Friday, 1 May 2015

आठवणी...


आठवणमनाला व्याकूळ करणारा, स्वत:ला भूतकाळात घेऊन जाणारा शब्द. सुखद आठवणी मनावर रोमांच उभे करतात, तर दु:खद आठवणी निराशेच्या गर्तेत लोटतात. चांगल्या आठवणी नेहमी आठवत राहाव्याशा वाटतात, तर वाईट आठवणींपासून खूप दूर पळावेसे वाटते. खरं तर प्रत्येक माणूस हा आठवणींवरच जगत असतो असे म्हणतात. रोज घडणाऱ्या घटना, प्रसंग उद्या आठवण बनूनच माणसाच्या आयुष्यात येतात. आठवणी माणसाला पुन्हा नव्याने जगण्याचं बळ देतात, सामर्थ्य देतात. कधी-कधी त्या मनुष्याला खचवतातही. अशावेळी घडलेल्या घटना मनावर ओरखडे, व्रण उमटवतात, तर चांगल्या आठवणी मनाला रेशमी झालर लावून जातात. प्रत्येकाजवळच आठवणींचा अमूल्य साठा असतो. त्यांच्यासाठी मनुष्याच्या मनात एक विशिष्ठ जागाही असते. आठवणी जीवन बदलण्यास उपयोगी पडतात. प्रत्येकजण आपल्या मनात कोणत्या ना कोणत्या आठवणी जपत असतो आणि त्या कोमेजू नये यासाठी त्याची काळजीही घेत असतो. त्या तशाच टवटवीत राहाव्यात म्हणून सदैव त्यांना उजाळा देत असतो. या आठवणी माणसाला दिलासा देतात. एखादया नाजूक क्षणी वाटही दाखवतात.

No comments:

Post a Comment