Thursday, 30 April 2015

शेतक-याचे आजचे जीवन.

भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून अोळखला जातो.शेती हाच ग्रामीणभागातील प्रमुख उद्योग आहे.शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदूआहे.खेड्यांचा देश असलेल्या भारताच्या आर्थिक, परिस्थितीची जबाबदारी,खेड्यातील शेतक-यावर आहे .जय जवान,जय किसान,जय विज्ञान, म्हणुन गाैरवल्या गेलेल्या शेतकरी आज आत्महत्या का करीत आहे.? स्वातंत्र्याैत्तर काळात शेतक-यांना सरकारकडुन अनेक सवलती मिळाल्या.शेती उत्पादनाला अनेक सुट देण्यात आली. सरकारकडुन अनेक शेतक-यांना कर्जे दिली गेली. प्रसंगी ती माफही केली जातात.
त्या मुळे भारतात हरीत क्रांन्ती झाली.त्यापुर्वी भारतात परदेशातून धान्य आयात करायला लागायचे.आता भारत धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला.कालतराने भारतात श्वेत क्रांती होउन दुधदुभते विपुल झाले.मग आज शेतक-यांची दुरवस्था का निर्माण झाली आहे.तरीही शेतकरी आज दरिद्री.अर्धपोटी आहे. याचे खरे कारण असे की त्यांना देऊ केलेल्या सवलती त्यांना पुर्णपणे पोहचतच नाहीत. ग्रामीण जीवणात अलीकडे उदयाला आलेले सधन शेतक-यांचा नविन वर्ग या सुखसुविधांचा लाभ स्वत;पुरताच करून घेतात. या मुळे सधन वर्ग अधिक सधन होत आहे.आणि सामान्य शेतकरी अधिकाअधिक कर्जबाजारी होत आहे.शेतक-याचा अशिक्षितपणाचा फायदा गावातील जमीनदार  सावकारही घेतात. त्यामुळे शेतक-यांच्या शेतजमीनी गहाण पडलेल्या दिसून येतात. निसर्गाचा लहरीपणा शेतक-यांना घातक ठरतो.   कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव.प्रगतीच्या काळात खेड्यातून वीज वाहु लागली. खेड्यातून एस .टी धावू लागली.शेतक-यांच्या मुलांसाठी शाळेची सोय करणयात आली. दुरचित्रवाणी मुळे शहरातील मोहात पाडणारे जीवन खेड्यापाड्यात दिसू लागले. शेतक-यांच्या फायदासाठी कसेल त्याची जमीन असा कायदा करण्यात आला.पण जमीन कसण्यासाठी पुढली पीढी अजीबात तयारच नाही. शेतकरी सुखी तर जग सुखी , असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात त्यांच्या सुखासाठीचे प्रयत्नच अपुरे पडतात.भारतात सामर्थाच्या आधारस्तंभ असणा-या शेतक-याच्या समद्धीमळेच भारत देश समृद्धीमुळेच भारत देश पुन्हा समृद्द होणार आहे, हे सत्य लक्षात घेऊन शेतक-यांची परिस्थिती सुधारली पाहिजे.......

No comments:

Post a Comment