अनंत कान्हेरे हा गणेश
दामोदर सावरकर आणि स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्याक अभिनवभारत ह्या
अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकारत संघटनेचा एक सदस्य होता. स्वातंत्र्यवीर सावरकर
लंडनमध्ये असताना त्यांना भारतीय तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीची ज्योत
पेटविण्यासाठी जोसेफ म्याझिनी ह्या इटालियन क्रांतिकारकांच्या चरीत्रावर एक ग्रंथ
लिहला. तो सशस्त्रक्रांतिचे तत्वज्ञान विशद करणारा ग्रंथ होता. असा तेजस्वी आणि
भयंकर ग्रंथ भारतात बाबारावांनी प्रकाशीत केला.
हा ग्रंथ तसेच स्वातंत्र
कवी गोवींद आणि स्वातंत्रवीर सावरकरांनी लिहीलेले राष्ट्रभक्ती वरील काव्य आणि
पोवाडे प्रकाशीत केले. असे भयंकर आणि प्रक्षोभक लेखन प्रदर्शित करण्याच्या
आरोपाखाली मुंबईत काळ वृत्तपत्राचे संपादक शिवराम परांजपे ह्यांच्या खटल्याच्या
सुनावणीसाठी जात असताना गणेश सावरकरांना ब्रिटीश सरकारने अचानक अटक केली आणि
त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावून अंदांनला पाठवण्यात आले. ह्या शिक्षेचा
बदला म्हणून लंडनमध्ये मदनलालधिंग्रा ह्या युवकाने कर्झन वायली ह्या ब्रीटीश
अधिकार्यास गोळ्या घालुन ठार केले. तो ब्रिटीश सरकारचा डिटेक्टीव होता. लंडन
हाऊसमध्ये असणार्या हिंदी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होता.
मदनलालच्या या शौर्यानंतर २१ डिसेंबर १९०९ च्या दिवशी नाशिकला अजून एक असा भयंकर
प्रकार घडून आला. त्याचे नाव होते अनंत कान्हेरे त्याचे वय होते अवघे १८ वर्ष.
कलेक्टर जँक्सन बाबरावांच्या अटकेसाठी जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत
बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकंधल्या विजयानंद थिएटमध्ये शारदा ह्या नाटकाचा
प्रयोग ठेवला होता.
जँक्सन मराठी नाटकाचा
चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ झाली
असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तलातून
गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तूल स्वातंत्रवीर सावरकरांनी
लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती.
अनंतताला कृष्णाजी गोपाळ
कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयक्कर साथारांची जोड मिळाली. जँक्सनचा
वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला. त्याला अटक करण्यात आली.
कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च १९१० रोजी
त्यांना फाशी ठोठावण्यात आली आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात
फाशी देण्यात आली. आणि नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले हे शूरवीर वधस्तंभकडे चालत
गेले मृत्युला कवटाळुन घेऊन अमर झाले. अश्या वीर हुतात्म्यांना माझे शतशः प्रणाम.
No comments:
Post a Comment