स्त्री विरूद्ध
पुरूष हा संघर्ष उभा राहिला आहे, तो स्त्रीच्या मुक्तीसाठी. स्त्रीला केवळ “बाई” म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून, एक व्यक्ती
म्हणून समाजात जगता यावं, यासाठी. पण इतक्या वर्षाच्या संघर्षानंतरही आज परिस्थिती
काय आहे ? आजही आपल्या समाजात- स्त्रियांचा ‘स्त्री ते व्यक्ती’ हा प्रवास खूप खडतर आहे. त्यांच्या
स्वतंत्र इच्छा- आकांक्षाच्या पूर्तीसाठी त्यांना केवढी तरी मानहानी सहन करावी
लागते आहे. या मानहानीला, विविध आरोपांना, चारित्र्यहननाला सामोरं जात, ठामपणे उभं
राहण्यासाठी त्या धडपडताहेत. काही स्त्रिया
यासाठी लग्न नाकारून एकटीनं आयुष्य जगण्याचा निर्णयही घेताहेत. अशा स्त्रियांचा
अनुभव काय आहे? एकटीनं जगताना पुरूषप्रधान
व्यवस्थेच्या जाचातून त्यांची सुटका होते आहे का? त्या कितपत
मुक्त...स्वतंत्र होऊ शकतात? असा निर्णय घेऊन एकटीनं जगणा-या
स्त्रियांची धडपड, त्यांचं जगणं जाणून, समजून घेण्याची गरज आहे. आपण
लग्न करू नये, एकटं राहावं, असं एखाद्या बाईच्या मनात का येतं ? त्याहीपेक्षा पहिला प्रश्न म्हणजे
मुळात माणसाला लग्न का हवं असतं; तर तो सोबतीने जगणारा आहे,
कुटुंब करून राहण्यात आनंद मानणारा आहे. कुटुंबानं जगण्याला निमित्त मिळतं,
वंशवृध्दी होते आणि आयुष्य कुणाच्या तरी सोबतीनं जगता येतं. पण लग्नानंतर हे सगळं
असंच घडतं का?
No comments:
Post a Comment