महाराष्ट्र हे भारतीय संघराज्यप्रणालितील एक महत्वपूर्ण राज्य आहे. महाराष्ट्रला प्राचीन,मध्ययुगीन आणि आधुनिक वारसा लाभला आहे.इतकेच नव्हे तर. महाराष्ट्रला इतर राज्यापेक्षा सांस्क्रृतिक वेगळेपण आहे. तसेच महाराष्ट्रला भौगोलिक वेगळेपण ही प्राप्त झाले आहे.
प्राचीन महाराष्ट्र :-
महाराष्ट्रची उत्पती प्राचीन कालखंडात झाली असे इतिहासकारांच मत आहे.वरूची वास्तायन ,भरतमुनी यांच्या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आढळते.प्राचीन महाराष्ट्रातील सर्वात पहिले ज्ञात राज्यकर्ते सातवाहन हे होते. त्यांचा काळ ई.स.पूर्व 230 ते ई.स. 230 पर्यंत होता. सातवाहन राज्यकर्तयाची सत्ता 400 ते 450 वर्ष इतकी होती. ह्या राज्यात सातकर्णी पहिला, सातकर्णी दूसरा , राजाहाल ,पुल्लुमावीअसे उत्तम प्रशासक होउन गेले. सातवाहन राज्याच्या पतनानंतर वाकावट राज्यवंश उदयास आला.विंध्यशक्तीने ह्या राजवंशाची स्थापना केली.ह्या राजवंशातील विंध्यशक्ती ,प्रवसेन, रुद्रसेन, हरीसेन, प्रवसेन ह्या राज्यांनी राज्य केले.नंतरच्या काळात महाराष्ट्रात चालुक्य राजवंशाचा उदय झाला. चालुक्याचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर चांगला प्रभाव पडलेला दिसतो. किर्तीवर्मन, पुलकेशी दूसरा विक्र्मादित्य पहिला आणि दूसरा हे राजे ह्या राजवंशात होऊन गेले. त्यानंतर आलेला राष्ट्रकुट हा प्राचीन महाराष्ट्रातील शेवटचा राजवंश होऊन गेला उत्तरेच्याराजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे जरी असले तरी महाराष्ट्रातील ऐतिहासिक पार्श्वभूमी आजही महत्वपूर्ण ठरली आहे.दंतीदुर्ग , कृष्ण पहिला ,ध्रुव, तीसरागोविंद, अमोघवर्ष आदी राजकर्ते राष्ट्रकुटांच्या काळात होऊन गेले.प्राचीन कालीन महाराष्ट्र संमृध्द होता .प्राचीन महाराष्ट्राने कला, स्थापत्य, कृषी विद्या व व्यापार आदी बाबतीत प्रगती केली होती. प्राचीन महाराष्ट्रात देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास,कराड, तेरे ,पैठन आदी नगरांचा विकास, चोल, सोपारा, भडोच आदी बंदरांचा विकास अजिंठा, पितळखोर ईथे झलेला स्थापत्यकलेचा विकास हि उदाहरण प्राचीन महाराष्ट्राची वैभव संपन्नता सांगणारी आहे.

मध्ययुगीन(अर्वाचिन)
महाराष्ट्र:-
मध्ययुगात महाराष्ट्राला देवगिरिचे यादवांच्यारुपाने
प्रभळ राज्यकर्ते मिळाले . देवगीरी ही त्यांची राजधानी होती राष्ट्रकुट सत्तेत
झालेल्या कलहाचा फ़ायदा ऊचलुन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. हे एक प्रभ
हिंदु राज्य होत. तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि
समृद्ध हि होत.भिल्लम, पहिला जैतुगी, सिंघण
, कृष्ण, महादेव, रामदेव, हरपालदेव हे यादव कुळातील राज्यकर्ते होऊन
गेले.पुढे अल्लादिन खिलजी आणि मुबारक खिलजी ह्यानी दक्षिणेत स्वारी केली आणि यादव
कुळातील शेवटचा राजा जयपाल ह्याचा पराभव केला. परिणामी महाराष्ट्रला इस्लामच्या राजवाटीचा सामना करावा लागला. त्या नंतरच्या काळात तुघलक
घराणयातला बादशहा मौहमद तुघलक ह्यानी सुरक्षतेसाठी काही काळ देवगीरी(दौलताबाद ) इथे आणली .परंतु जनतेची
नाराजी आणि विरोधामुळे त्याला उत्तरेत पुन्हा दिल्लीला जावे लागले. तो दिल्लीला
गेल्या बरोबर दक्षिणेतील त्याचा सरदार हसन गंगू ह्यानी
बंडखोरी केली. आणि बहमानी राज्याची स्थापना केली. परंतु त्या बहमानी राज्यात
आपआपसात कलह निर्माण होऊन त्या राज्याचे विघटन होऊन पाच
राज्य बनली बिदरची बरीदशाही , अहमदनगरची निजामशाही , विजापुरची आदिलशाही, वर्हाडची इमादशाही गोवळकोंडयाची
कुतुबशाही . पुढे ह्या पाच शहामध्ये कलह सुरू झाला आणि तो विकोपाला गेला . त्याचाच
फ़ायदा ऊचलुन छत्रपति शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.या
साम्राज्याने महाराष्ट्रला समृद्ध अशा राजकिय , आर्थिक ,धार्मिक, सांस्कृतिक , न्याय
