सामाजीक बांधिलकी जपणारा अधिकारी
मुंबई पोलिस म्हटले कि, समोर उभे
रहाते एक भारदास्त व्यक्तीमत्व. अशाच एक व्यक्तीमत्वांपैकी आहेत धनंजय
रामचंद्र कुलकर्णी.विज्ञान शाखेतुन पदविधर होउन महारा्ष्ट्र सेवेतरुजू
झालेले धनंजय कुलकर्णी यांनी llbआणी mbaसुध्दा केलेले आहे. नगर जिल्यातील
हा गुणी अधिकारी १९९८ साली पोलिस दलात भरती झाला.Friday, 1 May 2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ हा दिवस उजाडला आणी
भारतात एक नव्या पर्वास सुरुवात झाली. या दिवशी एका महान व्यक्तिचा जन्म
झाला. जो केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही तर विश्वविख्यात झाला.

शालेय जिवनात पाणी पाजणारा चपराशी देखील त्यांना पाणी पाजत नसे. पण
स्वाभिमानी बाबासाहेबांनी कधी लाचारी पत्करली नाही. ते तसेच दिवसभर पाणी न
पिता रहात असत. ईतर मुलांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार मिळवण्यासाठी ते
प्रयत्न करत असत.
जागतिक बॅंक
आपण नेहमी ऐकतो कि भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सरासरी अमुक
अमुक , एवढे एवढे कर्ज आहे म्हणुन. त्यावेळी मनात विचार येतो कि, आपण तर
कोणतेच कर्ज काढले नाही मग आपल्या डोक्यावर हे कोणते कर्ज. तर हे कर्ज आहे
जागतिक बॅंकेने आपल्या विकासासाठी आपल्याला दिलेले. विकास किती झाला हे तर
आपणा सर्वांना माहितच आहे काहि वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र कर्ज काही
अजुन उतरले नाही. असो आजचा विषय हा नाही आहे. आजचा विषय आहे जागतिक
बॅंकेची कर्ज देण्याची पध्दती. जागतिक बॅंकेचे कार्य कसे चालते याचा आपण
थोडक्यात आढावा घेउ.
रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणांमुळे नागरीकांची गैरसोय
कल्याण शहरांमध्ये दरवर्षी
रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. हे डांबरीकरण केल्यामुळे पावसाळ्यात
ठिकठिकाणी खड्डे पडून त्या खड्यात पावसाचे पाणी साचले जात होते. यांचा
परिणाम म्हणुन रस्त्यांचे सुध्दा नुकसान होते व या सर्वांचा परिणाम
पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साठुन ट्राफीकवर होतो. या सर्वांचा विचार करून
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मे महिन्याच्या अंतापर्यत कल्याण
शहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे हे महत्त्वाचे असले तरीही या
रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणासाठी सर्व ठिकाणी एकाचवेळी खोदकाम करून
रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.
Hotel Pushpraj
कल्याण शहरातीलच नव्हे तर कल्याण
तालुक्यातील स्वदिष्ट पावभाजी व राईसप्लेट साठी तिन पिढ्यातील
कल्याणकारांचे तसेच उपनगरीयांचे प्रसिध्द हॉटेल म्हणजे हॉटेल पुष्पराज.
श्रीमंत, मध्यमवर्गीय व गोरगरिबांच्या आवडिचे व खिशाला परवडणारे आणी कल्याण
स्टेशन पासुन अगदी जवळ बाजार पेठेतील हॉटेल पुष्पराज होय.
उन्हा, तान्हात भुक भागवण्याचे आणी विसावा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल पुष्पराज होय.
पारले जी.
