साहित्य – एक पॅकेट ब्रेड, 50 ग्रँम चिज, दोन मोठे चमचे दूध, दोन हिरव्या मिरच्या मधून कापलेल्या, अर्धा इंच आल्याचा टुकडा, चवीनुसार मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर, तळण्यासाठी तेल.
कृती – ब्रेडचे चारी कोपरे कापून घ्या. नंतर ते एक-एक करून लाटण्याने दाबून एका
भिजवलेल्या कापडावर वेगळे-वेगळे ठेवा. त्याला दुस-या भिजवलेल्या कपड्याने झाकून
ठेवा.चिज किसून त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, आलं, हिरवी मिरची व दूध टाकून पेस्ट करून घ्या. नंतर एक-एक ब्रेडवर ही
पेस्ट थोडी-थोडी करून पसरून हलक्या हाताने रोल करून घ्या. हे रोल हलक्या हाताने
तव्यावर गुलाबी रंगासारखे तळून घ्या. जर रोल विस्कटत असेल तर टूथपिक लावून तळा. टोमॅटो
साँस सोबत वाढा.
No comments:
Post a Comment