१६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या ३४ कि.मी. मार्गावर धावली.
१४ डब्ब्यांच्या रेल्वेमध्ये ४०० प्रवासी घेउन ३.३० वाजता सुटलेली हि रेल्वे सुमारे सव्वा तासाच्या अंतराने ठाण्याला पोहोचली होती.
त्यावेळी या रेल्वेला तिन तिन ईंजिन लावण्यात आले होते. तिच्या स्वागतासाठी
२१ तोफांची सलामी देण्यात आली होती. बघता बघता रेल्वे कधी विस्तारली ते
कळलेच नाही. आज या ऐतिहासीक घटनेला १६२ वर्षे पुर्ण होत आहेत रेल्वेची
प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहे. ईग्रजांना आपल्या राज्यकारभाराच्या
सुविधेसाठी ठाणे आणी मुबईला जोडणे आवश्यक वाटले. त्यांच्या या राजकिय
ईच्छाशक्तीमुळेच रेल्वेची कल्पना अस्तित्वात आली आणी भारतामध्ये मुंबई ते
ठाणे पहिली रेल्वे धावली.
त्यावेळी केवळ ३४ कि.मी. मार्गावर धावणारी हि रेल्वे आज संपुर्ण भारतभर
पसरलेली आहे. रेल्वेच्या या प्रदिर्घ जाळ्यामुळे रेल्वे हे वाहतुकिचे
सर्वात स्वस्त, जलद आणी मुख्य साधन बनली आहे. सुरुवातीला केवळ ३४ कि.मी.
एवढ्याच अंतरावर धावणारी रेल्वेची लांबी आता जवळपास १ लाख कि.मी. पर्यंत
विस्तारली आहे. यापैकी ४० टक्के मार्गाचे विद्युतीकरण देखिल झालेले आहे.
देशाच्या प्रगतीत भारतीय रेल्वेचे मोठे योगदान आहे. दार्जिलींग येथील
हिमालयीन रेल्वे हि खुप जुनी असुन या रेल्वेला युनोस्कोने जागतीक वारसा
म्हणुन घोषित केले आहे. निलगिरी पर्वतावरील रेल्वेमार्ग हा देखिल याच
प्रकारचा असुन त्यालाही जागतीक मानांकन लाभले आहे. भारतीय रेल्वे हि आशीया
खंडातील नंबर एकची आणी जगातील दुस-या नंबरचे रेल्वे नेटवर्क आहे. संपुर्ण
देशात रेल्वेचे १६ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. रेल्वेतर्फे ७१३३
स्थानकांवर सेवा पुरविली जाते. ७९१० एवढी मोठी ईजिन क्षमता रेल्वेकडे
उपलब्ध आहे. रेल्वेचे जाळे देशात कानाकोप-यात पसरल्यामूळे भारतातील सर्व
राज्ये, शहरे आणी गावे जोडण्यात महत्वपुर्ण योगदान रेल्वेचे आहे. रेल्वे हि
फक्त लोकांच्याच येण्या-जाण्यासाठी नसुन मालवाहतुकीसाठीही सर्वात स्वस्त व
सुंदर पर्याय आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे.
रेल्वे हि एक प्रकारे देशाची जिवनधाराच बनलेली आहे. अलिकडेच अस्तित्वात
आलेली कोकण रेल्वे हि रेल्वेची महत्वपुर्ण सेवा समजली जाते. लाईफ लाईन
एक्सप्रेस हि दुर्घटनांच्यावेळी वापरली जाणारी अत्यावश्यक सेवा रेल्वेतर्फे
पुरवण्यात येते. रेल्वेच्या विशेष उपक्रमामध्ये पॅलेस आँन व्हिल्स हि
विशेष उल्लेखनिय समजली जाते. भारतदर्शनासाठी राजेशाही पध्दतीची सेवा या
उपक्रमाद्वारे पुरविली जाते. तसेच समझौता एक्सप्रेस हि देखिल एक रेल्वेची
एक महत्वाची उपलब्धी समजली जाते.
No comments:
Post a Comment