सध्या महाराष्ट्रा जिल्हयात मध्ये
स्ञी भ्रूणहत्येची प्रकरणे राज्यभर गाजत
आहेत. स्ञी भ्रूणहत्याप्रकरणी यापूवीच राज्य व केंद्र सरकारांनी कायदे केले आहेत. पैशाला
बळी पडणारे डाँक्टर अधिक पैसे घेऊन लिंग निदान करतात त्यामुळे मुलगी जन्माला येण्याअघोदरच मारली जाते यामुळे आरोग्य
व पोलिस खातीही खडबडून जागी झाली आहेत, त्यांनी आपली कारवाईची मोहिम आणखी तीव्र
केली आहे. त्यामुळेच आणखी काही प्रकरणे उघडी करुन अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची
आवश्यकता आहे. देशातील लिंग – गुणोत्तर प्रमाण कमालीचे घटत चाललेले आहे.
दशकभरापूवी, 1000 मुलांमागे 927 मुली असे लिंग – गुणोत्तर होते, ज्यात घसरण होऊन
1000 मुलांमागे 914 मुली अशा धोकादायक आकड्यावर येऊन हे लिंग – गुणोत्तर स्थिरावले
आहे. सध्या असलेले स्त्री – पुरूष विषमता प्रमाण अनेक सामाजिक समस्यांना जन्माला
घालणार आहे गर्भपातचा कायदा मेडिकल टमिनेशन आँफ प्रेग्नन्सी एक्ट 1971 पासून
भारतात लागू आहे.
स्ञी
भ्रूणहत्येमागील कारणे स्ञीयावर वाढणारे अत्याचार, मुली
म्हणजे डोक्याला ताप हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक वयात मुलीची घ्यावी लागणारी काळजी
या आगामी काऴात होणा-या त्रासाला घाबरण्याबरोबरच आणखी कारणांमुळे लोक मुलीला
जन्माला घालण्याचे टाळत आहेत. मुलगी हे परक्याचे धन आहे. तिच्या वाढवण्यावर,
शिक्षणावर होणारा खर्च. ही एक मानसिकता बदलत चालली आहे. घटस्फोट, मानसिक, शारीरिक
त्रास या वेतागाला कंटाळून स्त्रिया आत्महत्येला करतात. या समस्यांना सामोरे जावं
लागत. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो. तो मोठा झाल्यावर म्हातारपणाचा आधार असतो.
आणि आपला वंश पुढे चालवत राहतो, अशी लोकांनची समजुत आहे.सोनोग्राफी मूळ उद्देश सोनोग्राफी यंत्राद्वारे
बाळाची गर्भात कशी वाढ होत आहे, मुलं आजारी, काही जन्मजात व्यंग आहे का या गोष्टी
कळण्यासाठी होता. पण सध्या मूळ उद्देश कुठल्याकुठे हरवला आहे. सगळयात आश्चयची
गोष्ट म्हणजे स्त्रियांनाही मुलगाच हवा असतो. कारण त्यांना सासरच्या मंडऴींची भीती
असते. त्यांना खुश करण्यासाठी स्त्रीया मनाविरूध्द का होईना पण गर्भपाताला तयार
होतात.
हे सर्व कोठे तरी थांबविण्या साठी
आपण प्रयत्न केले पाहिजे.
No comments:
Post a Comment