प्रत्येक गोष्टीची एक पध्दत असते.
जसे चालण्याची पध्दत, उठण्याची पध्दत, बसण्याची पध्दत, बोलण्याची पध्दत,
वगैरे वगैरे. हिच पध्दत सदर गोष्टीला खास बनवते. ती आवश्यक देखिल आहे.
शास्त्रात तर याचा उल्लेख
आहेच पण आता विज्ञानानेही हि गोष्ट मान्य केलेली आहे. या पध्दतीमुळे त्या त्या गोष्टींचे परिणाम वाढतात आणी दुष्परिणाम कमी होतात. वर काही पध्दती आपण पाहिल्या. पण या सर्वांमध्ये महत्वाची आहे ती भोजनाची पध्दत. जेवताना मन नेहमी प्रसन्न असावे. मनात कोणतेही विचार असू नयेत. कारण विचार आले कि विकार यायला वेळ लागत नाही. आधुनीक विज्ञानाने सुध्दा सिध्द केलेले आहे कि, विकारग्रस्त मनाने तुम्ही कितीही चांगले पौष्टीक अन्न खाल्ले तरी ते फायदा कमी आणी नुकसान जास्त करते. म्हणुन जेवताना शुध्द मनाने भोजन करावे. वाईट विचार, विकार मनात अजिबात आणू नयेत.

भोजन कितीही स्वादिष्ट व पौष्टिक असले, तरी जर तुमचे मन प्रसन्न नसेल तर ते
तुमच्या अंगी लागणार नाही. याउलट साधारण भोजन हि जर तुम्ही प्रसन्न मनाने
घेतले तरी ते अंगी लागते. जेवताना जो भाव तुमच्या मनात असेल त्याप्रमाणे
जेवणाचे परिणाम होणारे असतात. चांगले भाव असतील तर चागला परिणाम आणी वाईट
भाव असतील तर वाईट परिणाम घडतील. म्हणुन जेवाताना मानसिकरीत्या प्रसन्न
असणे आवश्यक असते.
हे झाले मनाबाबत आता थोडे शरिराबाबत. जेवण्यास बसण्यापुर्वी थंड पाण्याने
हात, पाय, तोंड चांगले स्वच्छ धुउन साफ करावे. स्वच्छ टॉवेलने व्यवस्थीत
पुसून घ्यावे. शरीर स्वच्छ झाले की मन प्रसन्न होते. अन्न स्वच्छ ताटात
वाढुन घ्यावे. जमिनीवर आसन टाकुन मांडी घालुन बसावे. देवाचे नाव घेत निर्मळ
मनाने व स्वच्छ हाताने अन्न ग्रहण करावे.
अन्न चावून चावून खावे. अन्न चावून खाल्ल्याने लाळेवाटे पाचक रस त्यात
मिसळला जातो आणी अन्न पचनास मदत होते. जेवताना सावकाश जेवावे. भरभर
जेवल्याने भुकेपेक्षा जास्त अन्न खाल्ले जाते. नेहमी जेवताना भुकेपेक्षा
दोन घास कमी खावेत. ईच्छा नसताना अजिबात भोजन करू नये. नेहमी भुक लागण्याची
वाट पहावी. काहिवेळेला टाईमपास म्हणुन किंवा आग्रहाखातर खाल्ले जाते. असे
अन्न नेहमी नुकसान करते. आठवड्यातुन एकदा उपवास करावा.तो शरीरास आवश्यक
असतो.
वरिल पध्दतीने भोजन केल्यास, शरीरीचे वजन नियंत्रणात रहाते. वजन नियंत्रणात
राहिल्यास रोग दुर राहतात. परिणामी दिर्घायूष्य मिळण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment