गरिबी बेरोजगारी अशिक्षीतपणा बालहक्काच्या कायद्याची अंमलबजावणी न करणे असे अनेक कारणामुळे आपल्या देशात बालमजुरी आहे. लोकांना मुलांच्या हक्कांबद्दल
जागरूकता नसणे, मुलांच्या भविष्याबद्दल कळकळ नसणे आपल्या देशात दोन कोटी बालकामगार आहेत ज्या कामामुळे मुलांच्या शिक्षणाच्या हक्कामध्ये अडथळा येतो
किंवा मुलांच्या सामाजिक, शारीरिक, नैतिक अथवा मानसिक विकासात अडथळा येते, यालाज बालमजुरी म्हणतात.
18 वर्षाखालील प्रत्येक मुलाला शाळेतले शिक्षण मिळालेच पाहिजे बालकामगार बंदीचा कायदा 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलाना कामावर ठेवणा-यांवर कारवाईची होऊ शकते. ब-याचदा मुलांचे वय 14 वर्षांपेक्षा जास्त दाखवून कायद्यातून पळवाट काढतात.
18 वर्षाखालील प्रत्येक मुलाला शाळेतले शिक्षण मिळालेच पाहिजे बालकामगार बंदीचा कायदा 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलाना कामावर ठेवणा-यांवर कारवाईची होऊ शकते. ब-याचदा मुलांचे वय 14 वर्षांपेक्षा जास्त दाखवून कायद्यातून पळवाट काढतात.
टपरीवर चहा देणारा
मुलगा तसेच गॅरेजे, हॉटेल्स, कचराकुंड्या, बांधकाम, वीटभट्टी, ऊसतोडणी, गुरे चराई, खाणकाम आणि घरकाम अशा
अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने अल्पवयीन मुले काम करतांना आढळतात यामुलांकडून दिवसातले जास्त काम करुन घेऊन त्यांना 500 ते
2500 इतका
पगार किमान वेतन पेक्षा कमी आहे.
याचा फायदा मालकाला होतो मुले कमी पगाराबद्दल आवाज उठवू शकत नाहीत, जवळ
जवळ 80 टक्के
मुले घरच्या शेतात राबत असतात किंवा गुरांच्या मागे रानात जातात. त्यामुळे त्यांना वर्षातले सहा महीने शाळेत
हजर रहाता येत नाही. मुलींच्या वस्तीमध्ये असुरक्षितच्या भीतीने मुली बालमजुरीत
ओढल्या जातात तसेच अल्प वयामध्ये लग्न होऊन सासरी गेल्यावर बालमजुरीत ओढल्या जातात.
बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्रय कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी काम करावे लागते. काही मुले घरीचालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन
इत्यादी करतात. मुलांचा शिक्षणासाठी होणारा खर्च परवडणारा नसतो. जो थोडा फार पैसा मिळतो तो घरखर्चावर
होतो. सतत घाणीत काम केल्यामुळे त्यांना गंभीरआजारांना सामोरे जावे लागते यामुळे
लाखो मुलांचे जीवन कोमेजुन जात आहे. ज्या उद्योग व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या
जास्त आहे उद्योग व्यवसायांच्या मालकांवर कारवाई केली पाहिजे. त्यांची पिळवनुक
थांबली पाहिजे त्यांचे हरवलेले बालपण त्यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वानीच
पुढाकार घेतला पाहीजे.
No comments:
Post a Comment