Friday, 1 May 2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ हा दिवस उजाडला आणी
भारतात एक नव्या पर्वास सुरुवात झाली. या दिवशी एका महान व्यक्तिचा जन्म
झाला. जो केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही तर विश्वविख्यात झाला.
त्यांचे नाव होते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपणा सर्वांचे लाडके
बाबासाहेब आंबेडकर. न भुतो न भविष्यती ह्या वाक्यातुन आपण या माणसाच्या
महानतेचा अंदाजा लावू शकतो. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणुनही बाबासाहेब
ओळखले जातात.
शालेय जिवनात पाणी पाजणारा चपराशी देखील त्यांना पाणी पाजत नसे. पण
स्वाभिमानी बाबासाहेबांनी कधी लाचारी पत्करली नाही. ते तसेच दिवसभर पाणी न
पिता रहात असत. ईतर मुलांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार मिळवण्यासाठी ते
प्रयत्न करत असत.
जागतिक बॅंक
आपण नेहमी ऐकतो कि भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सरासरी अमुक
अमुक , एवढे एवढे कर्ज आहे म्हणुन. त्यावेळी मनात विचार येतो कि, आपण तर
कोणतेच कर्ज काढले नाही मग आपल्या डोक्यावर हे कोणते कर्ज. तर हे कर्ज आहे
जागतिक बॅंकेने आपल्या विकासासाठी आपल्याला दिलेले. विकास किती झाला हे तर
आपणा सर्वांना माहितच आहे काहि वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र कर्ज काही
अजुन उतरले नाही. असो आजचा विषय हा नाही आहे. आजचा विषय आहे जागतिक
बॅंकेची कर्ज देण्याची पध्दती. जागतिक बॅंकेचे कार्य कसे चालते याचा आपण
थोडक्यात आढावा घेउ.
रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणांमुळे नागरीकांची गैरसोय
कल्याण शहरांमध्ये दरवर्षी
रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. हे डांबरीकरण केल्यामुळे पावसाळ्यात
ठिकठिकाणी खड्डे पडून त्या खड्यात पावसाचे पाणी साचले जात होते. यांचा
परिणाम म्हणुन रस्त्यांचे सुध्दा नुकसान होते व या सर्वांचा परिणाम
पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साठुन ट्राफीकवर होतो. या सर्वांचा विचार करून
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मे महिन्याच्या अंतापर्यत कल्याण
शहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे हे महत्त्वाचे असले तरीही या
रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणासाठी सर्व ठिकाणी एकाचवेळी खोदकाम करून
रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.
Hotel Pushpraj
कल्याण शहरातीलच नव्हे तर कल्याण
तालुक्यातील स्वदिष्ट पावभाजी व राईसप्लेट साठी तिन पिढ्यातील
कल्याणकारांचे तसेच उपनगरीयांचे प्रसिध्द हॉटेल म्हणजे हॉटेल पुष्पराज.
श्रीमंत, मध्यमवर्गीय व गोरगरिबांच्या आवडिचे व खिशाला परवडणारे आणी कल्याण
स्टेशन पासुन अगदी जवळ बाजार पेठेतील हॉटेल पुष्पराज होय.
उन्हा, तान्हात भुक भागवण्याचे आणी विसावा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल पुष्पराज होय.
पारले जी.
गरिबांना तर उपयोगी पडतोच पण श्रीमंतानाही उपयोगी पडणारे एक बहुमुल्य असे एक बीस्किट ज्याची तीन पीढ्या पासुन आज पावेतो अजुनही किंमत वाढलेली नाही. अत्यंत अल्प दरात मिळतो. गरीबाला कुपोशीत भागाला भुकेला विसावा मिळेल व आजही दोन रुपयांचा बिस्किट पुडा मिळतो. ऊदर निर्वाहाचे साधन जरी नसले तरी भुक शमवणारा. गरीबाच्या भुक शमवणा-या व बीस्कीटाची किंमत न वाढविणा-या पारले जी ग्लुकोज कंपनीचे माझ्या कडुन व माझ्या कुटुंबाकडुन व गरीब व कुपोशीत भागातील जनते कडुन शतःशा आभार.
Subscribe to:
Posts (Atom)





