Thursday, 30 April 2015

शरद गोविंदराव पवार


शरद पवार हयांचा परिचय व राजकारणात प्रदार्पण
मा.शरद पवार हयाचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामती येथे झाला. ते शाळेत असतांना त्यांनी गोवामुक्ती आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यानंतर काँलेमध्ये असतांना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम पाहिले.येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली. एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवले होते. त्यावेळी पवारांनी केलेल्या भाषणामुळे मुख्यमंत्री अतिशय खुष झाले. त्यानंतर मा. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणचा वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

विधानसभा जिंकून मुख्यमंत्री म्हणून शपथ
बारामती मतदारसंघातून 1967 साली पहिल्यादाच विधानसभेत निवडून गेले. वयाच्या 29 व्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील हे पवारांचे मार्गदर्शक होते 18 जुलै 1978 रोजी मा. शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते शरद पवारांनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष नेते पद सुध्दा भुषवले होते.
लोकसभेकडून पुन्हा विधानसभेकडे
मा शरद पवार 1984 साली पहिल्यादाच लोकसभेची निवडूनक लढवून ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर काँग्रेसने 48 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. त्या नंतर त्यांनी लोकसभेत न जाता राज्यतील विधानसभा निवडून लढवून ते राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेते झाले. त्यावेळी काँग्रेसने 288 पैकी 54 जागा जिंकल्या. होत्या.  1988 नंतर राजीव गांधीनी पुन्हा शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. 26 जून 1988 रोजी दुस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिस-यांदा शपथ घेतली. तसेच 6 मार्च 1993 रोजी मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली अशा प्रकारे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मुरबी राजकारणी नेता म्हणून ओळखले जाते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची

पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी 10 जून इ.स. 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. त्यावेळी जनतेने राष्ट्रवादीचे राज्यात सर्वाधिक आमदार निवडून दिले होते. 2004 साली राष्ट्रवादीचे 12 खासदार निवडून आले व मनमोहन सिंगच्या आघाडी सरकार मध्ये सामिल झाले. 22 मे 2004 रोजी शरद पवार देशाचे कृषि मंञी बनले. त्यानंतर त्यांना 29 मे2009 रोजी पासून केंद्रीय मंञी मंडळामध्ये  कृषी, ग्राहकांशी सबंधित बाबी अन्न व सार्वजनिक वितरण ह्या खात्यांचा धुवा सांभाळला.

शरद पवार दुसरे आवडते क्षेञ क्रिकेट

राजकारणानंतर शरद पवार दुसरे आवडते क्षेञ म्हणून ते क्रिकेट कडे पहातात 29 नोव्हेंबर 2005 रोजी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच 1 जुलै 2010 मध्ये आंतरराष्टीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदाची सुञे हाती घेतली.

No comments:

Post a Comment