Thursday, 30 April 2015

History of Indian Railway

ध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठच्या ठिकाणी  पुर्वी फाशी तलाव होता. अट्टल गुन्हेगारांना तेथे फाशी देत असत. ऐतिहासिक व्हिक्टोरिया टर्मिनल (व्हिटी) उभारण्यासाठी समुद्रात मातीची भरणी करण्यात आली. सुमारे ८० एकर जागा सपांदन करून मुबंईच्या सौंदर्यात भर टाकण्यात आले. व्हिक्टोरिया टर्मिनल ला दहा वर्ष लागली बनवायला. त्या साठी सर्व खर्च मिळुन १६ लाख ३५ हजार ५६२ रूपये झाला होता.  दरवर्षी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असला तर दुपारी साडेतीनच्या गाडीच्या वेळात बदल करण्यात येत नाही .त्याचे मुख्य कारण म्हणजे मुबंईहुन ठाण्याला १६एप्रिल १८५३रोजी सोडण्यात आलेल्या पहिल्या रेल्वे गाडीची आठवण  जतन करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातच नव्हे तर आशियात पहिली रेल्वे गाडी सुरू करणा-या मध्य रेल्वे म्हणजे पुर्वीची ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेविषयी (जीआयपीआर) तसेच रेल्वे स्टेशनाची उभारणीबाबत अशी रंजक कथा आपणास हवी असेल ,तर ऱाजेद्र आकलेकर यांचे ( हॉल्ट स्टेशन इडिया ) दि ड्रॅमॅटिक टेल ऑफ दि नॅशन्स फर्स्ट रेललाइन, हे पुस्तक वाचायला हवे. भारतात कार्यक्षमरीत्या प्रशासनकरता यावे या हेतुने रेल्वे सुरू करण्याच्या निर्णय ब्रिटीश सरकारने १४ नोव्हेंबर १८४९ रोजी घेतला.  जेम्स जॉन बर्कले या अवघ्या ३० वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियरने रेल्वे प्रत्यशात  साकरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बर्कले नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी  ७फेब्रुवारी १८५० रोजी भारतात आले. रेल्वेमार्गाचे भुमीजन ऑक्टोबर १८८५ मध्ये करण्यात आले. फॅव्हिल अॅंन्ड फॉवलर या ब्रिटिश  कंपनीस कंत्राट देण्यात आले. हा मार्ग पुर्ण होत असताना इंग्लडहुन आणलेल्या वाफेच्या  पहिल्या इंजिनची चाचणी  १८नोव्हेंबर १८५२ रोजी  घेण्यात आली आणि १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली गाडी मुबंई ते ठाणे मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली .मुबंईहुन दुपारी ३.३५च्या मुहूर्तावर पहिली गाडी सुटली .त्या वेळी  २१ तोफांची सलामी देण्यात आली. ५७ मिनिटात मुबंई ठाणे ३४ कि.मी.अंतर चा प्रवास गाडीने पुर्ण केला.

No comments:

Post a Comment