तुम्हाला
कशा प्रकारची वागणूक दिली जाते, ते ब-याच अंशी तुम्ही स्वत:स कसे सादर
करता यावर अवलंबून आहे, हिणकस, अभिरूची हिन, अतिसामान्य वागणूक वा
अविष्कार यामुळे कालांतराने लोक तुमचा अनादर करू लागतात. सर्वप्रथम आपला
स्वतःचा आदर करणारा राजा हा इतरांमध्ये देखील आदराची भावना प्रेरीत करतो.
राजाच्या अधिकारांच्या जाणीवेने, दरबारी भव्यतेमध्ये कार्यशील राहून तुम्ही
राजमुकूटासाठीच जनू बनलेले आहात अशी स्वतःची दिमाखदार आदरणीय प्रतिमा आणि
थोरवी निर्माण करा. तुमच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास वाढत जातो.
स्वतःच्याच बाबतीत एक युक्ती आपण वापरली पाहिजे. आपण जर ठाम विश्वास ठेवला
की महान भव्य गोष्टींसाठी आपली निवड झाली आहे. आपल्याकडे काही भव्य आहे,
तर आपली ही धारणा बाहेर फेकली जाते. सादर होते. जसे एखादा राजमुकूट आपल्या
मैल्यवान रत्नप्रभेमुळे राजाच्या भवती दिप्ती निर्माण करतो. तसेच काही इथे
घडते. आपल्या विचारांच्या प्रक्षेपणामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये
आपल्याविषयी अशाच मिळत्याजुळत्या भावनाचा संसर्ग होऊ लागतो. आपली
सकारात्मकता व भव्य अपेक्षा पाहता सभोवतालचे हे लोकही असा विचार करू लागतात
नामांकित घराण्यात जन्म न झालेल्या कीत्येक लोकांनी राजमुकूटाच्या
योजनेप्रमाणे काम केले आहे व तिचे सामर्थ्य जाणले आहे व ते यशस्वी देखील
झालेले आहेत. तुमच्या स्वतःवरील विश्वसावरच विजय मिळवा. उन्नत पातळीवरचे
प्रभुत्व मिळवा. स्वतःवर तुम्ही एक त-हेच्या फसगतीचा प्रयोग करत आहात याची
जाणीव असतानापण राजासारखे वागा. इतर लोकही मग तुम्हाला एका राजासारखीच
वागणूक देतील.
हा राजमुकूट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे काढले, पण ते वेगळे काढले जाणे, खरे वाटणे, तुमच्या निराळेपणाची गंभिरपणे दखल घेणे हे पूणॆपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही व तुमच्या सभोवतालचे लोक यांच्यात असलेले अंतर दाखवून द्या. तुमच्या अलग असण्यावर भर देण्याचा एक पर्याय म्हणजे नेहमीच प्रतिष्ठीत, थोर व उच्च दजाॆची वागणूक ठेवा.

No comments:
Post a Comment