Wednesday, 22 April 2015

पुस्तक…

दीसामाजी थोडे तरी ते लिहावे,
 प्रसंगी अखंण्डित वाचित जावे.
     असे श्री समर्थ रामदासांनी सांगीतले. आजचे हे युग विज्ञानाचे युग असले तरीही त्यात पुस्तकांचा महत्वाचा वाटा आहे. पुस्तकांच्या वाचनाने आपल्या बुद्धीत आणि ज्ञानात सतत भर होत असते. पुस्तक हे अगदी सोयिस्कर असे ज्ञान ग्रहण करण्याचे साधन आहे. कारण पुस्तक हे आपण आकाश, पाताळ किंवा धरतीवर, वेळी-अवेळी, कुठेही, कसेही आणि कधीही वाचु शकतो. आपण घरात असो किंवा बाहेर असो, ट्रेन मध्ये असो किंवा ऑफिस मध्ये, बसुन, झोपुन किंवा उभ्याने अश्या कुठल्याही प्रकारे आपण पुस्तक वाचू शकतो. आणि आपल्या ज्ञानात भर घालु शकतो. पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला कोणिही अडवू शकत नाही. अर्थात आपण आपल्या आवडत्या विषयाची पुस्तके कुठेही आणि कधीही आपल्या मर्जी प्रमाणे वाचु शकतो. पुस्तक वाचण्यासाठी वेळेचे कुठलीही मर्यादा नसते. आपण आपल्याला हवे ते पुस्तक स्वतंत्रपणे वाचु शकतो.
     पुस्तकाच्या दुनियेत प्राकृतिक, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भुर्गभशास्त्र, खगोलशास्त्र, उर्जा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकिय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कृषि, विज्ञान, उद्यानविद्या, कला, नृत्य, नाटक, चित्रकला, शिल्पकला, काष्टकला, सिनेमा, खेळ, संगीत, आर्ट अशा अनेक विषयांच्या वेगवेगळ्या संदर्भातील पुस्तकांचा समावेश होतो.
        विश्व पुस्तक दिवस हा वर्षातुन एकदा २३ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस युनेस्को द्वारे पुरस्कृत केला गेला आहे. इ.स. १६१६ मध्ये २३ एप्रिल या दिवशी विश्वातील तीन सुप्रसिद्ध लेखकांचे निधन झाले होते. त्यातील पहिले लेखक शेक्सपीयर, दुसरे सरव्हन्टीस आणि तिसरे लेखक होते गारासिलासो द ला वेगा. त्याच बरोबर हा दिवस स्पेनच्या सेंट जॉर्जचा स्मृतिदीन म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी गुलाबाच्या फुला सोबत पुस्तक देण्याची सुद्धा प्रथा आहे. आणि या प्रथेला ब्रिटन मध्ये अधिक महत्व दिले जाते. हा दिवस जागतीक ग्रंथ दिवस म्हणुनही साजरा केला जातो.
     No man can be truly educated or successful in the life unless he is reader of books” असे म्हणनारे बेंजामिन फ्रेंकलिन यांनी आपल्या जिवनातील प्रत्येक क्षण हा ज्ञान ग्रहण करण्यात व्यतित केला. आचार्य रामचंद्र यांच्या म्हणन्यानुसार सुंदर आणि सार्थक जिवन जगण्यासाठी व्यक्तिकडे उपयुक्त असे ज्ञानाचे भंडार असणे आवश्यक आहे. आणि हे ज्ञानाचे भंडार आपल्याला पुस्तकातुनच मिळु शकते.
     पुस्तकाचे वाचन हे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पुस्तक हे  घरा बाहेर शिड्यांवर किंवा बाग–बगिच्यांमध्ये बसुन, टेबलावर ठेवुन किंवा खुर्चीवर बसुन वाचणा-यांची सुद्धा कुठेही कमी नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री अशा कुठल्याही वेळी आपण पुस्तक वाचु शकतो. पुस्तक वाचताना सुखः आणि दुखः या दोघांचा ही विचार करावा लागत नाही. पुस्तक हे नेहमीच यशाचे पुढचे पाऊल मानले जाते. म्हणुनच वाचाल तर वाचाल असे आपण सातत्याने म्हणत असतो.

No comments:

Post a Comment