गरिबांना तर उपयोगी पडतोच पण श्रीमंतानाही उपयोगी पडणारे एक बहुमुल्य असे एक बीस्किट ज्याची तीन पीढ्या पासुन आज पावेतो अजुनही किंमत वाढलेली नाही. अत्यंत अल्प दरात मिळतो. गरीबाला कुपोशीत भागाला भुकेला विसावा मिळेल व आजही दोन रुपयांचा बिस्किट पुडा मिळतो. ऊदर निर्वाहाचे साधन जरी नसले तरी भुक शमवणारा. गरीबाच्या भुक शमवणा-या व बीस्कीटाची किंमत न वाढविणा-या पारले जी ग्लुकोज कंपनीचे माझ्या कडुन व माझ्या कुटुंबाकडुन व गरीब व कुपोशीत भागातील जनते कडुन शतःशा आभार.
नवी समीकरणॆ समाज पोखरणारी

स्त्रि बद्दल समाजमन कधी जागरुक हॆाईल?
INDIA IN THE PAST AND TODAY

RAMAYANA TODAY
योग - धर्म का दर्पण

HANUMAN-TOP CLASS MANAGEMENT SKILLS

CONCLUDED IDEAS ON THE RAMAYANA

मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार...
आपल्याला माहित आहे
की, डिप्रेशन हा जगभर आढळणारा एक अत्यंत सर्वसाधारण आणि नेहमीचा मानसिक आजार आहे
आणि तो सर्व समाजांमध्ये आढळून येतो. असे असले तरीही सर्वसाधारण आरोग्यसेवेत
त्याच्यावर उपचार मिळणे तर दूरच, पण फार क्वचित त्याचे निदान केले जाते. याचे कारण
साधे आहे. डिप्रेशनचे फार कमी रूग्ण त्यांना डिप्रेशनचा त्रास होत आहे याची उघडपणे
तक्रार करताना आढळतात. अनेक अ-युरोपीय भाषांमध्ये डिप्रेशन किंवा अँग्झायटी या मानसिक रोगांसाठी शब्ददेखील
नाहीत. अर्थात सर्वांना प्रश्न पडतो की हे मानसिक आजार ओळखायचे कसे आणि त्यावर उपचार
करायचे कसे? आपण
या लेखात मानसिक आजारांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
उत्तम
आरोग्य म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त शरीर असे नाही. उत्तम आरोग्य म्हणजे
मनही निरोगी असले पाहिजे. चांगले मानसिक आरोग्य असलेली व्यक्ती सरळ आणि व्यवस्थित
विचार करू शकली पाहिजे. आयुष्य जगताना विविध समस्यांना तोंड देऊ शकली पाहिजे.
मित्रपरिवाराबरोबर, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर आणि कुटुंबियांबरोबर चांगले
संबंध राखू शकली पाहिजे. तसेच स्वत: समाधानी राहून स्वत:च्या
वागण्याने ती इतरांना आनंद देऊ शकली पाहिजे.
तसे
पाहता शरीर आणि मन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे समजून आपण बोलत असतो.
प्रत्यक्षात त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यांत अनेक गोष्टी समान
आहेत. फक्त जगासाठी ते दोन स्वतंत्र चेहरे आहेत. दोहोंपैकी एकाला जर त्रास होत
असला तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. शरीर आणि मनाचा आपण जरी
स्वतंत्रपणे विचार करत असलो तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र मुळीच नाहीत.
जसे आपले
शरीर आजरी पडू शकते तसेच आपले मनही आजारी पडू शकते. याला आपण “मानसिक आजार” म्हणू शकतो. मानसिक आजाराची थोडक्यात व्याख्या काय? मानसिक आजार म्हणजे असा कुठलाही आजार ज्यामुळे त्या व्यक्तीच्या भावना,
विचार आणि वर्तनावर परिणाम होतो. संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाच्या आणि
सांस्कृतिक धारणांच्या बाहेर जाणारे हे वर्तन असते. शिवाय त्या वर्तनाचा त्या
व्यक्तीच्या किंवा तिच्या कुटुंबाच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.
मानसिक
आजारांमध्ये आरोग्याच्या व्यापक समस्यांचा समावेश होतो. बहुतेकांना वाटते की,
मानसिक आजार म्हणजे हिंसक, प्रक्षुब्ध वर्तन आणि लैंगिक संबंधासाठी अयोग्य असणे.