तसेच कला स्थापत्याचा व निर्भयतेचा वारसा दिला. शिवरायांच्या
कणखर कर्तुत्वाने व नेतृत्वाने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण राष्ट्र नव्या
भरारीने जीवन जगन्यात प्रेरित झाले.शिवाजी महाराज्यानंतर संभाजी राजे, राजाराम राजे, राणी ताराबाई शाहूमहाराज ह्या विभुतिंनी
मराठा साम्राज्य विस्तारीत करणयास आणि वाचविणयासाठी
प्रयत्न केले.शाहू महाराजाच्या काळात पेशवाईचा उदय झाला. बाळाजीविश्वनाथ , थोरले बजिराव , नानासाहेब, माधवराव
ह्यांच्या काळात मराठाराज्य उत्तरेत विस्तार पावले . परंतु दूसरा बजिरावाच्या
चुकांमुळे महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला.व इ.स. 1818मध्ये
इस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रवर राज्य करु लागली.
आधुनिक महाराष्ट्र:-
1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यात न्यायमुर्ती रानडे , ना. गोखले ह्यांसारखे नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आले. परंतु हे मवाळवादी होते. ह्याच काळात जोतिबा फुले हे समाज सुधारक पुढे आले. त्यांनी सत्यशोधकसमाजाची स्थापना केली. समाजातील चुकिच्या रूढी विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले त्यांनी जातीभेदाला वोरोध दर्शविला. तसेच स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कासाठी ते आजीवन झटले.पुढील काळात राष्ट्रीय सभेतील मवाळ नेत्यांची जागा जहाल नेत्यांनी घेतली भारताला लोकमान्य टिळकांच्या रुपाने एक जहाल नेतृत्व मिळाल .ह्याच काळात महाराष्ट्रात क्रांतिकारक पक्षाचा उदय झाला. देशाला वासुदेव बळवंत फडके ह्यांनी सर्व प्रथम सशस्त्र उठाव केला. परंतु त्यांना इंग्रज सरकारनी अटक करुन एडनच्या तुरुंगात ठेवले .एडनच्या तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला .त्यानंतर चाफेकर बंधुंनी चाफेकर क्लबची स्थापना केली. पुण्यात प्लेगची साथ आली असताना रँड ह्या इंग्रज अधिकार्याने जनतेचा छळ केला.स्त्रीयांची सुद्धा विटंबना केली. त्यामुळे क्रांतीकारक पेटून उठले आणि 22जुन 1897 रोजी चाफेकर बंधुंनी रँडचा बंदुकिची गोळी घालुन वध केला. चाफेकर बंधुंना फाशी झाली . त्यानंतर इ. स.1898 मध्ये विनायक दमोदर सावरकर ह्यांनी आपल्या साथीदारांना घेऊन मित्रमेळा ह्या संघटनेची स्थापना केली. पुढे त्या संघटनेचे अभिनव भारत ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेत रुपांतर झाले.लंडन मधील तरूणांनामध्ये क्रांतिची ज्योत पेटविन्यासाठी सावरकरांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ म्याझिनीच चरित्र ,व 1857चे स्वातंत्र्य समर हे ग्रंथ लिहले . ह्याच संघटनेच्या अनंत कान्हेरे ह्या यूवकाने कलेक्टर जॅक्सनचा बंदुकिची गोळीघालुन वध केला. ह्या खुनाच्या आरोपाखाली अनंतला फाशी झाली. तसेच इंग्रजसरकार बरोबर युद्धकरणे आणि त्याला सहाय्य करणे असे आरोप ठेवुन सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठवले. पुढे गांधी युगात आहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळविणयाचे प्रयत्न चालू ठेवले . बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दलित चळवळीचा आरंभ केला.दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवुन दिले. राष्ट्रीयसभा आणि क्रांतिकारक पक्षाच्या प्रयत्नांना यश मिळाल आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंतत्र्य मिळाल.परंतू केंद्रसरकारने 1956 मध्ये सौराष्ट्र , गुजरात, मराठवाडा, विदर्भ , मुंबई, असे राज्य स्थापन केले. पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु झाला. संयुक्तमहाराष्ट्रासाठी 105 तरुणांनी बलिदान दिले. आणि त्या हुत्ताम्यांचे बलिदान फळास येऊन 1 मे1960ह्या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

No comments:
Post a Comment