पाच नद्यांचा प्रदेश म्हणुन ओळखले जाणारे राज्य म्हणजे पंजाब होय. याच पाच
नद्यांमूळे पंजाबची जमिन हि सुपिक झाली असुन येथील हरितक्रांतीचे मुख्य कारण
आहे. १९४७ पुर्वी हे राज्य म्हणजे एक मोठा प्रांत होता.
देश स्वतंत्र
झाल्यानंतर भारत आणी पाकिस्तान यांच्या फाळणीमुळे याचा काही हिस्सा
पाकिस्तानात सामिल झाला. पुढे १९६६ मध्ये या उर्वरीत पंजाबचेही विभाजन करुन
हरियाणा आणी हिमाचल प्रदेश या राज्यांची निर्मीती करण्यात आली. आणी उरलेला
भाग हा पंजाब या नावाने ओळखला जाऊ लागला. भारतातील हे एकमेव राज्य आहे जेथे
शिख समुदाय. बहुसंख्येने आहे. चंदिगड जी हरियाणाची राजधानी आहे तिच पंजाब
या राज्याची सुध्दा राजधानी आहे. शिख धर्माचे श्रध्दास्थान असलेले
सुवर्णमंदिर हे याच राज्यातील अमृतसर येथे आहे. जालियनवाला बाग हत्याकांड
तर जगजाहिर आहे. हे जालियनवाला बाग याच राज्यात आहे. अन्न धान्याच्या
उत्पादनात पंजाब भारतातील एक नंबरचे राज्य आहे. तांदुळ, गहू, मका आणी
तेलबिया हि येथील प्रमुख उत्पादने आहेत. रावी आणी सतलज या दोन मुख्य नद्या
या राज्यातून वाहतात. पंजाबी आणी हिंदी या दोन भाषा येथे प्रामुख्याने
बोलल्या जातात. शिख धर्माशी निगडीत असलेले सण बैसाखी आणी गुरूपर्व याला येथे
विशेष महत्व आहे. बैसाखी हा सण साधारणपणे शेतक-यांशी निगडीत असुन गुरूनानक
जयंती हा दिवस धर्मीक महत्वाचा मानला गेला आहे.
No comments:
Post a Comment