त्यात विकासकाम करणे एवढाच पर्याय मुंबईच्या नागरीकांकडे आहे. सध्या दादरकरांनी याच समस्येला वाचा फोडली आहे. वास्तुचे पुरातनत्व टिकुन रहावे यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. ज्यात काही बदल केले तर नागरीकांसाठीही सुसह्य ठरु शकते.
  हेरीटेजमुळे पुर्नविकासाला अडथळा आल्यानेच दादर सारख्या विभागाची जनता रस्त्यावर उतरत आहे. असे नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. तर भाडे नियंत्रण कायद्यातुन हेरीटेज वास्तु धारकांना सुट देणे, उरलेली ठराविक जागा एफ.एस.आय हा टि.डी.आर कायद्यानुसार विकण्याची परवानगी देणे, तसेच वास्तुधारकांना करामध्ये सवलत देणे अशा बदलामुळे कायद्यात शिथीलता येईल असे मत अफजलपुरकर यांनी व्यक्त केले.


                                                                  -प्रविण दाभोळकर

Saturday, 4 January 2014

लाख रुपयाची वेबसाइट


लाख रुपयाची वेबसाइट

        प्रत्येक शनिवारच्या लेक्चरला आपण वेब जर्नलिस्टचे विद्यार्थी वेबसाईट, ब्लॉग असे अनेक प्रकार शिकत असतो. खुप कठीण पद्धती कोणी आपल्याला सोप्या करुन शिकवल तर कोणी वेबसाईटच्या माध्यमातुन लाखभर रुपये कमवायला शिकवल. पण वेबसाईट अजुन किती सोप्या रीतीने बनवता व डेव्हलप करता येऊ शकते ते आज शिकायला मिळाल..
       4 जानेवारी शनिवारचा लेक्चर सुनिल घुमे सरांचा होता. ज्यामध्ये वेबसाईट बनवायची सर्वात सोपी पद्धत सरांनी शिकवली. www.webs.com या अधिकृत साईट वरुन आपण मोफत वेबसाईट बनवु शकतो. आतापर्यंत आपण वेबसाईट बनविण्याच्या ज्या अनेक पद्धती शिकलो त्यापैकी सर्वात सहज-सोपी पद्धत सुनिल घुमे सरांनी शिकवली. ज्याप्रमाणे आपण ब्लॉग बनवायला शिकलो तीच सोपी पद्धत इथे अवलंबता येते.
      ड्रीमव्हीवर सॉफ्टवेअर असेल तरच वेबसाईट चालु करता येते असा आपला समज झाला होता किंवा करुन देण्यात आला होता. जे ड्रीमव्हीवर आपल्या ड्रीमपुरतच (स्वप्नातच) मर्यादित राहील. आय मिन कोणाकडेच डाऊनलोड झाल नाही. ज्याची पुर्ण माहीती मिळवण्यासाठी आम्ही काही विद्यार्थी मिळुन प्रायवेट ट्युशन्सला जाणार होतो..आमचे पैसे वाचविल्याबद्दल सुनिल सरांचे आभार...वर्डप्रेसवर वेबसाईट बनवणे कीचकट आहे अस या लेक्चर नंतर वाटायला लागल.आजच्या लेक्चरला फक्त 10 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ज्यापैकी 3 विद्यार्थ्यांना इनस्क्रीप्ट मराठी टायपींग न आल्याने पुन्हा घरची वाट धरावी लागली.  

                                                                     -प्रविण दाभोळकर

Saturday, 28 December 2013

हेरिटेज: काय व कसे?

