Friday, 1 May 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल १८९१ हा दिवस उजाडला आणी भारतात एक नव्या पर्वास सुरुवात झाली. या दिवशी एका महान व्यक्तिचा जन्म झाला. जो केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही तर विश्वविख्यात झाला.
त्यांचे नाव होते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपणा सर्वांचे लाडके बाबासाहेब आंबेडकर. न भुतो न भविष्यती ह्या वाक्यातुन आपण या माणसाच्या महानतेचा अंदाजा लावू शकतो. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणुनही बाबासाहेब ओळखले जातात.
शालेय जिवनात पाणी पाजणारा चपराशी देखील त्यांना पाणी पाजत नसे. पण स्वाभिमानी बाबासाहेबांनी कधी लाचारी पत्करली नाही. ते तसेच दिवसभर पाणी न पिता रहात असत. ईतर मुलांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असत. शिक्षणाशिवाय हे शक्य नाही हे त्यांना समजून चुकले होते. भारतात शिक्षण पुर्ण करुन ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. शैक्षणीक काळात सर्व विपरीत परिस्थीतीवर मात करून ते परदेशातून वकिल होउन परत भारतात आले.  पण त्यानंतरही लोक त्यांचा तिरस्कार करत राहिले. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता तर विचार केला असता  कि, ईथे राहुन अपमानीत जिवन जगण्यापेक्षा परदेशात जाउन भरपूर पैसा कमाउया. पण बाबासाहेबांनी तसा विचार केला नाही. कारण त्यांचे आपल्या देशावर प्रेम होते. आपल्या बांधवांवर प्रेम होते. त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांना दुर करावयाचा होता. त्यांनी जातियवादाविरुध्द प्रचंड आंदोलन छेडले. दलितांना संघटीत करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांनिच दलितांना मानाने जगण्याचे स्थान मिळउन दिले. भारतात पसरलेल्या जातियवादाला कंटाळून त्यांनी १४ अॉक्टोबर १९५६ रोजी नागपुर येथे प्रचंड संख्य़ेने हजर असलेल्या सभेत हिंदू धर्माचा त्याग करुन बौध्द धर्माचा स्विकार केला. त्यांनी आपल्या दोन लाख अनुयायांचे एकाच दिवशी धर्मपरिवर्तन घडवून आणले. 
त्यानी केंब्रिज विद्यापिठातून पि.एच्. डी. व डि. एस् सी. केले होते. कोलंबीया विद्यापिठातून एल्. एल्. डी. व उस्मानिया विद्यापिठातून डि. लिट् हि पदवी संपादन केली होती. त्यांच्या घरात ३५००० पुस्तकांचे भंडार होते. त्यावेळी च्यांच्याईतके उच्चशिक्षीत तेच होते. म्हणुनच त्यांना घटना समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांनी समाजशास्त्र, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, राजनिती, दलितोध्दार कायदा, शिक्षण व साहीत्य तसेच प्रासंगीक संदर्भावर आधारीत अनेक पुस्तके लिहीली. ते अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते एक सच्चे पत्रकारही होते. पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तनासाठी बरेच प्रयत्न केले. मुकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुध्द भारत, जनता यामधुन त्यांनी आपले विचार लोकांसमोर मांडले. अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमध्ये प्रस्थापीत व्यवस्थेला शह देत त्यांनी लिखाण केले.   ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. ते फक्त दलितांचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे नेते होते. त्यांचे जिवन हे सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. भारताचे महान सुपुत्र म्हणुन त्यांचा देशाला नेहमी अभिमान राहिल.

No comments:

Post a Comment