Friday, 1 May 2015

पर्यावरण...

     मानव आणी पर्यावरण हे दोन वेगवेगळे घटक असले तरीही मानवाचा पर्यावरणाशी घनिष्ठ संबंध आहे. मानवाच्या जिवनातील पर्यावरण हा एक महत्वाचा घटक आहे, हे आपण कधीच नाकारु शकत नाही. मानव हा नेहमीच निर्सगाची पुज्या करतो. निसर्ग ही माणवाला मिळालेली सुंदर भेट आहे. असे आपण नेहमीच म्हणतो. नद्या, सरोवरे, तलाव, जंगले, वने, प्राणी, पक्षी हे सगळे आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत.
     गेल्या काही वर्षापासुन पर्यावरण हा एक नविन विषय, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्याना अभ्यासक्रमात येण्याची र्चचा सुरु आहे. नेमक पर्यावरण म्हणजे काय आण याचा आपल्या मानव जिवनावर कसा परीणाम होतो त्याच बरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे जाणुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला पर्यावरणा पासुनच सुरुवात करायला हवी.
     परी या शब्दाचा अर्थ आहे चारही बाजुंनी आणि आवरण या शब्दाचा अर्थ आहे कवच. अर्थात पर्यावरण या शब्दाचा सरळ अर्थ म्हणजे आपल्या भोवताली चारही बाजुंना असलेले कवच जे सातत्याने आपले रक्षण करत. दुसय्रा शब्दात म्हटले तर आपल्या आजुबाजुला असणारे वातावरण जेथे आपण राहतो किंवा सहवास करतो, याला सुद्धा पर्यावरणच म्हटले जाते. या पृथ्वी वर जन्माला येणारा प्रत्येक जीव हा या पर्यावणातच जन्म घेतो, व शेवटी पर्यावरणातच विलीन होतो.
     हवा, पाणी, आकाश, जमिन आणी अग्नी या पर्यावरणातील पंचमहातत्वांचा प्रभाव सजीव सृष्टिच्या जिवन आणि विकासावर होत असतो. पर्यावरण हा प्रकृतिने दिलेला एक अमुल्य ठेवा आहे. मनुष्य आणी पर्यावरण यात घनिष्ठ संबंध आहे. आपल्या आसपास जे पर्यावरण तसेच मानव निर्मित वातावरण आहे, ते सर्व मिळुनच पर्यावरणाची निर्मिती होते, ज्या मातीत झाडे-झुडपे वाढतात, ज्या भुमीवर आपण राहतो, जे पाणी पीतो, ज्या हवेत श्वास घेतो, ज्या वस्तु खाऊन आपली भुक क्षमते, त्या सर्व वस्तु पर्यावरणाशी निगडीत आहेत.
     वने ही देशाची राष्र्टीय संपत्ती आहेत आणी लाकुड निर्माण करणे हे जंगलांचे महत्वपुर्ण काम आहे. लाकडा पासुन निरनिराळ्या मानव उपयोगी वस्तु बनवल्या जातात. ज्यात इमारती लाकुड, जळाऊ लाकुड, कोळसा त्याचबरोबर फळे, फुले, औषधे यासारख्या उपयुक्त वस्तु लाकडापासुन मिळतात. प्रत्येकी एक झाड हे एकुण ३६ व्यक्तींसाठी प्राणवायु म्हणजेच ऑक्सिजन प्रदान करत असते. प्राचिनकाळातील ऋगवेदात सुद्धा वनांना पुर्ण सृष्टितील सुखांचा स्त्रोत मानले गेले आहे. जर आपल्याला आपल्या कुटुंबियांना सुखी आणी समृद्ध पाहावयचे असल्यास झाडांचे रक्षण करणे हे अत्यंत आवषक आहे.
     वनांच्या संरक्षणासाठी शासन सुद्धा प्रयत्नशील आहे. शासनाने वनाच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. जेणे करुन आपल्याला वने सुरक्षित ठेवता येतील. आणी वनांचे संरक्षण करता येईल. शासनासोबतच आपल्याला सुद्धा वनांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. काही राज्यात वृक्ष तोडीच्या विरोधात चिपको आंदोलन करण्यात आले होते. आणी या आंदोलनात महिलांचा प्रामुख्याने सामावेश होता. आमचा धर्म तुडवु नका वृक्षसंपदा नासू नका असे म्हणत वृक्ष तोड थांबवण्यासाठी महिला झाडांना कवटाळुन उभ्या होत्या. आणि अखेर त्यांनी वृक्ष तोड थांबवली.
     वनांच्या आणी वृक्षांच्या संरक्षणासाठी आपले योगदानही अत्यंत महत्वाचे आहे. झाडे लावणे, त्यांचे नियमित पणे रक्षण करणे, हि आपली जबाबदारी आहे.

No comments:

Post a Comment