इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू आणि मानवी जिवन
यांचे नाते म्हणजे तुझ्यावाचून करमेना यासारखं आहे. सकाळी चहा, कॅापी,
टीव्ही ते रात्री शांत झोप येण्यासाठी इलेक्ट्रोनिक्स उपकरणांचीच मानवाला
मदत घ्यावी लागते. भारतात विविध क्षेत्रात इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा वापर
कमालीचा वाढला आहे. या वस्तूंची निर्मिती, वापर दुरूस्ती, सेवा यामध्ये
प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अनेक रोजगार - स्वयंरोजगाराच्या संधी दडलेल्या
आहेत. या व्यवसायाकडे कल असणा-यांनी याचा निश्चितच विचार करावा.
इलेक्ट्रोनिक्सवर आधारलेली अनेक उपकरणे आता घरोघरी वापरली जात आहेत.
रेडिओ, टिव्ही, व्हिडीओ रेकॅार्डर प्लेअर , मायक्रोवेव्ह ओव्हन , मोबाईल,
डिजिटल कॅमेरा, एमपी-३, डीव्हीडी प्लेअर, कॅाम्प्युटर, निदान कॅलक्युलेटर
तरी आपल्याकडे असतोच. अशी नित्य वापरातील उपकरणे ही इलेक्ट्रॉनिक्सच्या
तंञज्ञानावर आधारलेली आहेत. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक्स युगाचा जगातील
कानाकोप-यातील व्यक्तींवर सकारात्मक परिणाम झालाय. भारतात मागील ४० ते ४५
वर्षे इलेक्ट्रॉनिक्सवर आधारलेले उद्योगधंदे खंबीरपणे उभे राहिले आहेत.
एवढेच नव्हे तर प्रतिवर्षी त्यांची उलाढाल नजरेत भरेल अशी वाढत आहे. २५ ते
३० वर्षापूर्वी बरेचसे उत्पादन सरकारी क्षेत्रात होत असे. कारण टेलिफोन,
रेडिओ, टिव्ही, लष्करातील साधनसामुग्री दळणवळण सामुग्री या सरकारी
क्षेत्रातील गोष्टी होत्या. साधारण १९८५ ते १९९० पर्यंत तर या उद्योगांची
चांगली प्रगती झाली. १९९१ सालानंतर उद्योगधंद्यांमध्ये जागतीकीकरणाचे वारे
वाहू लागले, परवाना पद्दतीमध्ये ब-याच प्रमाणात खुलेपणा आला. सरकारी
उद्योगांचे खाजगीकरण सुरू झाले, आर्थिक उलाढाल वाढली, निर्यातीसाठी अनुकूल
वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी देशी परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले.
आयात कर कमी झाले, यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील विविध
उत्पादनांत नाविन्यता तर दिसू लागलीच पण त्यांच्या किंमती
मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊ लागल्या. भारताने या क्षेत्रातील जागतीक
महत्व जाणलेले आहे. त्यामुळे आपल्या देशाकडून सध्या २२० देशांकडे
इलेक्ट्रॉनिक्सवर आधारलेली उत्पादने निर्यात होत आहेत.
पुढील दहा वर्षात ४५ कोटी मोबाईल भारतात खपतील असा अंदाज आहे. त्या प्रमाणात इतरही यंञसामुग्रीची गरज वाढत जाईल. केबल टीव्ही किंवा डिश अँटेना यंञसामग्री, विविध प्रकारचे संगणक, किबोर्ड, मोडॅम, प्रिंटर, स्कॅनर्स, मायक्रो प्रोसेसर्स, इलेक्ट्रॉनिक्स टेस्ट इक्विपमेंट्स, डिजीटल लिनियर आयसी, मायक्रो कंन्ट्रोलर, डेटा प्रोसेसिंग उपकरणे, डिस्क ड्राईव्हज, अशा अनेक प्रकारच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वैद्यकशास्ञातील रोगनिदान अचुक व्हावे म्हणून अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सर्रास वापरली जातात.

या क्षेञात आवड असणा-यांनी जरूर यातील व्यावसायीक संधी मिळवावी हेच आवाहन .
No comments:
Post a Comment