सामान्य व्यवहारात एखादा निश्चय करणे किंवा एखादे कार्य करण्याचे ठरविणे म्हणजे निर्णय होय. निर्णय घेतल्याशिवाय कार्याची सुरुवात करता येत नाही. एखादी कृती करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात.
यापैकी योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजे निर्णय होय. विविध लोकांनी निर्णयाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. काही लोकांच्या मते काही निकशांच्या आधारे दोन किंवा अधिक पर्याया मधुन करण्यात येणारी निवड म्हणजे निर्णय होय. ज्यावेळी ज्ञान, विचार, भावना आणी कल्पना यांचा संगम होउन एखादी कृती करण्याची मानसिकता तयार होते त्यालाच निर्णय घेणे असे म्हणतात. वरील व्याख्यावरुन निर्णयाचा अर्थ स्पष्ट होतो.निर्णय हे नियोजन, उद्दिष्टे, धोरणे व कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी घेतले जातात. निर्णय घेणे हि एक बौध्दिक प्रक्रीया आहे. यामध्ये बुध्दी, ज्ञान, विवेक आणी अनुभवाची आवश्यकता असते. निर्णय घेताना एखाद्या प्रश्नाचा सर्व बाजुंचा विचार करणे आवश्यक असते. यामध्ये विविध उपलब्ध पर्यायांचा विचार केला जातो. यातुन योग्य पर्याय निवडला जातो. यामागे ध्येयप्राप्ती हा उद्देश असतो. निर्णय घेणे हे केवळ उद्दिष्ट नसुन ध्येयप्राप्तीचे साधन आहे. निर्णय प्रक्रियेत वेळेला अनन्य साधारण महत्व आहे. निर्णय हा वास्तविक परिस्थीतीशी निगडीत असतो. यासाठी आवश्यक वाटल्यास योग्य आणी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निर्णय प्रक्रीया हि नियोजनाचाच एक भाग आहे. नियोजनाचे यश निर्णयावर अवलंबून असते. निर्णय हि सतत चालणारी व गतीशीत मानसिक प्रक्रिया आहे. प्रत्येक निर्णयावर भुतकालीन, वर्तमानकालीन आणी भविष्यकालीन घटनांचा प्रभाव पडतो. निर्णय घेणे जेवढे कठिण असते त्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करणे अधिक कठीण असते. निर्णय हा नकारात्मक देखिल असू शकतो. म्हणजेच निर्णय न घेण्याचे ठरविणे हा देखिल एक निर्णयच आहे. निर्णय आणी निर्णयप्रक्रीया हे दोन वेग वेगळे शब्द आहेत. निर्णय प्रक्रियेत निर्णय घेतले जातात. तर निर्णय हा या प्रक्रियेचा अंतिम परिणाम असतो. निर्णयावरुन माणसाचे यशापयश हे ठरत असते. यावरुन त्याची योग्यता कार्यक्षमता आणी कौशल्य याचे मुल्यमापन करता येते. प्रत्येक वेळेला घेतले गेलेले निर्णय चांगलेच असतील असे नाही पण जर निर्णय चांगल्या भावनेतून घेतले गेल्यास त्यांचे परिणाम हे नक्किच चागले होतात एवढे मात्र निश्चित आहे.
No comments:
Post a Comment