जाहिरात ही काळाची गरज
आहे, असे आपण म्हणु शकतो. दीवसातले सात ते आठ
तास सोडले तर इतर पुर्ण वेळ आपण जाहीरातींच्या दुनियेतच वावरत असतो. टि.व्ही चालु
केला तर कार्याक्रम आणि चित्रपट कमी, पण जाहीराती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात.
रस्त्यांने चालताना जाहीरातिंचे लहान-मोठे बॉनर तर हायवेला ड्रायविंग करत असताना
मोठ-मोठ्या जाहीरातींचे होडिंग्स आपल्याला पहायला मिळतात. आत्ता तर अगदी
जाहीरातींनी ट्रेनला सुद्धा जाहीरातींचे माध्याम केले आहे. ट्रेनच्या डब्ब्यांवर
सुद्धा वेगवेगळ्या जाहीराती पाहीला मिळतात. ट्रेन मधुन बाहेर डोकावावे, तर समोर
असलेल्या भिंतींवर सुद्धा जाहीराती रंगवलेल्या दिसतात.
हल्लीचे युग हे
स्पर्धात्मक युग आहे. आणि याच युगात जाहीरातींची देखिल मोठ्या प्रमाणावर स्पर्धा
चालु आहे. कोणी साधे दुकान जरी सुरु केले, तरी त्याची लहान-मोठी जीहीरात केली
जाते. एखादा मोबाईल, गाडी किंवा इतर काही लोंन्च झाले रे झाले कि लगेचच, म्हणजे
अगदी काही क्षणातच आपल्याला त्याची जाहीरात टि.व्ही वर आणि सोशिअल नेटवर्क च्या
वेगवेगळ्या साईडस वर पाहायला मिळते.
आजकाल सगळेच जग हे
जाहीरातीं सोबत चालताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात स्त्रीयांचे प्रमाण अधिक
आढळते. म्हणजेच अखाद्या साबणाची किंवा बिव्हटी क्रिम ची जीहीरात पाहीली की लगेचच
काही दिवसांनी त्या सगळ्या वस्तु त्यांच्या घरात आढळतात. त्याचबरोबर जर एखाद्या
अत्तर किंवा मोबाईलची जाहीरात पाहीली की पुरुष वर्गांच्याही मनात त्या वस्तुंना
खरेदी करण्याची ओढ लागुन राहते. जाहीरात ही लहान मुलांन पासुन मोठ्यां पर्यंत आणि
मोठ्यां पासुन वृद्धां पर्यंत अशा सगळ्यांनाच आकर्षित करत असते. एवढेच नव्हे तर
जाहीराती हे पैसे कमवण्याचे एक निराळेच साधन बनले आहे.
वृत्तपत्रांमध्ये बातम्यांपेक्षा
जास्त जाहीराती पाहायला मिळतात. असे का? तर जेवढ्या जाहीराती जास्त तेव्हडेच जास्त पैसे
त्या वृत्तपत्राला मिळतात. म्हणजेच वृत्तपत्रात जेवढ्या जास्त जाहीराती, तो वृत्तपत्र तेवढा श्रिमंत. फक्त जाहीरातीच असणारे वृत्तपत्र देखील
आपल्याला बाजारात पहायला मिळतात. त्यामध्येही कोणाची जीहीरात कीती मोठी यातही
स्पर्धा चालु असते. पुर्विच्या काळात फक्त आपल्याला रेडिओवरच जाहीरती एकायला मिळायच्या
पण आत्ता छापील आणि व्हीडीओ अशा दोन्ही प्रकारात जाहीराती पाहायला मिळतात.
या सगळ्यावरुन आपल्याला
कळलेच असेल कि हल्लीच्या युगात जारीरातींना किती महत्वाचे स्थान दिले जाते. पण याच
जाहीरातींच्या नावाखाली बराच काळाबाजार सुद्धा केला जातो. जाहीरातींच्या कंपन्या
लोकांच्या मनात त्यांच्या प्रोडक्टची अशी छाप उतरवतात की लोक कोणतीही वस्तु
हसत-हसत घेतांला दिसतात. जाहीरातींची पक्कड लोकांच्या मनात एवढी असते कि लोक
कसलाही विचार न करता जाहीरात बघुन वस्तु खरेदी करत असातात. एवढेच नाहीतर
जीहीरातींच्या कंपन्या ह्या त्यांच्या प्रोडक्टच्या दर्जा पेक्षा प्रोडक्टच्या
जाहीरातिंवर जास्त लक्ष घलुन जास्त खर्च करतात. आणि लोकांना आकर्षित करुन वस्तु
घेण्यास भाग पाडतात. यासाठी लोकांनीच या कडे निट लक्ष घालुन आपल्याला हवी असलेली
प्रत्येक वस्तु ही विचारपुर्वक घेणे अत्यंत आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment