Thursday, 30 April 2015

सचिन तेंडुलकर

जन्म व क्रिकेटची सुरवात
सचिन तेंडुलकर याचा जन्म मुंबई येथे 24 एप्रिल 1973 साली झालात्याचे पुर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. त्याला बालपणापासून क्रिकेटची आवड होती. तो मध्यम वर्गीय कुटुंबामघ्ये मोठा झाला. सचिन चे शिक्षण शारदा आश्रम मध्ये झाले. तसेच शारदा आश्रम शाळेचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांकडे क्रिकेटचं प्रशिक्षक घेतलं. सुरवातीला त्याचा सह खेळाडू विनोद काबंळी सोबत खेळावयास सुरवात केली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने मुंबई संघातून गुजरात विरूद्द पहीला सामना खेळाला. त्याने शतक मारुन तो त्या वेळी तरुण खेळाडू ठरला. क्रिकेटविश्वात डाँन ब्रँडमन नंतर जगात सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे.
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1989 साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळलाजरी सचिनची आंतराष्ट्रीय सामन्यातील सुरवात निराशजनक झाली तरी त्याने पुढील सामन्यात अर्धशतक शतक झळकावन तो सर्वात्तम खेळाडू ठरला. सचिनने रणजी चषक आणि दुलीप चषक आणि ईराणी चषकाच्या पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले

सचिनची गोलंदीजीची कामगीरी
सचिन तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने 132 कसोटी सामन्यांमध्ये 37 बळी आणि 365 एकदिवसीय सामन्यांमध्ये 142 बळींची चागली कामगिरी केली आहे. तसेच जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण त्याच्याजवळ होता.
·         सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम.
·         1997 सालच्या आँस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेमध्ये कोची येथे 5 बळीची कामगीरी सर्वात उत्कृष्ठ ठरली.
सचिनला मिळालेले पुरस्कार
पद्म विभुषण  राजीव गांधी खेळरत्न हा पुरस्कार मिळाला . सचिनला भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फलंदाजी विषेश कामगिरी
·         सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम. शतक मारण्याचा विक्रम
·         सर्वाधिक (50) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम.
·         सर्वाधिक (89 वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम.
·         सर्वाधिक वैयक्तित धावांचा विक्रम
·          23 डिसेंबर 2012 मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर.
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कसोटी फलंदाजी विषेश कामगिरी
·         सर्वात जास्त कसोटी सामने खेळण्याचा विक्रम
·         विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या डाँन ब्रँडमननंतरच्या उत्तम फलंदाजाचा बहमान
·         सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम (35)
·         सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये 10 हजार धावा करण्याचा विक्रम आहे
·         सर्वोच्च फलंदाजीची सरासरी 79.53 एवढी आहे.
·         16 नोव्हेंबर 2013 रोजीतेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर.
सचिन खासदार
सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहेसचिन तेंडुलकरची निवड मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नेमणुक केली.

No comments:

Post a Comment