Tuesday, 28 April 2015

व्यवसाय आणी समाज

आज आपण एकत्र समाजात रहातो. ज्याप्रमाणे आपण, आपल्या कुटूंबासाठी जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या काही जबाबदा-या आपल्या समाजासाठी देखिल आहेत. व्यवसाय आणी समाज यांचे घनिष्ट संबंध आहेत. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल साधन सामग्री आणी वस्तुंची विक्री यासाठी समाजावर तर समाजाला आपल्या प्रगतीसाठी व्यवसायावर अवलंबून रहावे लागते. या परस्पर संबधाची जाण ठेवणे म्हणजेच सामाजिक जबाबदारी होय.

सामाजिक बांधिलकी आणी जबाबदारीचा संबंध सामाजिक कल्याणाशी आहे. सामाजिक घटकात व्यवसायातील कर्मचारी,संस्थेचे भागधारक, ग्राहक आणी सरकार यांचा समावेष होतो. यांच्या संबंधी आवश्यक कर्तव्य पार पाडणे म्हणजेच सामाजिक जबाबदारी होय. सामाजिक जबाबदारीची संकल्पना खालिल व्याख्येवरुन अधिक स्पष्ट होईल. स्वहितासाठी कार्य करणा-या व्यक्तीने ईतरांचे अधिकार आणी न्याय हिताला धक्का पोहोचणार नाही याची खात्री करुन घेण्याचे प्रत्येकाचे उत्तरदायीत्व म्हणजेच सामाजिक जबाबदारी होय. किंवहूना सामाजिक उद्दिष्टे आणी सामाजिक मुल्ये यांच्याशी सुसंगत अशी धोरणे कार्यन्वित करणे, निर्णय घेणे आणी कार्य करणे म्हणजेच व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९६५ साली दिल्ली मध्ये व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या विषयावर एकआंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेने व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीची व्याख्या पुढिलप्रमाणे केली. व्यवसायाचे ग्राहक, कर्मचारी, भागधारक आणी समाजाविषयी व्यवसायाचे उत्तरदायीत्व म्हणजे सामाजिक जबाबदारी होय. यावरुन कर्मचारी, माल पुरवणारे व्यापारी, उपभोक्ते, भागधारक, सरकार आणी व्यक्तीसमूहाच्या व्यवसायाकडून काही अपेक्षा असतात. व्यवसायास या सामाजिक अपेक्षांची पुर्तता करावी लागते. त्याचप्रमाणे विविधसामाजिक घटकांनी व्यवसायास अनुकूल वातावरण तयार करावे, अशी व्यवसायाची अपेक्षा असते. यावरुन सामाजिक जबाबदारी हा द्विमार्गी प्रवाह आहे असेच सिध्द होते. म्हणजेच व्यवसायाला समाजाच्या आणी समाजाला व्यवसायाच्या अपेक्षांची पुर्तता आणी हिताची जोपासना करावी लागते. यावरुन असे सिध्द होते कि, सामाजिक जबाबदारी या नाण्याच्या, व्यवसाय आणी समाज या दोन बाजू आहेत हेच खरे.

No comments:

Post a Comment