Friday, 1 May 2015

ताजमहाल

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल हा आपल्या देशाची शान समजला जातो. याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा. देशीविदेशी सर्व पर्यटकांची पहिली पसंती
समजला जातो. याचा इतिहास मोठा आहे. याच्या निर्मीती वरून बरेच वादही आहेत. चला थोडासा आढावा घेउया या ताजमहालाबद्दल.शहाजहान या मोघल सम्राटाने मुमताज नावाच्या आपल्या लाडक्या राणिच्या स्मरणार्थ हा महाल बांधला . असे सांगितले जाते. जगातल्या सुंदर ईमारतींपेक्षा हि ईमारत सरस गणली जाते. ताजमहाल याचा अर्थच महालांचा मुकूटमणी असा होतो. पांढरा संगमरवरी दगड वापरुन आणी बेशकिमती खड्यांनी नक्षी करुन या ईमारतीला खास बनवले आहे. यमुना नदिच्या तिरावर वसलेली हि ईमारत पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. ताजमहलला दरवर्षी लाखो लोक भेट देतात.
आत घुमटा खाली शहाजहान आणी मुमताज यांची स्मारके आहेत. आतल्या भिंतीवर फुलांची नक्षी आणी कुराणातील वचने आहेत. यासाठी अनेक मौल्यवान दगड वापरलेले आहेत. राजा राणीच्या कबरीजवळ अत्यंत साधेपणा आढळतो.  असे सांगितले जाते कि या ईमारतीच्या निर्मीती नंतर हि ईमारत निर्माण करणा-या कारीगरांचे हात कापण्यात आले कि, जेणेकरून अशी ईमारत पुन्हा बनविली जाउ नये.
ताजमहालाबाबत न्यायालयात खटला प्रलंबीत असून पुरूशोत्तम नागेश ओक यांच्या म्हणण्यानूसार हि एक हिंदू ईमारत असून याचे नाव ताजमहल नसुन तेजोमहालय असे आहे. आणी ते एक प्रचिन शिवमंदीर आहे.  ईतिहास सांगतो कि ताजमहल शहाजहानने बनवला पण भारताच्या पारतंत्र्याच्या काळात ईतिहासामध्येही खोडसाळ्णा झालेला आहे हे देखिल सर्वमान्य आहे.

No comments:

Post a Comment