भाषण हा शब्द जरी तोंडात आला तरी
आपल्या समोर फक्त एकच व्यक्ती येते आणी ती म्हणजे नेता. खरोखरच नेत्याला
भाषणाची खुप आवश्यकता असते. नेत्याकडे चागले वक्तृत्व असणे आवश्यक आहे. पण
भाषणाची आवश्यकता प्रत्येकवेळी नेत्यालाच असते असे नाही. आज प्रत्येक
क्षेत्रात याचे महत्व निर्माण झाले आहे.
भाषणाचे प्रकारही बरेच आहेत नेत्याने लोकांसमोर केलेले
भाषण, विद्यार्थ्याने स्पर्धेत केलेले भाषण, मालकाने कर्मचा-यांसमोर
केलेले भाषण अथवा गुरुजींनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण असो.
प्रत्येक भाषणासाठी अभ्यास महत्वाचा असतो. व्यवसायात सर्वोच्च पातळीवरील
अधिका-यांना विविध प्रसंगी भाषण करावे लागते. हे भाषण करणे हि देखिल एक कला
आहे. ती प्रत्येकाला जमेलच असे नाही. काहिंच्या अंगी ती जन्मजातच असते. पण
अशी माणसे फार थोडी असतात. काहिंना ती प्रयत्नांनी अवगत करावी लागते.
भाषणामध्ये विषयाच्या सर्व बाजू येणे आवश्यक असते. त्यासाठी विषयाचे ज्ञान
असणे आवश्यक आहे. संदर्भीत विषयावरील जास्तीत जास्त मुद्दे भाषणात समाविष्ट
असणे महत्वाचे असते. विषयाचा व्यवस्थीत अभ्यास केला गेला पाहिजे. भाषण
करताना वेळेचे भान राखणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीला प्रेक्षक जास्त वेळ
सहन करु शकत नाहित. त्यामुळे तुमच्या भाषणात लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद
पाहिजे. किंवा विषय रेंगाळता कामा नये नाहितर भाषण कंटाळवाणे होते.
संधर्भीत विषयावरील विविध अहवाल, मासिके, विविध वर्तमानपत्रातील कात्रणे
ईत्यादींमधून माहिती जमा करावी. विविध खात्यातून आवश्यक ती आकडेवारी व
माहिती मिळवावी. भाषणाचा प्रसंग व श्रोतासमूह यांचा विचार करुन मिळवलेल्या
माहितीच्या आधारे भाषणाचा कच्चा मसुदा तयार करावा. त्यात योग्य ते बदल
करावेत. मुद्देसूद भाषण तयार करावे. भाषण विविध परिच्छेदांमध्ये विभागलेले
असावे. भाषणात आवश्यक ती सांख्यकीय माहिती असावी. प्रसंगाला अनुरुप उदाहरणे
भाषणात असावीत. अशा प्रकारच्या प्रभावी भाषणामूळे तुमचे सागणे लोकांना
व्यवस्थीत लक्षात येते व तुमची वेगळी छाप ईतरांवर पडते आणी तुमच्या
नावलौकिकात भर पडते.
No comments:
Post a Comment