या प्रकारच्या वर्तन समस्या तीव्र प्रकारच्या मानसिक बिघाडांमध्ये आढळून येतात. पण
मानसिक आजार झालेले बहुसंख्य सर्वसाधारण लोकांसारखेच दिसतात आणि वागतात. नेहमी
आढळणाऱ्या मानसिक आजारांमध्ये डिप्रेशन, चिंता, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता
यांचा समावेश होतो.राजमाता जिजाऊ...
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे ही
अवघ्या मराठी मनांची शान ! खरे तर शिवरायांचे कर्तृत्व
महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नाही. ते खूप खूप मोठे होते आणि असा गुणवंत, शीलवंत, श्रीमंत योगी जिने घडविला ती माता
जिजाऊ त्यांच्याहूनही महान होती. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा | ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ||’ असे म्हणतात; पण अशा कीर्तिमान पुत्राला
वाढविताना जी मेहनत मातेला घ्यावी लागते त्याला तोड नाही. जिजामातेने शिवाजीराजे
घडविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नीतिमत्तेची झळाळी त्यांच्या मातेच्या
शिकवणुकीतूनच प्राप्त झाली. जाधवांची ही कन्या शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर विवाह
करून भोसले घराण्याची सून झाली. पण सासर-माहेरात काही कारणाने वितुष्ट आले आणि
जिजाऊला ते दु:ख सहन होण्यासारखे नव्हते. अशा वेळी शिवाजी यांच्यावर तिने लक्ष
केंद्रित केले.
मित्रांच्या सहवासात...
आयुष्यरूपी वेलीवर उमलणारी सुंदर फुले म्हणजे मित्र. शीतल चंद्राच्या छायेत
चांदण्या रात्री पडलेलं गोड स्वप्न म्हणजे मित्र. आयुष्यात सुखाचा सुगंध पसरविणारे
आणि दु:खाची दुर्गंधी दूर करणारे म्हणजे
मित्र. प्रसंगी फुलांहूनही कोमल आणि वज्राहूनही कठीण होणारे म्हणजे मित्र.
सुखाच्या छायेत आणि दु:खाच्या वाटेत आयुष्याच्या नावेला
किनारा दाखविणारे म्हणजे मित्र. मनाला निर्भिड बनविणारं, नवीन आव्हान पेलायला
लावणारं, मनात जिद्द निर्माण करणारं एक अखंड, अभेद्य स्फुर्तिस्थान म्हणजे मित्र.
आठवणी...
‘आठवण’ मनाला
व्याकूळ करणारा, स्वत:ला भूतकाळात घेऊन जाणारा शब्द. सुखद
आठवणी मनावर रोमांच उभे करतात, तर दु:खद आठवणी निराशेच्या
गर्तेत लोटतात. चांगल्या आठवणी नेहमी आठवत राहाव्याशा वाटतात, तर वाईट आठवणींपासून
खूप दूर पळावेसे वाटते. खरं तर प्रत्येक माणूस हा आठवणींवरच जगत असतो असे म्हणतात.
रोज घडणाऱ्या घटना, प्रसंग उद्या आठवण बनूनच माणसाच्या आयुष्यात येतात. आठवणी
माणसाला पुन्हा नव्याने जगण्याचं बळ देतात, सामर्थ्य देतात. कधी-कधी त्या
मनुष्याला खचवतातही. अशावेळी घडलेल्या घटना मनावर ओरखडे, व्रण उमटवतात, तर
चांगल्या आठवणी मनाला रेशमी झालर लावून जातात. प्रत्येकाजवळच आठवणींचा अमूल्य साठा
असतो. त्यांच्यासाठी मनुष्याच्या मनात एक विशिष्ठ जागाही असते. आठवणी जीवन
बदलण्यास उपयोगी पडतात. प्रत्येकजण आपल्या मनात कोणत्या ना कोणत्या आठवणी जपत असतो
आणि त्या कोमेजू नये यासाठी त्याची काळजीही घेत असतो. त्या तशाच टवटवीत राहाव्यात
म्हणून सदैव त्यांना उजाळा देत असतो. या आठवणी माणसाला दिलासा देतात. एखादया नाजूक
क्षणी वाटही दाखवतात.