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही 27 डिसेंबर 2013 ला दिवंगत आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांच्या समस्येवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.यंदाचा हा परिसंवाद “हेरिटेज: काय व कसे?” यावर आधारित होता.या परिसंवादास मुंबई महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्री.दिनेश अफझलपूरकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास मटाले व आप्पा पेंडसे यांच्या कन्या वसुंधरा पेंडसे उपस्थित होते.
     महाराष्ट्राच्या पूनर्विलोकन समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र व मुंबईचा पूर्णतः अभ्यास असणारे श्री.दिनेश अफझलपूरकर यांच्या म्हणण्यानुसार, “पाश्चिमात्य देशात पुरातन वास्तू जतन करण्यासाठी जी चळवळ होत होती,ताथील विचार आचरणात आणून महाराष्ट्रात असा कायदा 1991 मध्ये अंमलात आणला गेला(विकास नियंत्रण नियमावली कायदा क्र.67-हेरिटेज रेग्युलेशन कायदा).”अफझलपूरकरांनी हेरिटेज वास्तूंअंतर्गत येणाऱ्या श्रेणी व त्यांची यादी प्रस्तुत केली.मुंबईतील काही भागांवर सुनावणी चालू असल्याने फार काही माहिती देणे त्यांना शक्य झाले नाही.
     यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी CRZ भागातील कोळी लोकांचे प्रश्न,चाळीत राहणाऱ्या लोकांच्या समस्या असा एकंदरीत वस्तुस्थितीचा चेहरामोहरा समोर आणला. “फूटपाथवर झोपडी बांधून राहणाऱ्या लोकांना कालांतराने घर मिळते,तर आधीपासून वास्तव्यास असलेल्या लोकांच्या समस्यांचे काय?”अशा प्रकारच्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या.यावर “या सर्व समस्यांस खूप गोष्टी कारणीभूत आहेत,त्यातील एक म्हणजे 1945-1947 यादरम्यान आलेला भाडे नियंत्रण कायदा कारणीभूत 

Friday, 29 November 2013

गरुडझेप

       
 दिनांक 20 नोव्हें.-13 रोजी,मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार श्री.सुकृत खांडेकर यांची एकसष्ठी साजरी झाली.आणि त्याचबरोबर त्यांच्या गरुडझेप या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
       सत्कारमूर्ती सुकृत खांडेकर हे गेली 40 वर्षे पत्रकारितेत वावरत आहेत.ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक माणसे जवळ केली.मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह आहे.अंदाजे 33 निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून त्यांनी काम केले आहे.तटस्थ,निर्भीड पत्रकार म्हणून आज ते नावाजले जातात.

       असे हे विविध कंगोरे असलेले सुकृत खांडेकर,यांचा सत्कार सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला.तसेच,पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा मुख्यमंत्रींच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील विविध स्तरावरील लोकांनी उपस्थिती लावली होती.आमदार बाळा नांदगांवकर,महापौर सुनील प्रभू,विरोधी पक्ष नेते विनोद तावडे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काही वरिष्ठ पत्रकार,घरची मंडळी आणि जीवलग मित्रांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
 

Saturday, 26 October 2013

17 वा स्मृतिदिन सोहळा

       
  दिनांक 20 ऑक्टोबर,2013 या दिवशी वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांचा 17 वा स्मृतिदिन होता. रविवार च्या संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वास्तूत त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती.शैक्षणिक क्षेत्रातील,राजकारणात रस असणारे,वृत्तपत्रात हिरीरीने काम केलेले वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
        वरिष्ठ पत्रकार दि.वी.गोखले यांच्या 17 व्या स्मृतिदिनी प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक हे त्यांच्या शिष्या व पहिल्या महिला पत्रकार निला उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली संपादित झाले.मुंबई मराठी पत्रकार संघ आणि नवचैतन्य प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने “पत्रकार दि.वी.गोखले:व्यक्तित्व आणि कर्तुत्व” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
        प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.विनय सहस्त्रबुद्धे,डॉ.विजय कुवळेकर आणि डॉ. विनय हर्डीकर यांनी गोखलेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.गोखलेंचे जवळचे मित्र श्री.जयंत जोगळेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
        हे पुस्तक गोखलेंच्या कर्तुत्व,कामगिरी,व्यक्तिमत्व आणि पुण्याईची साक्ष देते.या पुस्तकात निरनिराळ्या विचारवंतांचे,लेखकांचे गोखलेंविषयीचे मत आणि विचार दिसतील. गोखलेंविषयी त्यांच्या सहकार्यांचे व मित्रांचे मत:-गोखले हे द्रष्टा पत्रकार,युद्धश्स्त्राचे अभ्यासक,संघ प्रचारक,कठोर,स्पष्ट वक्ते,सावरकरवादी,मार्गदर्शक,उदारमतवादी आणि पारखी होते.त्यांच्याकडे अफाट लोकसंग्रह होता.युद्धाविषयक पत्रकारितेची पायाभरणी गोखलेंनी केली होती.


