आज परशुराम जयंती आहे .कोण होती हि
महान व्यक्ती याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. पुराण किंवा तत्सम
पुस्तकांचे वाचन केल्यास आपल्याला परशुराम यांच्या बद्दल बरिच माहिती आढळून
येते. रामायण काळातील म्हणजेच त्रेतायूगातील सर्वश्रेष्ट ऋषी म्हणुन
परशुराम ओळखले जातात. त्यांना विष्णुचा सहावा अवतार समजले जाते. ते शस्त्र
म्हणुन आपल्या सोबत कायम परशू धारण करायचे यावरुनच त्यांचे नाव परशुराम असे
पडले. शस्त्रास्त्र विद्येचे ते महान गुरु होते. भिष्माचार्य, द्रोणाचार्य
आणी कर्ण यांना त्यांनी शस्त्रास्त्र विद्या शिकवली होती. त्यांच्या या
शिष्यावरुनच त्यांच्या महानतेची कल्पना येते.जर शिष्यएवढे महान होते तर
गुरु किती महान असेल.परशुराम एक महान शिवभक्त होते.त्यांनी शिवाच्या भक्तीने प्रेरित होउन शिवपंचत्वरीश हे स्तोत्र लिहिले होते.
त्यांनी पृथ्वीवरुन क्षत्रिय वंश नष्ट करुन टाकला होता. त्यांना पृथ्वीवर वैदिक संस्कृतीचा प्रसार करावयाचा होता. ते जन्माने जरी ब्राम्हण असले तरी कर्माने क्षत्रिय होते. त्यांना पशुपक्षांची भाषाही येत होती. त्यांच्या मनात क्षत्रिंयाविषयी राग होता, म्हणुन ते शस्त्रास्त्रांची विद्या केवळ ब्राम्हणांनाच शिकवत असत क्षत्रियांना नाही. त्यामध्ये भिष्माचार्य आणी कर्ण हे अपवाद होते. कर्णाने त्यांना खोटे सांगुन त्यांच्याकडून शस्त्रास्त्र विद्या शिकुन घेतली होती. ज्यावेळी परशुरामांना कर्ण हा सुतपुत्र असल्याचे माहित पडले तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला कि युध्दात ऐनवेळी महत्वाच्याक्षणी तुला या विद्येचा विसर पडेल आणी तेच तुझ्या मृत्युचे कारण बनेल. त्यांचा शाप खराही ठरला. महाभारतात ऐनवेळी कर्णाला आपल्या विद्येचा विसर पडला आणी ते त्याच्या मृत्युचे कारण बनले. परशुराम हे आई-वडिलांचे परमभक्त होते. आई-वडिलांच्या आज्ञेचे ते नेहमी पालन करत. आज्ञापालनासाठीचे त्यांच्याएवढे मोठे उदाहरण कोणाचेच देता य़ेणार नाही. एकदा त्यांचे वडिल जमदाग्नी यांना रेणुकामातेचा राग आला. रागाच्या भारात त्यांनी आपल्या मुलांना रेणुकामातेचा वध करण्यास सांगितले. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही. त्यावर अधिकच चिडलेल्या जमदाग्नीने परशुरामांना त्यांच्या सर्व भावासह रेणुकामातेचा वध करण्यास सांगितले. आज्ञाधारी परशुरामांनी लगेचच त्यांच्या आज्ञेचे पालन करत सगळ्यांचा वध केला. त्यांच्या या आज्ञापातनाने खुष झालेल्या जमदाग्नीने त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सर्वांना पुन्हा जिवंत करण्यास सांगितले आणी झालेला प्रकार त्यांच्या स्मृतीतुन नष्ट करण्यास सांगीतला. या घटनेवरुन त्यांचे आज्ञापालन व कुटुंबाबाबतचे प्रेम दोन्ही दिसुन येते. त्यावेळी सहस्त्रार्जुन नावाचा एक राजा लोकांना खुप त्रास देत असे. त्याने मोठे तप करुन दत्तात्रयाला प्रसन्न करुन घेतले होते. त्यावेळी त्याने देवाकडून वरदान म्हणुन हजार भुजा मिळवल्या. आपल्या या हजार भुजांद्वारे त्याने लोकांना सळो कि पळो करुन सोडले होते. त्याच्या या कृत्यामुळे परशुरामाने त्याच्या सर्व भुजा छाटुन टाकल्या आणी शिरधडावेगळे केले. सुडाच्या भावनेने पेटलेल्या सहस्त्रार्जुनच्या मुलांनी परशुरामाच्या अनुपस्थीतीत जेव्हा त्यांचे वडिल जमदाग्नी ध्यानस्थ होते त्यावेळी त्यांची हत्या केली. पतीच्या अग्नीवर सती जाउन रेणुका माताही मरण पावली. जेव्हा हि गोष्ट परशुरामांना समजली तेव्हा त्यांना भयंकर संताप आला. त्यांनी प्रतिज्ञा केली कि मी या पृथ्वीवरुन क्षत्रियांचा वंश संपउन टाकिन. सुडाने पेटलेल्या परशुरामाने सहस्त्रार्जुनाच्या सर्व पुत्रांचा वध केला आणी त्यांच्या रक्ताने आपले वडिल जमदाग्नी यांचे श्राध्द घातले. त्यांच्या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी खरोखरच पृथ्वी निःक्षत्रीय करुन टाकली. आणी ती ही एक, दोनदा नव्हे तर एकविस वेळा.शेवटी रुचिक ऋषिंनी त्यांचा राग शांत केला. परशुरामाने निःक्षत्रीय पृथ्वी कश्यप मुनिंना दान म्हणुन देउन टाकली. देवराज इंद्र यांच्यासमोर त्यांनी आपल्या शस्त्रास्त्रांचा त्याग केला आणी ते महेंद्र पर्वतावर निघुन गेले.

No comments:
Post a Comment