छंद छायाचित्रणाचा...
सा-या जगात १९८९ हे वर्ष छायाचित्रणाचे एकशे पन्नासावे वर्ष म्हणून साजरे केले गेले. या काळात आम्ही जन्माला आलो हे एकपरीने आमचे भाग्यच समजायला हवे. कारण यामुळे घरबसल्या बाहेरचे सारे जग आपण छायाचित्ररूपात पाहू शकलो. आज इतिहासाचे पानन पान छायाचित्रणाने लिहिले जात आहे. महासागराच्या तळाशी असलेला अमौलिक खजिना टिपला जात आहे तो छायाचित्रणाने. अंतराळातल्या मोहविणा-या ता-यांचा वेध घेतला जात आहे तो छायाचित्रणाने. जमिनीच्या गर्भात काय काय दडलेले आहे याचा शोध घेतला जात आहे तोही छायाचित्रणाने. पृथ्वीतलावर घडणा-या असंख्य जिवंत घडामोडींना चिरस्थायी करण्याचे, मौलिक काम छायाचित्रणाने केले आहे.
कॅमेरा कुठल्या
छायाचित्रात कशा त-हेने वापरता येतो ही दिशा कळणे आवश्यक आहे. कॅमेरा हे एक यंत्र
आहे, पण तो कसा वापरावा हे एक तंत्र आहे. तांत्रिकतेत प्रत्यक्ष कॅमेरा वापरताना
चुका होणं स्वाभाविक आहे. मात्र ती चुक कशी झाली हे त्याला कळणे आवश्यक आहे. यंत्र
आणि तंत्र या दोन्ही गोष्टी छायाचित्रकाराने नीट अभ्यासल्या तर त्याला यशस्वी
छायाचित्रणाचा मंत्र मिळेल. त्यावेळी मात्र त्याचा शिक्षक तोच असेल व कलाचित्रे,
कलातपस्वी त्याचे मार्गदर्शक असतील. छायाचित्रणाचा छंदच असा आहे की कुठल्याही
प्रसंगाविषयीचा किंवा दृश्याविषयीच्या आपल्या भावना छायाचित्राद्वारे बोलक्या करता
येतात आणि ज्या भावना बोलक्या होतात त्या छायाचित्राच्या रुपाने चिर:काल टिकतात.
हे दु:ख कुण्या जन्मीचे...
स्त्री विरूद्ध
पुरूष हा संघर्ष उभा राहिला आहे, तो स्त्रीच्या मुक्तीसाठी. स्त्रीला केवळ “बाई” म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून, एक व्यक्ती
म्हणून समाजात जगता यावं, यासाठी. पण इतक्या वर्षाच्या संघर्षानंतरही आज परिस्थिती
काय आहे ? आजही आपल्या समाजात- स्त्रियांचा ‘स्त्री ते व्यक्ती’ हा प्रवास खूप खडतर आहे. त्यांच्या
स्वतंत्र इच्छा- आकांक्षाच्या पूर्तीसाठी त्यांना केवढी तरी मानहानी सहन करावी
लागते आहे. या मानहानीला, विविध आरोपांना, चारित्र्यहननाला सामोरं जात, ठामपणे उभं
राहण्यासाठी त्या धडपडताहेत. काही स्त्रिया
यासाठी लग्न नाकारून एकटीनं आयुष्य जगण्याचा निर्णयही घेताहेत. अशा स्त्रियांचा
अनुभव काय आहे? एकटीनं जगताना पुरूषप्रधान
व्यवस्थेच्या जाचातून त्यांची सुटका होते आहे का? त्या कितपत
मुक्त...स्वतंत्र होऊ शकतात? असा निर्णय घेऊन एकटीनं जगणा-या
स्त्रियांची धडपड, त्यांचं जगणं जाणून, समजून घेण्याची गरज आहे. आपण
लग्न करू नये, एकटं राहावं, असं एखाद्या बाईच्या मनात का येतं ? त्याहीपेक्षा पहिला प्रश्न म्हणजे
मुळात माणसाला लग्न का हवं असतं; तर तो सोबतीने जगणारा आहे,
कुटुंब करून राहण्यात आनंद मानणारा आहे. कुटुंबानं जगण्याला निमित्त मिळतं,
वंशवृध्दी होते आणि आयुष्य कुणाच्या तरी सोबतीनं जगता येतं. पण लग्नानंतर हे सगळं
असंच घडतं का?
