पहील्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध
सिनेतारकांपैकी एक मुकपटांमध्ये विनोदि अभिनय करणारा कलाकार किंवा अभिनेता
म्हणजे चार्ली चॅप्लिन. याने आपल्या करियरची सुरुवात वयाच्या ९ व्या वर्षी केली.
याचा जन्म १६ एप्रिल १८८९ मध्ये ईस्ट स्ट्रीट, वॉलवर्थ, लंडन, इग्लंड मध्ये झाला.
चार्ली चॅप्लिन हा इंग्लिश अभिनेता तसेच दिग्दर्शक व संगितकार सुद्धा होताच.
अभिनयासोबतच मुकपटांचे लेखन हि त्याची विशेष ख्याती होती. तो मुकपट करणारा अतिशय
प्रख्यात तसेच रचनात्मक अभिनेता होता.
त्याने आपल्या सिनेमात अभिनय तर केलाच त्याच बरोबर निर्देशन, पटकथा आणि
संगित सुद्धा दिले. लोकांना काहिही न बोलता हसवण्याची वेगळिच कला त्याच्याकडे
होती. अभिनयाने लोकांची मने जिंकणे किंवा त्यांच्या मुकविनोदाने लोकांना हसवणे
यातच त्याची ७५ वर्षे निघून गेली. त्याच्या आयुष्यात उच्च-स्तरीय सार्वजनिक आणि
खाजगी आयुष्यामध्ये नेहृमीच अतिप्रशंसा आणि विवाद या दोघांचा समावेश होता.
मार्टिन सिएफफ आणि याने २००८ मध्ये “चॅप्लिन अ लाइफ” हे
पुस्तक लिहिले. चार्ली चॅप्लिन चे आई आणि वडिल दोघेही संगित परंपरामध्ये मनोरंजक
होते. त्याचे वडिल गायक आणि अभिनेते होतेच त्याच बरोबर आई सुद्धा गायक आणि
अभिनेत्री होती. चार्ली चॅप्लिनला गायनाची कला हि त्याच्या आई-वडिलांकडुनच मिळाली
होती.
१९१५ मध्ये विश्व युद्धाच्या काळात कठीण
परीस्थितीतही त्याने लोकांना हसवण्याचे मौल्यवान कार्य केले. २५ वर्षानंतर महामंदी
आणि हिटलरच्या काळात देखिल त्याने लोकांना हसवण्याचे आपले कार्य थांबवले नाही. तो
निरंतर लोकांना हसवत राहिला. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज
होती. त्याकाळात चार्ली चॅप्लिनने लोकांसाठीची उत्तम भुमिका बजावली
ह़ॉलिवुड मध्ये चार्ली
चॅप्लिनचे बोलते चित्रपट द ग्रेट डिक्टेटर (१९४०),लाइमलाइट आणि मोसिओर वरडॉक्स हे तिन चित्रपट आले
होते. चार्ली चॅप्लिनचा “दिस इज माई सॉग” हा
चित्रपट वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्यात ‘अ काऊंटेस फ्रम हांगकांग’ हा प्रथम श्रेणीतला होता. हा त्याचा शेवटचा
चित्रपट होता. यानंतर त्याचि तब्येत हळुहळु बिघडत गेली. १९७२ मध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्याच्या
पुर्ण जिवन काळात त्याला तिन अर्वाडस मिळाले. १०१०-१९२० या काळात चार्ली चॅप्लिन
हा जगभरातिल सुप्रसिद्ध व्यक्ति म्हणुन ओळखला जात होता. सन १९६४ मध्ये चार्ली
चॅप्लिन याने त्याचे आत्मचरीत्र प्रदर्शित केले.
व्हिक्टोरीयन मंच आणि
युनायटेड किंग्डम च्या संगित वर्गात एका बाल कलाकारा पासुन जवळजवळ वयाच्या ८८ व्या
वर्षी २५ डिसेंबर १९७७ मध्ये त्याचा मृत्यु झाला. चार्ली चॅप्लिन हा आजही एक उत्तम
मुकपट अभिनेत्यांन मधिल एक उत्कृष्ट अभिनता मानला जातो.
No comments:
Post a Comment