बालपणीचा काळ सुखाचा या वाक्यातील
सत्यता आता मोठं झाल्यावर समजू लागली आहे. खरोखरच किती छान दिवस असतात ते.
कोणत्याही टेंशन शिवाय स्वछंदी जिवन जगणे म्हणजे बालपण होय. म्हणुनच तर
प्रत्येकजण आपल्या आुयुष्यात पुन्हा
बालपण मागतो. ते मिळत नाही हि गोष्ट निराळी. बालपणातच उद्याचा तरुण घडत असतो. आजची मुलं उद्याचं भविष्य असतात. एका अर्थाने ते राष्ट्रीय संपत्तीच आहेत. म्हणुन या राष्ट्र संपत्तीला घडवायचे असेल तर त्यांच्यावर आज लक्ष देणे आवश्यक आहे. यात महत्वची भुमिका असते ती आईची. कारण काही अपवाद वगळता आई हिच मुलांसोबत जास्त वेळ असते. मुलांचे भवितव्य घडविणे आईच्याच हातात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आई ईतकीच वडिलांचीही भुमिका महत्वाची असते. त्यांनीही मुलांना आवष्यक तो वेळ दिला पाहिजे. मुलांना घडविण्यासाठी आई आणी वडिल यांनी जर मिळुन प्रयत्न केले तर देशासाठी उद्याचा एक सुजाण नागरीक घडविला जातो
त्यासाठी काही गोष्टिंकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना चांगले संस्कार व योग्य शिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांचे मन नाजुक, कोमल असते. त्यांच्यासाठी घरामध्ये योग्य वातावरण निर्मीती झाली पाहिजे. आपापसातील वाद व तंटे यापासून मुलांना दुर ठेवले पाहिजे किंबहूना त्यांच्यासमोर वाद न घातलेलाच बरा. या वादाचे वाईट परिणाम त्यांच्यावर दिसुन येउ शकतात. आज या धावपळीच्या काळात पालक आपापल्या कामात व्यस्त आसतात. पण त्यांनी त्यातुनही मुलांसाठी आवश्यक तो वेळ काढला पाहिजे. कारण पैसे कमावण्याच्या नादात उद्या आपली मुले बिघडली तर दोष कोणाला देणार. आपली मुले हिच आपली खरी संपत्ती आहे. मुलांना त्यांच्या बालपणी लागलेल्या सवय़ी त्यांच्या आयुष्यभर सोबत राहतात. म्हणुनच त्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. लहान मुले हि ओल्या मातीप्रमाणे असतात. कुंभार जसा ओल्या मातीला आकार देउन वेगवेगळी भांडी बनवतो तसेच आपल्याला या ओल्या मातीला म्हणजेच मुलांना योग्य वळण लावल्यास त्यांच्यातून जबाबदार व्यक्तीमत्व तयार होईल. यात कोणतीही शंका नाही. मुलांना मारहाण करणे चुकिचे आहे. प्रेमाची भाषा मुले लवकर समजतात. त्यांची कधीही दुस-यांशी तुलना करु नका. त्यांची शर्यत केवळ स्वतःशी आहे हे त्यांना पटवून द्या. अपयशाने खचुन न जाण्याईतपत त्यांच्या मनाची तयारी करा. अपयश हि यशाची पहिली पायरी आहे हे त्यांना समजवा. आणी मग बघा या लहान लहान गोष्टीतून शिकुन ते कसे मोठे होतात ते.

No comments:
Post a Comment