जाहिरात ही काळाची गरज...
जाहिरात ही काळाची गरज
आहे, असे आपण म्हणु शकतो. दीवसातले सात ते आठ
तास सोडले तर इतर पुर्ण वेळ आपण जाहीरातींच्या दुनियेतच वावरत असतो. टि.व्ही चालु
केला तर कार्याक्रम आणि चित्रपट कमी, पण जाहीराती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात.
रस्त्यांने चालताना जाहीरातिंचे लहान-मोठे बॉनर तर हायवेला ड्रायविंग करत असताना
मोठ-मोठ्या जाहीरातींचे होडिंग्स आपल्याला पहायला मिळतात. आत्ता तर अगदी
जाहीरातींनी ट्रेनला सुद्धा जाहीरातींचे माध्याम केले आहे. ट्रेनच्या डब्ब्यांवर
सुद्धा वेगवेगळ्या जाहीराती पाहीला मिळतात. ट्रेन मधुन बाहेर डोकावावे, तर समोर
असलेल्या भिंतींवर सुद्धा जाहीराती रंगवलेल्या दिसतात.
पर्यावरण...
मानव आणी पर्यावरण हे दोन
वेगवेगळे घटक असले तरीही मानवाचा पर्यावरणाशी घनिष्ठ संबंध आहे. मानवाच्या
जिवनातील पर्यावरण हा एक महत्वाचा घटक आहे, हे आपण कधीच नाकारु शकत नाही. मानव हा
नेहमीच निर्सगाची पुज्या करतो. निसर्ग ही माणवाला मिळालेली सुंदर भेट आहे. असे आपण
नेहमीच म्हणतो. नद्या, सरोवरे, तलाव, जंगले, वने, प्राणी, पक्षी हे सगळेच आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत.
Thursday, 30 April 2015
अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस पत्र
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही

मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही ज
मलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर, त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष
संयमाने व्यक्त करायला
साप...
साप हा शब्द जरी ऐकला तरी भल्याभल्यांची दाणादाण उडते. आपल्यापैकी प्रत्येकाचा
साप नावाच्या प्राण्याशी संबंध येतो. प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या
असतात. समाजात सापांबद्दल बरेच गैरसमज आहेत. आपण या लेखाद्वारे सापांविषयी
थोडक्यात जाणून घेऊया.
भारतात सुमारे २७८ जातींचे साप आढळतात. या जातींत आकार, लांबी, रंग, वैशिष्टय अशा
सर्व दृष्टीने खूप वैविध्य आहे. आपल्याकडील सर्वांत लहान साप वाळा (Worm Snake) हा केवळ १५ सें.मी. असून
सर्वांत मोठा साप म्हणजे जाळीदार अजगर (Reticulated Python) हा
सुमारे ११ मीटर लांबीचा आहे. सापांच्या फार थोडया जाती विषारी आहेत. सापांचा वावर
सर्व प्रकारच्या वातावरणात आढळतो. हिमालयाचा काही भाग, नद्या, घळी, समुद्र, गवताळ
प्रदेश, जंगले इत्यादी प्रकारच्या जागा व वातावरणे या ठिकाणी सापांचा वावर आढळतो.