        असे हे अष्टपैलू असणाऱ्या गोखलेंचा स्मृतिदिनी रविवारच्या भारावलेल्या संध्याकाळी त्यांच्या आठवणींमध्ये पार पडला.

Wednesday, 23 October 2013

ई-पेपर
   
आज दिनांक 12/10/2013,शनिवारचा दिवस.मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आमचे वेब चे लेक्चर होते.जयकृष्ण नायर हे आजचे आमचे लेक्चरर होते.त्यांची ओळख अशी की,ते प्रहारच्या ई-वृत्तपत्राचे चीफ आहेत.आजचे लेक्चर हे वृत्तपत्राचे ऑनलाईन एडिशन आणि ई-पेपर यांतील फरक काय?,यावर होते.
              आज लेक्चर थोडे उशिरा म्हणजे 6.20 ला चालू झाले.विद्यार्थ्यांची उपस्थिती काही कारणास्तव कमी होती,परंतु सर त्यांचे 100% द्यायला कुठेच कमी पडले नाहीत.6.20 ला सर आल्यावर सरांनी 10 मिनीटे साईटस् ओपन करण्यासाठी दिले,कारण त्यांना आम्हांला प्रक्टीकली दाखवायचं होतं.त्यानंतर जे त्यांनी शिकवायला सुरुवात केली,तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत कोणीच कंटाळलं नाही.
              सरांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करुन आणले होते.त्यावरुन त्यांनी एक-एक गोष्ट अगदी विस्तारुन सांगितली.ई-पेपर म्हणजे काय ,त्याचे प्रकार कोणते ,24x7 ऑनलाईन वेबसाईटस् असताना ई-पेपरची गरज काय ,वगैरे वगैरे....फक्त दिलेल्या विषयातच अडकून न राहता,त्यांनी इतर गोष्टींचे देखील व्यवस्थित ज्ञान दिले.जसे की,इंटरनेटचा इतिहास,त्याची पार्श्वभूमी,वृत्तपत्रांचा इतिहास,माध्यमांबद्दल माहिती आणि उत्तम प्रकारचे ई-पेपरचे उदाहरण देखील दिले.
              इंटरनेटवरील वृत्तपत्र दाखवून त्यांनी आमच्यामधे इंटरनेटवर वृत्तपत्र वाचण्याची आवड निर्माण केली.
              काही उत्तम ई-पेपर:-
1.     Times of India
2.     HT (news podcast)
3.     The Hindu
4.     Sakaal
5.     Lokmat
6.     Prahar
7.     Loksatta
     काही वेबसाईटस्:-
1.     epaper.mailtoday.in
2.     www.mid-day.com
3.     paper.hindustantimes.com
4.     epaper.loksatta.com
5.     epaper.prahar.in
for magazines:-
1.     imcl.in (business magazine)
2.     lokprabha.loksatta.com
3.     uniquefeatures.in/anubhav
4.     www.mediummagazin.de (German Magazine)
इथे जगभरातील 800 हून अधिक वृत्तपत्रे मिळतील:-
1.     www.newseum.org
2.     www.epapergallary.com