साप हा शब्द जरी ऐकला तरी भल्याभल्यांची दाणादाण उडते. आपल्यापैकी प्रत्येकाचा
साप नावाच्या प्राण्याशी संबंध येतो. प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या
असतात. समाजात सापांबद्दल बरेच गैरसमज आहेत. आपण या लेखाद्वारे सापांविषयी
थोडक्यात जाणून घेऊया.
भारतात सुमारे २७८ जातींचे साप आढळतात. या जातींत आकार, लांबी, रंग, वैशिष्टय अशा
सर्व दृष्टीने खूप वैविध्य आहे. आपल्याकडील सर्वांत लहान साप वाळा (Worm Snake) हा केवळ १५ सें.मी. असून
सर्वांत मोठा साप म्हणजे जाळीदार अजगर (Reticulated Python) हा
सुमारे ११ मीटर लांबीचा आहे. सापांच्या फार थोडया जाती विषारी आहेत. सापांचा वावर
सर्व प्रकारच्या वातावरणात आढळतो. हिमालयाचा काही भाग, नद्या, घळी, समुद्र, गवताळ
प्रदेश, जंगले इत्यादी प्रकारच्या जागा व वातावरणे या ठिकाणी सापांचा वावर आढळतो.
सापांची उत्क्रांती प्रागैतिहासिक काळातल्या विशिष्ट सरडयांपासून झाली असे
दिसते. उत्क्रांतीच्या काळात त्याचे शरीर लांब व निमुळते झाले व त्याचे वापरात
नसलेले पाय गायब झाले. पायांसारखे अवयव नसूनही सापांची चाल वैशिष्टयपूर्ण असते.
त्यांचा साधारण वेग ताशी ३ कि.मी. तर अधिकतम वेग ताशी ७ कि.मी. इतका असतो.
आफ्रिकेतील मांबा हा साप ताशी ११ कि.मी. इतक्या वेगाने मार्गक्रमण करू शकतो.
शत्रू समोर आल्यास साप पळून जाणेच जास्त पसंत करतात. मात्र पळून जाण्यासाठी
मार्ग नसल्यास ते शत्रूला ठराविक कृतींनी धोक्याची सूचना देतात. उदा. नाग फणा
उभारून जोरात फुत्कारतो. घोणस प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा मोठया आवाजाचा फुत्कार
टाकतो. तर फुरसे आपल्या शरीरावरील खवले एकमेकांवर घासून करवतीने लाकूड
कापल्यासारखा आवाज करते.
सापांचे जीवन हे सभोवतालच्या वातावरणातील तापमानाशी निगडित असते. त्यांच्या
शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानाप्रमाणे बदलते. दुसरी गोष्ट अशी की, साप अतिशय
आळशी असतात. भक्ष्याच्या शोधात जाणे सोडले तर ते बहुतांशी वेळ निपचित पडून असतात.
यामुळेही त्यांना सस्तन प्राण्यांच्या तुलनेत खूपच कमी ऊर्जा लागते. साप अनेक दिवस
अन्नाशिवाय घालवू शकतात याचे हे एक कारण आहे. एक भारतीय अजगर २ वर्षे ९ महिने इतका
काळ काही न खाता राहिल्याची नोंद आहे. अर्थात अशा उपासमारीच्या काळात शरीरातील
चरबीचा वापर ऊर्जा मिळविण्यासाठी केला जातो. विषाच्या संदर्भात सापांचे वर्गीकरण तीन प्रकारांनी केले जाते- बिनविषारी,
निमविषारी व विषारी. निमविषारी व विषारी हे दोनही साप प्रत्यक्षात विषारीच असतात.
परंतु निमविषारी सापाच्या विषापासून माणसाच्या जिवाला सहसा धोका संभवत नाही.
भक्ष्यासाठी मात्र त्याचे विष प्राणघातकच असते.

No comments:
Post a Comment