History of Indian Railway
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या
प्लॅटफॉर्म क्रमांक आठच्या ठिकाणी पुर्वी
फाशी तलाव होता. अट्टल गुन्हेगारांना तेथे फाशी देत असत. ऐतिहासिक व्हिक्टोरिया टर्मिनल (व्हिटी) उभारण्यासाठी समुद्रात मातीची भरणी
करण्यात आली. सुमारे ८० एकर जागा सपांदन करून मुबंईच्या सौंदर्यात भर टाकण्यात
आले. व्हिक्टोरिया टर्मिनल ला दहा वर्ष लागली बनवायला. त्या साठी सर्व खर्च मिळुन
१६ लाख ३५ हजार ५६२ रूपये झाला होता. दरवर्षी लोकल गाड्यांच्या
वेळापत्रकात बदल करण्यात येत असला तर दुपारी साडेतीनच्या गाडीच्या वेळात बदल करण्यात येत नाही .त्याचे मुख्य कारण म्हणजे मुबंईहुन ठाण्याला १६एप्रिल १८५३रोजी सोडण्यात
आलेल्या पहिल्या रेल्वे गाडीची आठवण जतन
करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातच नव्हे तर आशियात पहिली रेल्वे
गाडी सुरू करणा-या मध्य रेल्वे म्हणजे पुर्वीची ग्रेट इंडियन पेनिन्सुला
रेल्वेविषयी (जीआयपीआर) तसेच रेल्वे स्टेशनाची उभारणीबाबत अशी रंजक कथा आपणास हवी असेल ,तर ऱाजेद्र
आकलेकर यांचे ( हॉल्ट स्टेशन इडिया ) दि ड्रॅमॅटिक टेल ऑफ दि नॅशन्स फर्स्ट रेललाइन,
हे पुस्तक वाचायला हवे. भारतात कार्यक्षमरीत्या प्रशासनकरता यावे या हेतुने रेल्वे सुरू करण्याच्या
निर्णय ब्रिटीश सरकारने १४ नोव्हेंबर १८४९ रोजी घेतला. जेम्स जॉन बर्कले या अवघ्या ३०
वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियरने रेल्वे प्रत्यशात साकरण्याची जबाबदारी
सोपवण्यात आली. बर्कले नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी ७फेब्रुवारी १८५० रोजी भारतात आले. रेल्वेमार्गाचे भुमीजन ऑक्टोबर
१८८५ मध्ये करण्यात आले. फॅव्हिल अॅंन्ड फॉवलर या ब्रिटिश
कंपनीस कंत्राट देण्यात आले. हा मार्ग पुर्ण होत असताना इंग्लडहुन आणलेल्या वाफेच्या पहिल्या इंजिनची चाचणी १८नोव्हेंबर १८५२
रोजी घेण्यात आली आणि १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली गाडी मुबंई ते ठाणे मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली .मुबंईहुन दुपारी ३.३५च्या मुहूर्तावर पहिली गाडी सुटली .त्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. ५७ मिनिटात मुबंई ठाणे ३४ कि.मी.अंतर चा प्रवास गाडीने पुर्ण केला.
