Saturday, 18 April 2015

भारतीय उद्योगपती महाराजांप्रमाणे वाटतात!

पूर्वीच्या संस्थानिकांप्रमाणे आज उद्योगपती साम्राज्यं चालवतात. आपल्या सिमेच्या आत व बाहेर नजर ठेवतात आणि आक्रमकांपासून आपल्या राज्याचं रक्षण करतात. रतन टाटा, आदित्य विक्रम बिर्ला,  धीरूभाई अंबानी,
राहुल कुमार बजाज, रमाप्रसाद गोएन्का, ब्रिजमोहन खैतान, भारत व विजय शाहा.  हे भारतातील सर्वात सामर्थ्यशाली व्यक्तींपैकी आहेत.  ५०० हून अधिक कंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादनाची विक्री सुमारे  ५५००० कोटी रूपयांच्या घरात जाते. त्यांच्या एकूण कर्मचा-यांची संख्या साडे सहा लाख आहे.  तुम्ही दिवे लावा, चहाचा घोट घ्या, दाढी करा, संगीत एैका, कामावर मोटारीने जा, चित्रपट पहा, झोपताना डोक्याशी उशी घ्या हे करताना तुम्ही आपण त्यांच्या कंपन्यांच कुठलं ना कुठलं तरी उत्पादन वापरत असतोच. 
या उद्योगपतींमध्ये कितीतरी वैविध्य आहे. भिन्नता आहे.  काही अत्यंत उच्चशिक्षित, तर काहींनी कॉलेज शिक्षण अधॆवट सोडलेले. काही बड्या उद्योगसमूहाचे वारसदार तर काहींनी स्वतःच्या बळावर साम्राज्य उभारलेले. काहींनी वयाच्या विशीतच यशाचं शिखर गाठलेलं तर काहींनी पन्नाशीत सुरूवात केली. काही एका विशिष्ट उद्योगावर प्रभाव पाडून आहेत तर काहीजण एकापेक्षा अधिक उद्योगांवर नियंत्रण ठेवून आहेत. त्यांच्या कृतींचा, त्याच्या विचारांचा केवळ त्यांचे ग्राहक, भागधारक, कर्मचारी आणि बँक व्यवस्थापन यांच्यावरच परिणाम होतो असं नव्हे तर संबध अर्थव्यवस्थेवरच परिणाम होत असतो. तेव्हा ते विचार कसा करतात? ते त्यांचा उद्योग कसा चालवतात? अब्जावधी रूपयांची गुंतवणूक करण्याचे गुंतागुंतीचे निर्णय कसे घेतात? आपल्या साम्राज्याचा कारभार पाहणा-या अधिका-यांच्या नेमणुका ते कशी करतात वा त्यांना तडकाफडकी कसं काढून टाकतात? यासाठी या प्रत्येक उद्योगपतींचा त्यांच्या चरित्र्याचा व व्यवसायाचा खोलवर अभ्यास करणे आवश्यक वाटते. 
पण खरोखरच आजचे खरे हिरो हे कोणी सिनेअभिनेता, राजकीय नेता किंवा दूसरे तिसरे कोणी नसून आपले हे उद्योगपती म्हणजेच बिझिनेसचे महाराजेच आहेत.

No comments:

Post a Comment