नको ती महागाई
आजपर्यंत या विश्वात कुठल्याच गोष्टीला अमरत्व प्राप्त झाले नाही. म्हणजे माणसाला नाही. पशु-पक्ष्यांना
नाही. वा-याला नाही. पण महागाई मात्र या सगळ्याला अपवाद ठरवण्याच्या
मार्गावर आहे. कारण महागाई जेव्हापासुन जन्माला आली आहे. तेव्हापासुन फक्त
वाढतेय, फोफावतेय. आपल्या आजुबाजुला महागाईने आपली पाळेमुळे अगदी घट्ट
रोवली आहेत. त्यासाठी तिला मदत करणारे आपलेच राजकारणी लोक आहेत. त्या मुळे
ती स्थिरावली आहे. सुस्तावली आहे. तिने इथेच आपला डेरा टाकला आहे. या
महागाईच्या जन्मापुर्वीची कहाणी खुप वेगळी होती. पुर्वी रूपायाला पाच शेर
तांदुळ मिळायचे. दुध, तुप, दही यांची रेलचेल असायची. सोन पंधरा-वीस रूपये
तोळ होत. वीस-पंचवीस रूपयात, सात-आठ जणांचा संसार व्यवस्थित चालायचा, या
सगळ्या गोष्टी आता दंतकथा वाटायला लागल्या आहेत. आजच्या पिढीला एकच सत्य
माहीत आहे, ते म्हणजे महागाई. या महागाईचे सगळ्यात जास्त चटके गरीब माणसाला
सोसावे लागतात. या महागाई मुळे गरीब श्रीमंत यांमध्ये दरी निर्माण झाली
आहे.
IMPACT OF THE RAMAYANA

RAM RAJYA :THE IDEAL GOVERNANCE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ हा दिवस उजाडला आणी
भारतात एक नव्या पर्वास सुरुवात झाली. या दिवशी एका महान व्यक्तिचा जन्म
झाला. जो केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही तर विश्वविख्यात झाला.

शालेय जिवनात पाणी पाजणारा चपराशी देखील त्यांना पाणी पाजत नसे. पण
स्वाभिमानी बाबासाहेबांनी कधी लाचारी पत्करली नाही. ते तसेच दिवसभर पाणी न
पिता रहात असत. ईतर मुलांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार मिळवण्यासाठी ते
प्रयत्न करत असत.
धनंजय कुलकर्णी (पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच)
सामाजीक बांधिलकी जपणारा अधिकारी
मुंबई पोलिस म्हटले कि, समोर उभे
रहाते एक भारदास्त व्यक्तीमत्व. अशाच एक व्यक्तीमत्वांपैकी आहेत धनंजय
रामचंद्र कुलकर्णी.विज्ञान शाखेतुन पदविधर होउन महारा्ष्ट्र सेवेतरुजू
झालेले धनंजय कुलकर्णी यांनी llbआणी mbaसुध्दा केलेले आहे. नगर जिल्यातील
हा गुणी अधिकारी १९९८ साली पोलिस दलात भरती झाला.मोबाईल फोन एक अवयव.
मोबाईल फोन शिवाय आपलं आयुष्य आता अशक्य झालं आहे. आता आपल्या
हाता-पायांसारखाच मोबाईल फोन हा जणू एक अवयव बनला आहे. जगभरात सगळीकडे
मोबाईल फोनचा वापर काही दशकांमध्येच इतका प्रचंड वाढेल अशी कल्पना कुणी
केली तरी असेल का? अशा या मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानामागे किती
शास्त्रज्ञांचे आणि संशोधकांचे अफाट परिश्रम आहेत याची जाणीव झाली की
त्यांच्या प्रयत्नांना आपण सलामच ठोकू. इतक्या छोट्या उपकरणामध्ये
संदेशवहनाच्या संदभाॆतली अमूलाग्र क्रांतीला आपला सलामच आहे.
मोबाईल फोनशिवाय आता आपलं पानसुद्धा हलत नाही अजुनही अगदी मोजके लोक मोबाईल फोन शिवाय आपल संदेशवहनाच काम साधत असले तरी बहुसंख्य लोकांना आपल्याकडे या क्षणी आपला मोबाईल फोन नाही ही कल्पना सुद्धा अस्वस्था करून सोडते
मोबाईल फोनशिवाय आता आपलं पानसुद्धा हलत नाही अजुनही अगदी मोजके लोक मोबाईल फोन शिवाय आपल संदेशवहनाच काम साधत असले तरी बहुसंख्य लोकांना आपल्याकडे या क्षणी आपला मोबाईल फोन नाही ही कल्पना सुद्धा अस्वस्था करून सोडते
Subscribe to:
Posts (Atom)